माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 4 June 2024

नातेसंबंध ( Blood Relationship ) -- प्रश्नावली


(1)दिलीपची आई ही शंंकरची आत्या आहे. शंकरची आई दिलीपची कोण ?

उत्तर -- मामी
------------------
(२)  एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली, " तू माझा भाऊ आहेस. पण मी तुझा भाऊ नाही. " तर त्या दोघांमधील संबंध काय ?

उत्तर -- भाऊ -- बहिण
-------------------
(3) चंद्रा लिलाला म्हणाली, " तुझ्या वडिलांच्या पत्नीची सासू माझी आई लागते."  तर चंद्रा ही लिलाची कोण ?

उत्तर -- आत्या 
---------------------------------
(4) सुजित आणि आनंद यांच्या आईचे वडील एकच आहेत पण ते सख्खे भाऊ नाहीत व सावत्रही नाहीत तर त्या दोघांमधील नाते कोणते ?

उत्तर -- मावसभाऊ
---------------------------------
(5) सपनाच्या मामाचा मुलगा सुमित आहे. तर सुमितची आई ही सपनाची कोण ?

उत्तर -- मामी
---------------------------------
(6) सुनिलची मावशी सुमितची आत्या आहे. तर सुनिलचे व सुमितच्या वडिलांचे नाते काय ?

उत्तर -- मामा -- भाचे
---------------------------------
(7) ओंकार हा सुनिलचा मामा आहे तर सुनिलची आई ओंकारच्या वडिलांची कोण ?

उत्तर -- मुलगी
---------------------------------
(8) शंकरचे वडील ओंकारचे काका आहेत तर शंकरची पत्नी व ओंकारचा मुलगा यांचे नाते काय ?

उत्तर --  काकू -- पुतण्या 
---------------------------------
(9) चंदनाच्या नव-याची आई व चंदनाच्या आईच्या नव-याची मुलगी यांचे नाते काय ?

उत्तर -- सासू -- सून
---------------------------------
(10) माझ्या बायकोच्या भावाचा आजीचा मुलगा माझा कोण ?

उत्तर -- सासरा 
---------------------------------
(11) संगिताच्या भावाची पत्नी वैशाली आहे. वैशालीचा मुलगा विराज आहे. तर विराज संगिताचा कोण आहे ?

उत्तर -- भाचा
---------------------------------
(12) सुमनच्या बहिणीच्या मुलाचे वडील हे सुमनचे कोण  ?

उत्तर --- बहिणीचा नवरा
---------------------------------
(13) माझ्या मुलाचा मुलगा सुमित आहे. तर माझा मुलगा व सुमितची आई यांचे नाते काय ?

उत्तर -- पती -- पत्नी 
---------------------------------
(14) राजेंद्र हा सुरेशच्या आत्याला आई म्हणतो तर सुरेशचे वडील राजेंद्रच्या बहिणीचे कोण ‌?

उत्तर -- मामा 
=========================
संकलक :- श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775  /  7721941496

No comments:

Post a Comment