माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 6 October 2024

नातेसंबंधावर आधारित प्रश्न‌ ( Blood Relationship )

(१) एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली, "तू माझा भाऊ आहेस. पण मी तुझा भाऊ नाही.” तर त्या दोघांमधील संबंध काय ?

उत्तर --- भाऊ‌ - बहिण
-----------------------------
(२) सरला शांताला म्हणाली, "तुझ्या वडिलांच्या सासऱ्याच्य एकुलत्या एका मुलीची मी मुलगी आहे." तर त्या दोघांमध्ये कोणते नाते आहे ?

उत्तर --- बहीण -- बहिण
----------------------------
(३)चंद्रकला रमाला म्हणाली, "तुझ्या वडिलांच्या पत्नीची सासू माझी आई लागते." तर चंद्रकला ही रमाची कोण लागते ?

उत्तर --- आत्या
----------------------------------------------
(४) कुंदन दीपकला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे, " तर त्या दोघांचे नाते काय ?

उत्तर --- भाऊ - भाऊ
----------------------------------------------
(५) सुजित आणि आनंद यांच्या आईचे वडील एकच आहेत पण ते सख्खे भाऊ नाहीत व सावत्रही नाहीत तर त्या दोघांमधील नाते कोणते ?

उत्तर --- मावसभाऊ
----------------------------------------------
(६) रंजनाच्या मामाचा मुलगा शाम आहे. तर शामची आई ही रंजनाची कोण ?

उत्तर --- मामी
----------------------------------------------
(७) रघूच्या आत्याची वहिनी श्रीकांतची आई आहे, तर रघूचे वडील श्रीकांतचे कोण आहेत ?

उत्तर --- वडील
----------------------------------------------
(८) अविनाश हा करिश्माचा भाऊ आहे. रागिणी ही करिश्माची आई आहे. अविनाश हा गोविंदचा मुलगा आहे. तर गोविंद आणि रागिणी कोण ?

उत्तर --- पती -- पत्नी
----------------------------------------------
(९) ममताची आई ही रमेशची सासू आहे. गोपाळ हा ममताचा मुलगा आहे. तर गोपाळच्या बहिणीचे रमेशशी नाते काय ?

उत्तर --- वडील
----------------------------------------------
(१०) माझ्या बायकोच्या वडिलांच्या भावाची भावजय ही माझ्या मुलाची कोण असेल ?

उत्तर --- आजी
----------------------------------------------
(११) यशची आई ही गोविंदची आत्या आहे. तर गोविंदची आई यशची कोण आहे ?

उत्तर --- मामी
----------------------------------------------
(१२) माझ्या वडिलांच्या वडिलांचा नातू हा माझ्य वडिलांचा कोण लागतो ?

उत्तर --- मुलगा
----------------------------------------------
(१३) गोपीच्या बायकोचा भाऊ म्हणजेच माझे वडील. तर गोपी माझा कोण ?

उत्तर -- आत्याचा नवरा
----------------------------------------------
(१४) आनंदच्या बायकोची सासू माझी बहीण आहे. तर मी आनंदचा कोण ?

उत्तर --- मामा
----------------------------------------------
(१५) श्वेताच्या भावाच्या वडीलाच्या पत्नीचे श्वेताच्या आजीशी काय नात असेल ?

उत्तर --- सासू - सून
----------------------------------------------
(१६) कमल व विमल या बहिणी आहेत. कावेरी व जमुना या सुद्धा बहिणी आहेत. कावेरीचे वडील हे विमलचे भाऊ आहेत तर जमुना ही कमलची कोण ?

उत्तर --- भावाची मुलगी
----------------------------------------------
(१७) एका व्यक्तीचा मुलगा हा माझ्या मुलाचा बाप आहे. तर ती व्यक्ती माझी कोण ?

उत्तर -- वडील
----------------------------------------------
(१८) 'अ' आणि 'ब' ही 'क' ची मुले आहेत. 'क' हा 'अ' चा पिता आहे पण 'अ' हा 'क'चा मुलगा नाही. तर 'अ' हा 'ब' चा कोण ?

उत्तर --- बहीण
----------------------------------------------
(१९) एका व्यक्तीचा मुलगा माझ्या मुलाचे काका आहेत. तर ती व्यक्ती माझी कोण ?

उत्तर --- वडील
----------------------------------------------
(२०) सुरेश हा रविनाच्या आत्याला आई म्हणतो तर रविनाचे वडील सुरेशच्या बहिणीचे कोण ?

उत्तर --- मामा
----------------------------------------------
(२१) शरदच्या वडिलांना भाऊ-बहीण नाही. पण शरद हा रवींद्रचा भाचा आहे. तर रवींद्र हा शरदच्या वडिलांचा कोण?

उत्तर --- मेहुणा
----------------------------------------------
(२२) मोहनची मावशी प्रियाची आत्या आहे. तर मोहनचे व प्रियाच्या वडिलांचे नाते काय ?

उत्तर --- मामा - भाचे
----------------------------------------------
(२३) ब्रीज हा आनंदचा मामा आहे तर आनंदची आई ब्रीजच्या वडिलांची कोण ?

उत्तर --- मुलगी
----------------------------------------------
(२४)कल्पनाच्या भावाची पत्नी माधुरी आहे. माधुरीचा मुलगा सचिन आहे. तर सचिन कल्पनाचा कोण आहे?

उत्तर --- भाचा
----------------------------------------------
(२५) प्रशांतचे वडील महादेवचे काका आहेत तर प्रशांतची पत्नी व महादेवची मुलगी यांचे नाते काय ?

उत्तर --- काकू - पुतणी
----------------------------------------------
(२६) राघवच्या वडीलांचा भाऊ रमेश आहे. रमेशची बायको डिंपल आहे. तर डिंपल ही राघवची कोण ?

उत्तर --- काकू
----------------------------------------------
(२७) माझ्या मित्राच्या बायकोची मुलगी प्रेरणा आहे. प्रेरणाच्या आजीची सून व प्रेरणाचे नाते काय ?

उत्तर --- आई - मुलगी
----------------------------------------------
(२८) माझ्या मुलाचा मुलगा रमेश आहे. तर माझा मुलगा व रमेशची यांचे नाते काय ?

उत्तर --- पती - पत्नी
----------------------------------------------
(२९) दोन स्त्रिया एके ठिकाणी बसल्या होत्या. एक व्यक्ती तेथे आली. त्यावर एक स्त्री दुसरीला म्हणाली, "आजी, आत्याचा मुलगा आला आहे." तर दोघींपैकी वयस्कर स्त्रीचे आलेल्या व्यक्तीशी नाते काय ?

उत्तर --- नातू
----------------------------------------------
(३०) निशाच्या बहिणीच्या मुलाचे वडील हे निशाचे कोण ?

उत्तर --- बहिणीचा नवरा
----------------------------------------------
(३१) 'अ' हा 'ब' चा पती आहे. 'क' हा 'अ' चा मुलगा आहे. 'ड' ही 'क' ची बहीण आहे. तर 'ड' चे 'ब' शी नाते काय ?

उत्तर --- मुलगी
----------------------------------------------
(३२) संगीता ही विजयच्या आईच्या मुलाच्या मुलाची आई आहे. तर ती विजयची कोण ?

उत्तर --- पत्नी
----------------------------------------------
(३३) प्रकाशची मुलगी सुरेशच्या मुलाच्या बहिणीची चुलतबहीण आहे. तर प्रकाशची आई सुरेशची कोण ?

उत्तर --- आई
----------------------------------------------
(३४) गोविंद हा प्रीतीच्या आजीचा मुलाचा मुलगा आहे. तर प्रीती ही गोविंदची कोण ‌?

उत्तर --- बहीण
----------------------------------------------
(३५)  माझ्या बायकोच्या भावाच्या आजीचा मुलगा माझा कोण ?

उत्तर --- सासरा
----------------------------------------------
(३६) अप्सराच्या नवऱ्याची आई व अप्सराच्या आईच्या नवऱ्याची मुलगी यांचे नाते काय ?

उत्तर --- सासू - सून
==============================
संकलक :-  शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -  रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment