माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 30 November 2021

रसविचार ( व्याकरण मराठी भाषाभ्यास )


✓माणसाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. 

✓काही भावना स्थिर व कायमस्वरूपी (शाश्वत) असतात.
 उदा., आनंद, दुःख, राग, भीती इत्यादी.

✓ साहित्यामधील गदय व पदय या प्रकारांत अनेकविध भावनांचे आविष्करण होते. या भावनांना 'रस' म्हणतात. साहित्यातील हे रस अनुभवणे म्हणजे 'रसास्वाद' होय.

मराठी कुमारभारती नवनीत : इयत्ता नववी

✓स्थायिभावाची उत्कट स्थिती म्हणजे रस होय.

एकूण नऊ रस आहेत : (१) करुण (२) शृंगार (३) वीर
(४) हास्य (५) रौद्र (६) भयानक (७) बीभत्स (८) अदभुत
(९) शांत.

■ रस व साहित्यातील भावनांचे वर्णन खालील प्रमाणे अभ्यासूया.
(१) करुण --
शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना यांचे
साहित्यातील वर्णन.

(२) शृंगार --
स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकूळ मन यांचे साहित्यातील वर्णन.

(३) वीररस --
 पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचे साहित्यातील वर्णन.

(४) हास्य --
विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, चेष्टा-मस्करी यांचे
साहित्यातील वर्णन.

(५) रौद्र --
क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप यांचे
साहित्यातील वर्णन.

(६) भयानक --
भयानक वर्णने, भीतिदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या यांचे साहित्यातील वर्णन.

(७) बीभत्स --
 किळस, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावनांचे साहित्यातील
वर्णन.

(८)अद्भुत --
 अद्भुतरम्य विस्मयजनक, आश्चर्यकारक भावनांचे साहित्यातील वर्णन. 

(९) शांत --
भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे साहित्यातील वर्णन.
================================
स़ंकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
          जिल्हा परिषद शाळा - जामनेपाडा 
          केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
         ९४२२७३६७७५

Saturday, 27 November 2021

मराठी वाक्य वाचा आणि लिहा.



मी खेळतो.
मी खेळलो.
मी खेळणार.
मी खेळत आहे. 
मी खेळत होतो
मी खेळत असेल.
मी खेळलो आहे. 
मी खेळलो होतो.
मी खेळलो असेल.
मी खेळत आलेला आहे. 
मी खेळत आलेला होतो.
मी खेळत आलेला असेल.
मी खेळु शकतो.
मी खेळु शकलो.
मी खेळेन.
मी कदाचित खेळेन.
मी खेळेनच.
मी खेळायला पाहिजे.
मी खेळीन.
मी खेळायला पाहिजे. 
मी खेळु शकलो आहे.
मी खेळु शकलो असतो.
मी खेळलो असेल.
मी कदाचित खेळलो असेल.
मी खेळलो असेलच.
मी खेळायला पाहिजे होत.
मी खेळलो असतो.
मी खेळायला पाहिजे होत. 
मला खेळाव लागत.
मला खेळाव लागल. 
मला खेळाव लागेल.
मी खेळण्याच्या बेतात आहे.
मी खेळण्याच्या मार्गावर आहे. 
मी खेळण्याची शक्यता आहे.
मी खेळण्यास समर्थ आहे.
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Friday, 26 November 2021

आपले संविधान ( भारतीय संविधान )



(१) भारतीय संविधान.

---- लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार चालवण्यासाठी संविधानाची गरज होती. त्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या सभेने स्वीकारलेल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली. भारतीय संविधान हे लिखित स्वरूपात असून त्यात भारतीय नागरिकांचे हक्क स्पष्ट केलेले आहेत. तसेच नागरिकांची कर्तव्येही सांगितली आहेत. संविधानात 
दिलेल्या नियमांनुसार आपले प्रतिनिधी राज्यकारभार 
करतात.
-----------------------------------------------------
(२) संविधान सभा.

----- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी लिखित संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद हे या सभेचे अध्यक्ष होते. संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. या मसुदा समितीने संविधानाला अंतिम रूप दिल्यावर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले.
----------------------------------------------------
(३) भारतीय संविधान का निर्माण करण्यात आले?

----- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी संविधान निर्माण करण्यात आले आहे. राज्यकारभार करताना लोकप्रतिनिधी संविधानातील नियमांचा आधार घेतात. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही. संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्येही सांगितली असल्याने नागरिकांनाही संविधानाचा उपयोग होतो.
---------------------------------------------------
(४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 
----- संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी एक मसुदा समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधानाला अंतिम स्वरूप देण्याचे मोलाचे कार्य केले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५