माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 25 November 2021

आपले संविधान ( भारतीय संविधान )



(१) भारतीय संविधान.

---- लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार चालवण्यासाठी संविधानाची गरज होती. त्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या सभेने स्वीकारलेल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली. भारतीय संविधान हे लिखित स्वरूपात असून त्यात भारतीय नागरिकांचे हक्क स्पष्ट केलेले आहेत. तसेच नागरिकांची कर्तव्येही सांगितली आहेत. संविधानात 
दिलेल्या नियमांनुसार आपले प्रतिनिधी राज्यकारभार 
करतात.
-----------------------------------------------------
(२) संविधान सभा.

----- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी लिखित संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद हे या सभेचे अध्यक्ष होते. संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. या मसुदा समितीने संविधानाला अंतिम रूप दिल्यावर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले.
----------------------------------------------------
(३) भारतीय संविधान का निर्माण करण्यात आले?

----- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी संविधान निर्माण करण्यात आले आहे. राज्यकारभार करताना लोकप्रतिनिधी संविधानातील नियमांचा आधार घेतात. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही. संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्येही सांगितली असल्याने नागरिकांनाही संविधानाचा उपयोग होतो.
---------------------------------------------------
(४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 
----- संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी एक मसुदा समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधानाला अंतिम स्वरूप देण्याचे मोलाचे कार्य केले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

1 comment: