रमण फणस उचल.
कमल रस बनव.
रमण हरण बघ.
बबन फणस बघ.
अभय कसरत कर.
कमल घर बघ.
अजय वजन कर.
पवन फणस बघ.
तनय नमन कर.
भरत दगड उचल.
मगन सरबत कर.
समर लवकर पळ.
गणपत रस बनव.
शरद गड चढ.
कमल सरळ बस.
मदन लवकर पळ.
रतन घर बघ.
अजय समई पकड
छगन चटई उचल.
अकबर पटपट चल.
मगन फणस धर.
भरत दगड उचल.
अमर मदत कर.
अभय मगर बघ.
अभय हरण बघ.
करण पटकन वर चढ.
अमर झटपट चल.
करण दगड उचल.
अभय बदक पकड.
शरद हरण बघ.
गणपत फणस उचल.
मदन खडक बघ.
हसन भरभर चल.
सई सरबत कर.
आई घर बघ.
रमण चहा कर.
मदन कप आण.
भरत वजन कर.
कमल परकर आण.
बबन मदत कर.
मगन सरबत कर.
जगन वजन कर.
रमण पटकन चल.
------------------------
सई समई आण.
माई पपई आण.
दादा रवा आण.
ताई नारळ आण.
सागर ससा बघ.
रमा ससा बघ.
सदा कागद आण.
ताई नाव बनव.
रतन तबक आण.
बाबा साप बघा.
माया कागद काप.
बाळ पाटावर बसला.
बाबा पापड खा.
मामा चहा झाला.
पावसाळा जवळ आला.
मामा गावाला चला.
ताई भात वाढा.
आबा बदाम खा.
नाना पापड आण.
शारदा तारा पाहा.
नारायण बाजार कर.
सामना छान झाला.
रामा बटाटा उचल.
माधव कागद काप.
लाल झालर लावा.
काकाचा हात भाजला.
अक्षय उतारा वाच.
ताई पसारा आवर.
बाबा खाऊ आणा.
कावळा झाडावर बसला.
आकाश ढग पहा.
सदा कागद आण.
वामन कागद काप.
लता बटाटा काप.
ससा धावत आला.
घरात समई लावा.
आई वरणभात वाढ.
सागर बाग बघ.
---------------------------
चिमा दिवा लाव.
विमल शिरा कर.
किसन चारा आण.
विजय गणित कर.
दिवस उगवला बघा.
किरण दिवा लाव.
चिवडा तिखट झाला.
वनिता कविता कर.
मनिषा विमान बघ.
अनिल रजई टाक.
विराज जिराफ बघ.
सविता विचार कर.
विकास शिरा खा.
विनायक समई धर.
सचिन सनई बघ.
विनय चिमटा पकड.
शितल कापड भिजव.
फळात बिया असतात.
आमचा परिपाठ छान झाला.
दिवस मावळला, दिवा लावा.
सिमा मालिका बघ.
शिला चिवडा आण.
निशा मिसळ खा.
सिता सविता या.
रिना, गिता पटकण या.
अनिता गणित कर.
विशाल चिवडा खा.
बाबा कपिला गाय पहा.
कमवा आणि शिका
राधिका विमान पहा.
बाबा फिरायला चला.
शिला दिवा लाव.
कपिला गाय पहा.
अनिता गणित कर.
आज निकाल लागला.
-----------------------------
आरती पाणी आण.
ताई खीर कर.
आई खीर वाढ.
सीमा भाजी कर.
आज गवळी आला.
नीला पाणी आण.
आरती खाडी बघ.
भीम सनई उचल.
दीपा समई लाव.
राणी पाणी बघ.
सीमा पणती लाव.
आरती काठी आण.
ताईला मदत झाली.
लाल मिरची आणली.
मामी आजारी पडली.
आई गरम भजी कर.
नीता तापी नदी बघ.
आजी बादली भरली.
आई ताजी भाजी आण.
हिरकणी गडावर चढली.
मीना गडावर चढली.
आजी भाजी कर.
मीरा यादी कर.
सीता पाणी आण.
आई खीर वाढ.
राणी पाणी आण.
माझी परीक्षा झाली.
----------------------
कुसुम बाहुली आण.
चुलीवर भाजी कर.
शुभम मुरली वाजव.
सुशिला फुलदाणी आण.
मधुकर चहा पी.
आगगाडी झुकझुक चालली.
लहान माझी बाहुली.
मुलगा मुलगी एक समान.
सुनिता भाजी शिजव.
रुपाली गुरुवार आला.
कविता गुलाब आण.
माझी शाळा सुटली.
मुरली हुशार झाला.
दादा पुतळा बघ.
मधुकर सुतारकाम कर.
सुधाकर काम कर.
आज बुधवार आला.
सुमन दिवा लाव.
कुमुद गजरा बघ.
आई गुळाचा चहा कर.
छान मुकुट आणला.
सुजाता मुकुट घाल.
युवराज मुजरा कर.
नुकताच पाऊस झाला.
रघुनाथ तुझा फुगा फुटला.
--------------------------------
सदू गूळ आण.
यमू दूध आण.
मधू लाडू आण.
पूनम खाली बस.
सुमन वाळू आण.
मयूर पूजन कर.
कापूर भरभर जळाला.
चूका करू नका.
-------------------------------
वेणू नवे कपडे आण.
सगळे शेतात गेले.
केशव पेढा आण.
रेवजी केक काप.
तेजस भेळ खा.
देवराज देणगी दे.
केतकी पातेले धर.
उषा पहाटे उठली.
देवळात देव आहे.
भारत माझा देश आहे
शेखर खेळायला जा.
शाळेची हजेरी झाली.
चला खेळ खेळायला.
शाळेत नकाशे आहेत.
माझे नाव केशव आहे.
मला बेडूक दिसला.
आज केस काळे केले.
-----------------------------
सनी कॅरम खेळ.
अजय बॅट उचल.
कमल बॅटरी आण.
जगन पॅड आण.
पवन फॅन उचल.
मगन कॅमेरा आण.
मी बॅट आणली.
आज गॅस हंडी भरली.
मी फॅन आणला.
---------------------------
मैना कैरी उचल.
कैलास कैरी आण.
शैला कैरी काप.
भैरू रानात आला.
वैशाली पैसे घे.
वैभव कैरी उचल.
थैलीतून पैसे काढ.
कैलास बैल बघ.
शैलेश पैसे आण.
कैफ थैली धर.
मैना वैरण घाल.
शैला मैदानावर जा.
चैताली मैदानात जा.
कैलास पैठणला गेला.
मैना नैनाला पकड.
बैरूने बैल आणला.
कैलास बैलगाडीत बसला.
मैनाने लैलाला मारले.
वैशालीचे वैभव बघा.
शैलेश वैरण काप.
भैया सैदापूरला गेला.
हैदरने सैल कपडे घातले.
सैनिक तैनात झाले.
वैदही शाळेत गेली.
मैदानावर पैसे पडले.
वैशाली कॅरम खेळ.
मुले सैरावैरा पळाले.
बैलगाडी छान आहे.
वैतरणा नदी आहे.
झाडावरून कैरी पडली.
सैनिक देशाची सेवा करतात.
आईला पैठणी साडी आवडते.
मैदानावर फिरायला चला.
------------------------------------
आज सोमवार आहे.
मोनिका ओढणी घे.
बाळाने डोस घेतला.
मोती दोरी पकड.
सोनाराने कान टोचले.
पोपट झाडावर बसला.
मनोज मोदक आण.
रोपटे मोठे होईल.
शोभा भोवरा पकड.
रोहिणी फोटो काढ.
शेतात मोर आला.
मोहन घरी आला.
तो कावळा बघ.
मोराने पिसारा फुलवला.
मैदानावर घोडा पळतो.
आजोबा झोका खेळा.
मोराने पिसारा फुलवला.
भारतात लोकशाही आहे.
सोलापूरला चादर मिळते.
रानात मोर नाचू लागले.
गोगलगाय हळू चालते.
घोडागाडी वेगाने धावली.
आज शाळेत फोटो काढला.
पोपटाची चोच लाल आहे
सोपानला जोरात खोकला आला.
घोडा जोराने पळतो.
-----------------------------------
मी बाॅल आणला.
मला काॅईन सापडला.
मी बाॅटल भरली.
मी बाॅल खेळतो.
मी हाॅटेलात जेवण केले.
आजीने लाॅकेट दिले.
मी काॅफी पितो.
अजय वाॅचमन आहे.
रतन फुटबॉल खेळतो.
-----------------------------
चौघे खेळत होते.
चौकोनी कागद कापा.
सौरभ औषध घे.
पोलिस चौकीत गेले.
चौदा तारीख आली.
चौथा शनिवार होता.
सडक चौपदरी आहे.
तौसिफ शाळेत आला.
गौतमी खेळ खेळते.
-----------------------------
पतंग उंच उडाला.
मुले रंग खेळतात.
जंगलात फिरायला चला.
कंपनी बंद पडली.
नंदा कांदा आण.
मुंबईला दंगा झाली.
बाबा पंखा आणा.
गांधी जयंती आली.
पतंग आकाशात उडतात.
आईला आनंद झाला.
=========================
लेखन / संकलन :-
शंकर मुराबाई सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६