माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 15 October 2026

मिसाईल मॅन ( डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम )

देशाचे झाले तुम्ही मिसाईल मॅन 
नाही विसरणार आम्ही तुमचे योगदान 
रामेश्वरम गावातून जन्मलेले भारतरत्न 
सूर्य होऊन जळत राहिले तुमचे कठोर प्रयत्न

आकाशी उड्डाणाचा धरूनी तुम्ही ध्यास 
अग्नीबाणाच्या रूपाने बनले तुम्ही खास 
अग्नीबाणाच्या निर्मितीने जग चकीत झाले 
तुमच्या कार्याचा डंका जगभर गेले

पृथ्वी, अग्नी, नाग अशी क्षेपणास्त्रे तुम्ही निर्मिली
शक्तिशाली देशाची कीर्ती जगभर नेली
स्वप्न क्षेपणास्त्रे तयार करण्याचे पाहत होते 
देशाच्या भविष्यासाठी कधी तुम्ही थकले नव्हते

देशाला उंच शिखरावर नेण्यासाठी केली आण 
तन-मन अर्पण करूनी देशाची उंचावली मान
दूरदृष्टी अन् कार्य थोर, अलौकिक हे असे 
तुमच्या कार्याने आपला देश जगात उठून दिसे

धन्य कलाम चाचा देशप्रेमाची तुमची महती 
भारतासाठी आयुष्य वेचले, पावन झाली धरती 
आपल्या विचाराने आम्ही देश घडविणार 
देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करणार

लेखक / कवी :- शंकर चौरे सर 
गरताड गावठाण ता. साक्री, जि. धुळे 
9422736775  / 7721941496

मिसाईल मॅन ( विशेष सामान्यज्ञान )

(१) डाॅ. अब्दुल कलमांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर  -- अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
----------------------------
(२)डाॅ . ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म कधी व कोठे झाला  ?
उत्तर  ---  १५  ऑक्टोबर १९३१, रामेश्वर
----------------------------
(३) डाॅ.  ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म ठिकाण कोणत्या राज्यात आहे  ?
उत्तर ---  तामिळनाडू
----------------------------
(४) डाॅ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा मृत्यू वयाच्या ८३ व्या वर्षी कधी व कोठे झाला ?
उत्तर ---  २७ जुलै २०१५ ,  शिलाॅग
--------------------------
(५) शिलाॅग कोणत्या राज्याची राजधानी आहे  ?
उत्तर ---  मेघालय
--------------------------
(६) डाॅ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय  ?
उत्तर ---  अग्निपंख
--------------------------
(७) डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कविता संग्रहाचे नाव काय  ?
उत्तर  --  माय जर्नी
--------------------------
(८) डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला  ?
उत्तर ---  १९९७
-------------------------
(९) डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन महाराष्ट्र शासन काय म्हणून साजरा करते  ?
उत्तर ---  वाचन प्रेरणा दिन
-------------------------
(१०) डाॅ. ए.पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे  कितवे राष्ट्रपती होते  ?
उत्तर ---   ११ वे
-------------------------
(११) भारतातील कोणत्या राष्ट्रपतीचा उल्लेख मिसाईल मॅन म्हणून करतात  ?
उत्तर ---  डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
-----------------------------
(१२) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे टोपण नाव काय आहे ?
उत्तर -- मिसाईल मॅन
========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गरताड गावठाण 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६ 

Wednesday, 14 October 2026

भाषिक उपक्रम -- ऐकूया सांगूया.

(१) सूर्य सकाळी उगवतो.
      सूर्य संध्याकाळी मावळतो.
----------------------------------
(२) बदक पाण्यात पोहते.
      घार आकाशात उंच उडते.
----------------------------------
(३) उन्हाळ्यात कडक ऊन असते.
     हिवाळ्यात थंडी वाजते.
----------------------------------
(४) ऊस गोड असतो. 
      मिरची तिखट असते.
----------------------------------
(५) चिंचेचे पान छोटे असते. 
     वडाचे पान मोठे असते.
----------------------------------
(६) कापसापासून कापड बनते. 
      ऊसापासून साखर बनते.
----------------------------------
(७) मेथी, शेपू, पालक या पालेभाज्या आहेत. 
     पालेभाज्या नेहमी खाव्यात.
-----------------------------------
(८) गावाबाहेर आमचे शेत आहे. 
     शेतात बाजरी पेरली आहे.
-----------------------------------
(९) सकाळी लवकर उठावे.
     दात घासावेत. स्वच्छ अंघोळ करावी.
-----------------------------------
(१०) सायकलला दोन चाके असतात. 
       सायकल रस्त्यावरून पळते.
-----------------------------------
(११) आकाशात ढग येतात.
       मुसळधार पाऊस पडतो.
       सगळीकडे पाणीच पाणी होते.
----------------------------------
(१२) मला दोन हात आहेत.
       मी हाताने जेवतो.
       मी हाताने लिहितो.
----------------------------------
(१३) आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो. 
        पाण्याने अंघोळ करतो. 
        पाण्याने कपडे धुतो, भांडी धुतो.
----------------------------------
(१४) ससा गवत खातो. 
        ससा भित्रा असतो. 
        पण तो चपळ असतो.
----------------------------------
 (१५) कुत्रा पाळीव प्राणी आहे.
         तो घराची राखण करतो.
        तो शेताचीही राखण करतो.
----------------------------------
(१६) गाय पाळीव प्राणी आहे. 
        गाय गवत खाते.
        गाय दूध देते.
----------------------------------
(१७) मांजर पाळीव प्राणी आहे. 
       तिचे अंग मऊ असते.
       मांजर दूध पिते.
----------------------------------
 (१८)‌ पोपट हा पक्षी आहे.
         पोपटाचा रंग हिरवा असतो.
        त्याची चोच लाल असते.
----------------------------------
(१९) ज्वारीची भाकरी करतात. 
        गव्हाची चपाती करतात. 
        तांदळाचा भात करतात. 
        डाळीची आमटी करतात.
----------------------------------
(२०) मला दोन पाय आहेत. 
        पायांनी मी चालतो. 
         पायांनी मी पळतो, 
        मी उड्या मारतो.
----------------------------------
(२१) गावातील रस्ता मोठा आहे. 
        रस्त्यावर वाहने धावतात. 
        रस्त्याने लोक जातात. 
        सगळीकडे गर्दी असते.
-----------------------------------------
(२२) हा माझा भारत देश 
       छान छान माझा देश.
       देशात गावे आहेत.
       गावात माणसे आहेत.
      गावात नदी आहे.
---------------------------------
(२३) थंड हवा सकाळची. 
        गार हवा रात्रीची.
        गरम हवा दुपारची.
       ही तर जादू सूर्याची.
      नाही कधीच संपायची !
--------------------------------
(२४) घरातील केर दारात नको.
       दारातील केर रस्त्यात नको. 
       सारा केर उचलू या.
      कचराकुंडीत टाकू या.
      गाव स्वच्छ ठेवू या !
------------------------------------
(२५) दातांना मंजन लावावे.
      स्वच्छ तोंड धुवावे.
     दररोज अंघोळ करावी. 
  ‌‌  वाढलेली नखे काढावीत.
    स्वच्छ कपडे घालावेत.
------------------------------------
(२६) ही पाहा माझी शाळा.
      शाळेभोवती बाग आहे.
      बागेत फुलांची झाडे आहेत. 
     आम्ही झाडांना पाणी घालतो.
     आम्ही बागेतील गवत काढतो.
-------------------------------------
(२७) मला दोन हात आहेत.
       मी हाताने जेवतो. 
     ‌ मी हाताने नमस्कार करतो.
      मी हाताने लिहितो.
     मी हाताने काम करतो.
------------------------------------
(२८)  गावात घरे आहेत.
        गावाबाहेर शेती आहे.
        शेतात विहीर आहे.
        विहिरीत पाणी आहे.
       पाण्यात मासे आहेत.
--------------------------------------
(२९) आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो. 
       आम्ही पाण्याने अंघोळ करतो. 
       आम्ही पाण्याने कपडे धुतो.
       आम्ही पाणी शेतासाठी वापरतो.
       पाणी हे जीवन आहे.
------------------------------------------
(३०) पोपट हा पक्षी आहे.
        पोपटाचा रंग हिरवा आहे. 
       त्याची चोच लाल आहे. 
       तो विठू विठू बोलतो. 
       पोपटाला पिंजऱ्यात ठेवतात.
==========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गरताड गावठाण 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
७७२१९४१४९६ / ९४२२७३६७७५