माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 11 November 2017

संकलित मूल्यमापन(तोंडी/प्रात्यक्षिक)सत्र -१

विषय:-परिसर अभ्यास -१/२ . इयत्ता चौथी
--------------------------------------------------

  प्रश्न :- एका वाक्यात उत्तरे सांगा.

१. गवताळ प्रदेशात कोणते प्राणी राहतात ?

२. पावसाळ्यात कोणत्या रोगांची साथ येते ?

३. कापणी म्हणजे काय ?

४. गोव-या कशापासून बनवतात  ?

५.आपल्या परिसरातील वनस्पतींची नावे सांगा.

६. झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो  ?

७. दूध देणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

८. धरण कशावर बांधतात  ?

९. कोणत्याही पाच कडधान्यांची नावे सांगा.

१०. माणूस स्थलांतर का करतो  ?

११. निसर्गनिर्मित गोष्टी सांगा.

१२. महाराष्ट्रातील जलदुर्गाची नावे सांगा.

१३. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत लेणी
      आहेत.

१४. फुलपाखराला पाय किती असतात ?

१५. फुलपाखरांच्या वाढीच्या चार अवस्था
      कोणत्या ?

१६. पोहरा म्हणजे काय ?

१७. रेशीम धागा कशापासून मिळतो ?

१८. आपण कोणते पदार्थ पितो  ?

१९. आपल्या जेवणातील मुख्य अन्नपदार्थ
      कोणते ?

२०. निर्धोक पाणी कशास म्हणतात  ?

२१. गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ
      बनवले जातात  ?

२२. पाणपोई म्हणजे काय  ?

२३. महाराष्ट्रातील दोन धरणांची नावे सांगा.

२४. धरणातील पाण्याचा कशासाठी वापर
      केला जातो  ?

२५. पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय  ?

२६. पाण्यात विरघळणारे चार पदार्थ सांगा.

२७.पाण्यात न विरघळणारे चार पदार्थ सांगा.

२८.पाण्यात तरंगणा-या दोन वस्तूंची नावे सांगा.

२९.पाण्यात बुडणा-या दोन वस्तूंची नावे सांगा.

३०.पाणी साठवायच्या भांड्यांची नावे सांगा.

३१. पाण्याचे उपयोग सांगा.

३२. कोणत्याही पाच धान्यांची नावे सांगा.

३३. कोणत्याही पाच फळांची नावे सांगा.

३४. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती पिके
      घेतली जातात  ?

३५. तेलबियांची नावे सांगा.

३६. तुमच्या आवडीच्या कोणत्याही एका
      पदार्थाचे नाव सांगा.

३७.कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात ?

३८. आहार म्हणजे काय  ?

३९. लोणी,  तूप, दही कशापासून मिळते  ?

४०.आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते ?

४१. समुद्रातून व समुद्राच्या पाण्यापासून
     मिळणारे खाद्यपदार्थ कोणते  ?

४२. मिठागर म्हणजे काय ?

४३.  ' खळे ' म्हणजे काय  ?

४५. वातावरण म्हणजे काय  ?

४६.छत्रपती शिवरायांच्या आईचे नाव काय ?

४७. शिवरायांच्या वडिलांचे नाव काय  ?

४८. स्वराज्य म्हणजे काय  ?

४९. शिवरायांनी कोणते कार्य हाती घेतले ?

५०. शिवरायांचे संपूर्ण नाव सांगा.

५२. महाराष्ट्रात कोणते संत होऊन गेले  ?

५३. संत ज्ञानेश्वरांच्या भावंडांची नावे सांगा.

५४. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी
      केला  ?

५५. आदिलशाहाने शहाजीराजांना कोणता
       किताब दिला  ?

५६.शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते
      खेळ खेळत असत ?

५७.शिवाजीराजांचा जन्म केव्हा झाला ?

५८.दादाजी कोंडदेवांवर कोणती जबाबदारी
      होती  ?

५९. स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा शिवरायांनी
      वयाच्या कितव्या वर्षी घेतली  ?

६०. ' माची ' म्हणजे काय  ?

६१.महाराष्ट्रातील कोणत्याही दोन किल्ल्यांची
    नावे सांगा.

६२.शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती ?

६३. शिवरायांच्या स्वराज्याला कोणते सरदार
       विरोध करीत होते  ?
------------------------------------------------
         प्रात्यक्षिक

महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सांगितल्याप्रमाणे
कोणत्याही पाच स्थळे( ठिकाणे) दाखविता येणे.
-----------------------------------------

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि. धुळे
                ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment