माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 30 April 2018

माझा महाराष्ट्र



  माझा महाराष्ट्र नावाप्रमाणेच महान आहे.
म्हणून मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान
वाटतो.
  १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व मराठी
ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे.
  महाराष्ट्र हा बहुतांश डोंगराळ प्रदेश ; पण
मराठी माणसाने कष्ट करून त्याला सुपीक
बनवले. ऊस पिकवून साखर कारखाने उभारले.
फळाफुलांच्या बागा फुलवल्या. महाराष्ट्रातल्या
हापूस आंब्याने आज सारे जग जिंकले.
  माझ्या महाराष्ट्राला देदीप्यमान इतिहास आहे.
श्रीशिवरायांनी पहिले जनतेचे राज्य उभारले.
त्या काळाची आठवण देणारे अनेक गड, दुर्ग
महाराष्ट्रात आहेत. शिल्पकारांच्या बोटातील
जादू दाखवणारी अजिंठा - वेरूळची लेणी
महाराष्ट्रात आहेत.  गोदावरी, भीमा, चंद्रभागा
या नद्यांकाठची तीर्थक्षेत्रे आणि अनेक मंदिरे
यांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. मुंबई ही भारताची
आर्थिक व औद्योगिक राजधानी आहे. शिक्षण
व साहित्य या क्षेत्रांत महाराष्ट्र सदैव अग्रभागी
आहे. महाराष्ट्रात अनेक नररत्ने जन्माला आली.
सचिन तेंडुलकर सारखे भारतरत्न महाराष्ट्राची
छान आहे. महाराष्ट्राचा मराठी बाणा जगात
विख्यात आहे.

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि. प. प्रा.शाळा बांडीकुहेर
              ता. साक्री जि. धुळे
               📞९४२२७३६७७५

Thursday 26 April 2018

विजेचा अपव्यय


  विजेचा गैरवापर आपल्या सर्वांना आणि 
पर्यावरणाला हानिकारक आहे. आज 
वीजनिर्मिती करण्यासाठी पाण्याचा किंवा 
कोळशाचा किंवा अणुऊर्जेचा वापर करण्यात 
येतो. अजूनही सौरऊर्जा तितकी परवडत 
नसल्याने वापरली जात नाही. त्यामुळे ऊर्जा  
निर्मितीसाठी लागणारे साधन संपत्तीचे नुकसान 
लक्षात घेता आपण विजेचा गैरवापर टाळावा. 
  अनेकदा दिवे चालू ठेवणे, फॅन चालू ठेवणे. 
किंवा वीजेवर चालणारे यंत्र विनाकारण सुरू 
ठेवणे अश्या सवयी लागतात. त्या दूर कराव्या.
शाळेत, ट्युशनमध्ये,घरी किंवा कुठल्याही 
सार्वजनिक ठिकाणी आपण वीजेचा गैरवापर 
टाळायची सवय लावूया. 
 पौर्णिमेला चंद्र प्रकाश खूप असतो. त्यावेळी 
विजेचा कमी वापर करावा. चंद्राचा शीतल 
प्रकाश वापरावा. 

 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि. प. प्रा. शाळा बांडीकुहेर 
                ता.साक्री जि.धुळे 
               📞 ९४२२७३६७७५

Thursday 19 April 2018

आपली संस्कृती आणि पर्यावरण


( आजच राखल पर्यावरणाचे भान, पुढच्या पिढीकडून मिळेल मान )
  ■ घरच्या घरी करता येण्यासारखे....

   बाजारातून कोणतीही गोष्ट खरेदी करताना 
प्लॅस्टिक बॅग्ज ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर 
हा पर्यावरणाला अत्यंत पूरक असा पर्याय आहे. 
प्लॅस्टिक बॅग्ज किंवा प्लॅस्टिक बाटल्यांमुळे 
निसर्गात न जिरणारा कचरा तयार होतो आणि 
तो पर्यावरणाला मारक ठरतो. गाई - म्हशीं -
सारख्या जनावरांच्या खाण्यात या पिशव्या 
येतात आणि अन्ननलिकेत अडकून ही जनावरे 
आपल्या प्राणास मुकतात. अनेकदा प्लॅस्टिक 
बॅग्ज सार्वजनिक नाला किंवा ड्रेनेज मध्ये 
अडकून बसतात आणि बिकट परिस्थिती 
निर्माण होते. तसेच आपण ज्या कागदी पिशव्या 
वापरतो त्या झाडापासून तयार केलेल्या असतात. 
त्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर टाळल्यास 
निसर्गाची हानी काही प्रमाणात कमी होऊ
शकते. या सर्व गोष्टींवर मात करण्यास कापडी 
पिशव्या हा उत्तम उपाय आहे. 

● घरातील जून्या मजबूत कपड्यांच्या पिशव्या 
   शिवल्यास त्या अनेक दिवस आपल्याला 
   वापरता येतात. 

● कमीत कमी पैशात कापडी पिशव्या तयार 
   होऊ शकतात. 

● टिकाऊ असल्यामुळे वारंवार वापर करता 
   येतो व धुऊन स्वच्छ करता येतात. 

● घडी करून त्या कुठेही नेण्यासारख्या 
  असल्यामुळे वापरण्यास कोणत्याही प्रकारचा
   त्रास होत नाही. 

● कापडी पिशव्या कलात्मकरित्या तयार करून 
   विकल्यास महिला बचत गटांसाठी एक उत्तम 
   कुटीर उद्योग उपलब्ध होऊ शकतो. 
-----------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
                जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
                ता. साक्री जि. धुळे 
                 📞९४२२७३६७७५

Friday 13 April 2018

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) कागद बनवण्यासाठी काय वापरतात  ?

उत्तर -- लाकूड किंवा बांबू. 

(२)ऊसाच्या चिपाडांपासून काय तयार करतात ?

उत्तर -- मद्यार्क आणि कागद. 

(३) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता  ?

उत्तर -- शेकरू  ( मोठी खार )

(४) गवताच्या कोणत्या जातीपासून तेल निघते ?

उत्तर -- गवती चहा,  रोशा,  खस. 

(५ ) पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती तास लागतात  ?

उत्तर -- चोवीस तास. 

(६) पृथ्वीवला सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ लागतो  ?

उत्तर -- एक वर्ष. 

(७) बर्फाच्या घराला काय म्हणतात  ?

उत्तर --   ' इग्लू '

(८) थर्मामीटरमध्ये भरलेल्या चकचकीत पदार्थाचे नाव सांगा. 

उत्तर --  पारा 

(९) कोळी किड्याला किती पाय असतात  ?

उत्तर -- आठ 

(१०) पंख असणारा पण पिल्लांना दुध पाजणारा प्राणी कोणता  ?

उत्तर --  वटवाघूळ 

(११) वरून काटेरी व आत रसाळ, गोड गरे असलेले फळ कोणते  ?

उत्तर -- फणस. 

(१२) कोणत्या फळाची 'बी ' फळाच्या बाहेर असते  ?

उत्तर -- काजू. 

(१३) जेथे मीठ तयार करतात, त्या जागेला काय म्हणतात ?
उत्तर -- मिठागर. 

(१४) सिमेंट तयार करण्यासाठी कोणते खनिज वापरतात ?

उत्तर -- चुनखडक .
---------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
               ता. साक्री जि. धुळे 
               ९४२२७३६७७५

Thursday 12 April 2018

उपक्रम :- कागदाची काटकसर

        कागद वनस्पतींपासून तयार होतो.तेव्हा कागदाची काटकसर हा पर्यावरण रक्षणाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तुम्ही कागदाची काटकसर कशी कराल ?

■ वहीचे कोरे कागद टराटरा फाडू नका. 

■ असे करणे गरजेचे असेल तर समासामध्ये दुमडीजवळ एक सेंटिमीटर घडी पाडून  घडीवर कागद अलगद फाडा. असे केल्याने दुमडीपलीकडचा कागद वहीमध्ये सुरक्षित राहील. 

■ कागदाच्या दोन्ही बाजूंचा लेखनासाठी वापर करा. 

■ गणितामधील उदाहरणे कच्ची सोडवण्यासाठी पाटीपेन्सिलीचा वापर करा. पाटीपेन्सिल  वापरण्यात कोणताही कमीपणा नाही. 

■ वर्षअखेर वापरलेल्या वह्यांतील राहिलेले कोरे कागद अलगद काढून त्यांच्या वह्या बांधा. त्यांचा वापर किरकोळ लेखनासाठी करा. 

■ कोणत्याही प्रकारच्या कागदाचा निरुपयोगी  म्हणून नाश करू नका. वापरलेला कागद नवनिर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो.
--------------------------------------------------
  संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
                ता. साक्री जि. धुळे 

Tuesday 10 April 2018

म.ज्योतिराव फुले तुझ्यामुळेच........


ज्योतिबा तुझ्यामुळेच मी शाळेत जाते.
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी वाचन करते 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी लेखन करते. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी भाषण करते. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी नेतृत्व करते. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी नाविन्याचा शोध घेते.
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी जागरूक झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी ज्ञानी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी स्वावलंबी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी जबाबदार झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी कष्टाळू झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी कार्यतत्पर झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी धीट झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी सुसंस्कृत झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी सुखी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी कौतुकास पात्र झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी अभिमानी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी प्रेरणादायी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी राष्ट्रपती झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मला दूरदृष्टी मिळाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच माझी प्रगती झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला गती आली 

     लेखक:- शंकर चौरे(प्रा. शिक्षक)
                 जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
                  ता.साक्री जि.धुळे 
                  📞९४२२७३६७७५ 

Monday 9 April 2018

भूकंपमापन महत्वपूर्ण माहिती

       
  भूकंप ही सदोदित घडणारी घटना आहे. 
त्यामुळे नुकसान आणि मनुष्यहानी मोठ्या 
प्रमाणावर होण्याची शक्यता असते. म्हणून 
भूकंपाची तीव्रता अजमावण्याचे प्रयत्न 
मानव नेहमीच करत आला आहे. भूकंप 
का होतात याची मानवाला पूर्वी माहिती 
नव्हती; पण भूकंपामुळे होणारे नुकसान तो 
सतत पाहत आला आहे. स्वाभाविकच झालेल्या 
हानीच्या आधारे तो भूकंपाची तीव्रता अजमावत 
आला आहे. त्याचबरोबर भूकंपाची तीव्रता 
अचूक मोजण्यासाठी तो सतत प्रयत्नशील 
राहिला आहे. 
 ● भूकंपाच्या हाद-याची नोंद करणे, हे 
   भूकंपमापीचे कार्य ( रिश्टर स्केल ) --
         भूकंप होताना जमिनीखालून मोकळ्या 
होणाऱ्या ऊर्जेमुळे जमिनीला हादरे बसून 
कमी - अधिक नुकसान होते; म्हणून भूकंपाची 
तीव्रता मोजण्यासाठी मोकळ्या झालेल्या 
ऊर्जेचे मोजमाप करणे अधिक शास्त्रीय ठरते. 
यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट 
ऑफ टेक्नॉलॉजी येथील भूवैज्ञानिक चार्ल्स 
एफ. रिश्टर यांनी १९३५ साली नवा मापक्रम 
तयार केला. हे ते रिश्टर स्केल. 

■ भूकंपाच्या तीव्रतेचा मापक्रम --
(१) भूकंपलेखी :--
    रिश्टर महत्ता  ३.५ केवळ भूकंपमापकात नोंद. 

(२) किंचित  :--
    रिश्टर महत्ता ४.२ स्वस्थ बसलेल्या, विशेषत:
   वरच्या मजल्यावरील लोकांनी जाणवतो. 

(३) मध्यम  :--
    रिश्टर महत्ता ४. ८ चालणाऱ्या लोकांना 
जाणवतो, उभी वाहने डोलतात. 

(४)काहीसा जोरदार :--
     रिश्टर महत्ता ४.९ सर्व लोकांना जाणवतो, झोपलेले जागे होतात, टांगलेल्या घंटा वाजतात. 

(५) फार जोरदार  :--
     रिश्टर महत्ता ५.५ ते ६.१ सर्वत्र भयग्रस्त 
वातावरण,भिंतीना तडे जातात,गिलावा पडतो.  

(६) विनाशक :--
    रिश्टर महत्ता ६.९ बरीच घरे पडतात. 
जमिनीला भेगा पडतात. पाण्याचे नळ तुटतात. 

(७) अनर्थकारी  :--
    रिश्टर महत्ता ७.३ भूपृष्ठाला भेगा पडतात,
अनेक इमारती नष्ट होतात, रूळमार्ग वेडेवाकडे  
होतात, जास्त उताराकडे कडे कोसळतात. 

(८) सर्वानर्थकारी :--
   रिश्टर महत्ता ७.४ ते ८.१ बहुतेक सर्व इमारती
भुईसपाट होतात. पूल कोसळतात. रूळमार्ग,
पाण्याचे नळ,  दूरध्वनीतारा या सर्वांचे कार्य 
पूर्णत: विस्कळीत होते. 

(९) पराकोटीचा संहारक  :--
     रिश्टर महत्ता ८.५ ते ८.९ भूपृष्ठावरील सर्व     
 बांधकामांचा विनाश,वस्तू हवेत फेकल्या 
जातात. जमीन तरंगरूपात वर - खाली होते. 
----------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक )
              जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
               ता. साक्री जि. धुळे 
                ९४२२७३६७७५

          
            

Sunday 8 April 2018

प्रश्न माझे - उत्तर तुमचे (पक्षी ज्ञान)


(१) बगळ्याचे इंग्रजी नाव काय  ?
(२) बगळ्याचा रंग कोणता  ?
(३) बगळ्याची चोच कशी असते  ?
(४) बगळ्याचे पाय कोणत्या रंगाचे असतात  ?
(५) बगळा कोणते अन्न खातो  ?
(६)बगळ्याचा आवाज कसा आहे  ?
(७) बगळा कोठे कोठे राहतो  ?
(५)कावळ्याचे इंग्रजी नाव काय  ?
(६) कावळ्याचा रंग कोणता ?
(७) कावळ्याची चोच कशी असते  ?
(८) कावळ्याचे पाय कोणत्या रंगाचे असतात  ?
(९) कावळा कोणते अन्न खातो  ?
(१०)कावळ्याचा आवाज कसा आहे  ?
(११) कावळा कोठे कोठे राहतो  ?
(१२) चिमणीचे इंग्रजी नाव काय  ?
(१३) चिमणीचा रंग कोणता  ?
(१४) चिमणीची चोच कशी असते  ?
(१५) चिमणी कोणते अन्न खाते  ?
(१६) चिमणीचा आवाज कसा आहे  ?
(१७) चिमणी कोठे कोठे राहते  ?
(१८)चिमणी अन्न शोधण्यासाठी कधी बाहेर पडते ?
(१९) चिमणीचे घरटे कोठे असतात  ?
(२०) पोपटाचे इंग्रजी नाव काय  ?
(२१) पोपटाचा रंग कोणता  ?
(२२) पोपटाची चोच कशी असते  ?
(२३) पोपटाच्या गळ्याचा रंग कोणता  ?
(२४)पोपटाचे पाय  कोणत्या रंगाचे असतात  ?
(२५) पोपट कोणते अन्न खातो  ?
(२६) पोपटाचा आवाज कसा आहे  ?
(२७) पोपट कोठे कोठे राहतो  ?
(२८) मोराचे इंग्रजी नाव काय  ?
(२९)मोराचा रंग कोणता  ?
(३०)मोराचे पाय कोणत्या रंगाचे असतात  ?
(३१) मोराचे अन्न कोणते  ?
(३२) मोराचा आवाज कसा आहे  ?
(३३)मोर कोठे कोठे राहतो  ?
(३४) घारीचे इंग्रजी नाव काय  ?
(३५) घारीचा रंग कोणता  ?
(३६) घार कोणते अन्न खाते  ?
(३७) कोकिळ पक्षाचे इंग्रजी नाव काय  ?
(३८) कोकिळचा रंग कोणता  ?
(३९) कोकिळा कोणते अन्न खाते  ?
(४०) कोकिळचा आवाज कसा आहे  ?
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि. धुळे (पिंपळनेर)
               ९४२२७३६७७५

Thursday 5 April 2018

विषय: -परिसर अभ्यास-१/२(इयत्ता- चौथी)

            (तोंडी  /प्रात्यक्षिक )
संकलित मूल्यमापन. सत्र - २ (प्रश्नपेढी)
     

  प्रश्न
(१)माणसाने कोणकोणती वाहने तयार केली आहेत  ?
(२) पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर करतात  ?
(३)कर्णबधिरांसाठी कोणती भाषा असते  ?
(४)दृष्टीहीन व्यक्तींसाठी कोणती लिपी असते  ?
(५)माणूस स्थलांतर का करतो  ?
(६)महाराष्ट्र दिन कधी साजरी करतात  ?
(७)महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली  ?
(८)महाराष्ट्राची राजधानी कोणती  ?
(९)महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते  ?
(१०)महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
(११)महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
(१२) उपदिशांची नावे सांगा  ?
(१३) औषधी वनस्पतींची तीन नावे सांगा  ?
(१४) नदीला पूर केव्हा येतो  ?
(१५) भूकंप म्हणजे काय  ?
(१६) नैसर्गिक संकटे कोणती  ?
(१७)आपण  'शेजारी ' कोणाला म्हणतो  ?
(१८) त्सुनामी म्हणजे काय  ?
(१९) प्रवासाची प्रमुख साधने कोणती आहेत ?
(२०) संपर्काची आधुनिक साधने कोणती आहेत ?
(२१) कोणाचे मिळून कुटुंब तयार होते  ?
(२२) कोणते राष्ट्रीय सण आपण साजरे करतो ?
(२३) आपण शाळेत कोणकोणते विषय शिकतो? 
(२४) वादळामुळे कोणते नुकसान होते ?
(२५) कळसूबाई शिखराची उंची किती आहे  ?
(२६) पौर्णिमा म्हणजे काय  ?
(२७) अमावस्या म्हणजे काय  ?
(२८) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
(२९) वाहतुकीसाठी कोणत्या प्राण्यांचा वापर केला जातो  ?
(३०) महाराष्ट्रातील कोणत्याही चार जिल्ह्याची नावे सांगा  ?

     परिसर अभ्यास - २
(३१)शिवाजीराजांचा जन्म केव्हा झाला  ?
(३२)शिवराय आणि अफजल खानाची भेट कोठे झाली  ?
(३३)लाल महाल हे कोणाचे निवासस्थान होते ?
(३४)आग्रा शहर आजच्या कोणत्या राज्यात आहे? 
(३५)शिवरायांनी कोणकोणत्या सत्तांशी संघर्ष केला 
(३६)आग्-याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले  ?
(३७)कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?
(४०) शिवरायांनी नव्या राजधानीसाठी कोणत्या गडाची निवड केली ?
(४१)शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
(४२) 'राज्याभिषेक ' म्हणजे काय  ?
(४३)शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय  ?
(४५)शिवरायांकडे सुमारे किती किल्ले होते ?
(४६) हिंदवी ' स्वराज्य म्हणजे काय  ?
(४७) गनिमी कावा म्हणजे काय  ?
        ■ प्रात्यक्षिक
● महाराष्ट्र राज्याच्या नकाशामध्ये सांगितल्याप्रमाणे      
    कोणत्याही पाच जिल्ह्यांची ठिकाणे दाखविता येणे ?

 संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
                ता. साक्री जि. धुळे 
                 ९४२२७३६७७५

Wednesday 4 April 2018

ORAL QUESTIONS.

(1) What is your name  ?
(2) What's your surname  ?
(3) What  is your school name ?
(4) What colour is the sky ?
(5) Which is your favourite  fruit  ?
(6) Which is your favourite festival ?
(7) Which is your  favourite dish  ?
(8) How do you come to school  ?
(9) Which is our national bird  ?
(10) Who says cluck cluck  ?
(11) Who is your favourite teacher ?
(12) Where do you live  ?
(13) What  is your favourite game ?
(14) How old are you  ?
(15) Tell five names of birds  ?
(16) Tell five names of fruits  ?
(17) What  do you like to eat  ?
(18) Tell five names wild animals  ?
(19) Tell five names  tame animals ?
(20) What colour is your bag  ?
(21) What colour  is your shirt  ?
(22) What is your  father's  name  ?
(23) What is your  mother's name  ?
(24) What colour is the parrot  ?
(25)When is your birthday  ?
(26) What is your favourite colour ?
(27) Which game do you play  ?
(28)What is your favourite subject  ?
(29) What is your hobby  ?
(30) Who is your best friend  ?

http://shankarchaure.blogspot.in

(31) Which animal has a trunk  ?
(32) How tall are you  ?
(33) Tell  five names of colours  ?
(34)Tell  three names of water animals ?
(35) What is your father  doing  ?
(36) When does the  sun rise  ?
(37) How many sisters have you ?
(38) How many legs  have you ?
(39) How many friends have you ?
(40) How many boys are there in 
       your school ?
(41) How many months are there 
       in a year ?
(42) How many days are there in 
        a week  ?
(43)Which month come after June ?
(44)Which month come before June ?
(45) How many days has January  ?
(46) Which day is between Monday 
        and  Wednesday  ?
(47) What colour is an apple  ?
(48) How many pencils are there in 
       your bag  ?
(50) How many players are there in a 
        cricket team  ?
(51) What day is it today  ?
(52)What is the colour of a crow  ?
(53)What is the colour of the sun  ?
(54)What is the colour of an orange  ?
(55) What is the colour of an apple  ?
(56)What is the colour of a brinjal  ?
(57)What is the colour of the sky  ?
(58)What is the colour of an egg  ?
(59)What is the colour of lotus  ?
(60)What is the colour of a leaf  ?
(61)What is the colour of a parrot  ?
============================