माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 19 April 2018

आपली संस्कृती आणि पर्यावरण


( आजच राखल पर्यावरणाचे भान, पुढच्या पिढीकडून मिळेल मान )
  ■ घरच्या घरी करता येण्यासारखे....

   बाजारातून कोणतीही गोष्ट खरेदी करताना 
प्लॅस्टिक बॅग्ज ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर 
हा पर्यावरणाला अत्यंत पूरक असा पर्याय आहे. 
प्लॅस्टिक बॅग्ज किंवा प्लॅस्टिक बाटल्यांमुळे 
निसर्गात न जिरणारा कचरा तयार होतो आणि 
तो पर्यावरणाला मारक ठरतो. गाई - म्हशीं -
सारख्या जनावरांच्या खाण्यात या पिशव्या 
येतात आणि अन्ननलिकेत अडकून ही जनावरे 
आपल्या प्राणास मुकतात. अनेकदा प्लॅस्टिक 
बॅग्ज सार्वजनिक नाला किंवा ड्रेनेज मध्ये 
अडकून बसतात आणि बिकट परिस्थिती 
निर्माण होते. तसेच आपण ज्या कागदी पिशव्या 
वापरतो त्या झाडापासून तयार केलेल्या असतात. 
त्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर टाळल्यास 
निसर्गाची हानी काही प्रमाणात कमी होऊ
शकते. या सर्व गोष्टींवर मात करण्यास कापडी 
पिशव्या हा उत्तम उपाय आहे. 

● घरातील जून्या मजबूत कपड्यांच्या पिशव्या 
   शिवल्यास त्या अनेक दिवस आपल्याला 
   वापरता येतात. 

● कमीत कमी पैशात कापडी पिशव्या तयार 
   होऊ शकतात. 

● टिकाऊ असल्यामुळे वारंवार वापर करता 
   येतो व धुऊन स्वच्छ करता येतात. 

● घडी करून त्या कुठेही नेण्यासारख्या 
  असल्यामुळे वापरण्यास कोणत्याही प्रकारचा
   त्रास होत नाही. 

● कापडी पिशव्या कलात्मकरित्या तयार करून 
   विकल्यास महिला बचत गटांसाठी एक उत्तम 
   कुटीर उद्योग उपलब्ध होऊ शकतो. 
-----------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
                जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
                ता. साक्री जि. धुळे 
                 📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment