माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 11 December 2018

शब्दसमूह व त्यांचे अर्थ

           ( भाषासौंदर्य )

 
(१) अजिंक्य
--- कधीही जिंकला न जाणारा.

(२)आदिवासी
--- अगदी पूर्वीपासून राहणारे.

(३) अंगाईगीत
--- लहानग्यांना झोपविण्यासाठीचे गाणे.

(४) उदयोन्मुख
--- उदयाला येत असलेला.

(५) एकलकोंडा
--- लोकात मिळूनमिसळून न राहणारा.

(६) कवी
--- कविता रमणारा.

(७) गायरान
--- गाईला चरण्यासाठी राखलेले रान.

(८) गीतकार
--- गीते रचणारा.

(९) जलचर
--- पाण्यात राहणारा.

(१०) तुरूंग,  कारागृह
--- कैदी जेथे ठेवतात ती जागा.

(११) दंतकथा
--- एकाने दुसर्‍यास सांगून चालत आलेली गोष्ट.

(१२) धबधबा.
--- उंचावरून पडणारा पाणलोट.

(१३) नाटककार
--- नाटक लिहिणारा.

(१४) नावाडी
--- होडी, नाव चालविणारा.

(१५) पोरका, अनाथ
---  ज्याला आईवडील नाही असा.

(१६) सनातनी
--- जुन्या रूढींना चिकटून राहणारा.

(१७) बोगदा
--- डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता.

(१८) वऱ्हाडी
--- लग्नासाठी जमलेले लोक.

(१९) वावटळ
--- वर्तुळाकार फिरणारा सोसाट्याचा वारा.

(२०) वाटाड्या
--- वाट दाखविणारा.

(२१) विधवा
--- पती मरण पावला आहे अशी स्त्री.

(२२) विधुर
--- ज्याची पत्नी मरण पावली आहे असा मनुष्य.

(२३) हुतात्मा
--- देशासाठी प्राणार्पण केलेला.

(२४) खब-या,  हेर
--- शत्रूकडील बातमी काढून आणणारा.

(२५) शिलालेख
--- दगडावर कोरून लिहिलेले.

(२६) मितभाषी
--- मोजके असे बोलणारा.

(२७) कर्मभूमी
--- कार्य करण्याचा प्रदेश.

(२८) अपूर्व
--- पूर्वी कधी न पाहिले / ऐकले असे.

(२९)  पूरग्रस्त
--- पुरामुळे ज्याचे नुकसान झाले आहे.

(३०) संगम
--- दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा.

===========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
              पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
              ९४२२७३६७७५

1 comment: