माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 16 March 2019

त्सुनामी म्हणजे काय  ?

● त्सुनामी --
     जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप होतात. अशा भूकपांमुळे सागरात अधिक लाटा येणार, हेसहज लक्षात येते. तेथे इमारती नसल्याने अशा भूकंपामुळे फारसे नुकसान होत नसेल, असे तुम्हाला वाटेल. महासागराच्या तळाशी मोठा भूकंप झाला, तर ऊर्जेमुळे 

वेगळ्या प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा सुरू होण्याच्या ठिकाणी फार उंच नसतात तथापि, खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. लाटा किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा थोडा कमी होतो, पण त्यांची उंची खूपच, म्हणजे ८ - १० मजली इमारतीपेक्षा जास्त झालेली असते. पाण्याची प्रचंड भिंत 

सरकत आल्याप्रमाणे या लाटा किनाऱ्याशी पोहोचल्यावर तेथील सगळाच परिसर पाण्याखाली जातो. या लाटांच्या जोरामुळे झाडे,इमारती कोसळतात. असंख्य माणसे आणि जनावरे मरतात. 

            महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना 'त्सुनामी लाटा' म्हणतात.

● त्सुनामी हा जपानी भाषेतील शब्द आहे. 
● त्सुनामी याचा अर्थ किनार्‍यावर येऊन धडकणारी मोठी लाट.
●  महासागरात अत्यंत दूरवर अशा लाटा निर्माण झाल्यास त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी त्याची सूचना लोकांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. या कामासाठी मानवनिर्मित उपग्रहांची मोठी मदत होऊ शकते.
   
संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775
    

No comments:

Post a Comment