माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 14 September 2019

एव्हरेस्टवीर चंद्रकला  (कविता )

 
चंद्रकला तुझ्या शौर्याचं गुणगान किती गावे
आमची गर्वाने फुलते छाती, तुझ्या धैर्याला वंदन करावे
एव्हरेस्टवर चढाई करता, हजारो शब्द स्तब्ध झाले
पराक्रमाची ती ज्योत उजळता, शब्दांनाही घायाळ केले
शौर्य मिशन तुझ्या पराक्रमाचा संदेश आम्हां देतो
ध्येय शिखर गाठण्या, उंच हिमालय खुणवितो
स्वप्न एव्हरेस्ट सर करण्याचे तू पाहत होती
जीवनाच्या कर्तृत्वाला जोखणारी तू चंद्रकला होती
बर्फाच्या थंडगार कणाकणांनी सजली असेल वाट
ध्येय गाठण्यासाठी वळणावळणांचा चढत असेल बर्फाळ घाट
चढता – चढता झाला असेल तुला थरकाप
क्षणोक्षणी आठवले असतील तुझे मायबाप
हिमालयाच्या वाटेवरती आदिवासी राणीची ललकारी
आदिवासी राणीच्या रूपातील हीच आहे झलकारी
उजाडला दिवस तो; पराक्रमाचा आणि अभिमानाचा
तिरंगा फडकवला हिमालयावरी मनातल्या संकल्पाचा
हिमालयाच्या कुशीतील नंदनवन तू पाहून आली
थंडगार बर्फाच्या जगात पराक्रमाने कीर्ती केली
वादळवारे पचवून सारे, झटत राहीलीस ध्येयासाठी
सारा आसमंत घेऊन कवेत , ताठ उभी राहीलीस यशासाठी
बर्फाळ शिखर छेदून तू , यश पदरी घेऊन आलीस
अन् हिमालयात राहुन तू ,शौर्य मोहिम पार केलीस
एक चंद्रकला हिमालययात्री, बर्फातून शिखरी गेली
फिरुनी एव्हरेस्ट शिखर, जमिनीवर क्रांती केली
इवल्या इवल्या चंद्रकलेनं देश टाकले उजळून सारे
तुझ्या तेजापुढती पडले निष्प्रभ नभीचे तारे
एक आहे आदिवासी लेक तू, दुरदर्शी तुझे धोरण
आदिवासी सोबत्यांना घेऊन एव्हरेस्टवर बांधले तोरण
चंद्रकले आपले कार्य, आमच्यासाठी पावनतीर्थ
सदैव तुझ्या कार्याला जगात मिळेल अर्थ
तरुणांसाठी तुझा आदर्श कामी येईल आता
जीवन सुंदर बनविले हिमालयाशी जोडूनी नाता
एव्हरेस्टची उंची तुझ्या शौर्याने ठेंगणी केली
देश गौरवासाठी झिजुनी समाजासाठी तू महान झाली
तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी किती छान
आई - बाबांना व गुरुंना तुझ्याबद्दल किती अभिमान   
             
पृथ्वीवर तू, आकाशात तू, सर केलं शिखर
एव्हरेस्ट सर करुन झालीस शौर्यवीर
पाहून तुझा पराक्रम , सर्वच आनंदून गेले
चंद्रकले तुझ्या पराक्रमासाठी डोळ्यात अश्रू आले
पेटली ज्योत शौर्यासाठी , घाम गाळले हिमालयावरी
एव्हरेस्टवरच्या शूर वीरांना वंदितो आम्ही घरोघरी
एव्हरेस्टवीर राणीची अमर झाली कहाणी
प्रत्येकाच्या ओठावरती चंद्रकलेची वाणी
============================
    कवीः-  शंकर सिताराम चौरे
             पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे
कविता लेखन
दि . १५ / ०६ / २०१९



No comments:

Post a Comment