माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 22 September 2019

माझा अर्थ काय ? (मराठी  शब्दांची विस्तारीत रूपात  व्याप्ती )

(१) शुक्लपक्ष
---  चांदण्यारात्रीचा पंधरवडा.

(२) रोजखडा
---  रोजच्या हिशोबाची टिपणवही.

(३) रणगाडा
---  तोफ असलेला गाडा.

(४) बेवारशी
---  वारस नसलेला.

(५) पंचवटी
--- पाच वडांचा समुदाय असलेली जागा.

(६)पडळ
--- शेतात बांधलेली पडवी.

(७) द्वीपकल्प
---  तीन बाजूने पाणी असलेला प्रदेश.

(८) स्थानबद्ध
---  एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केलेला.

(९) संचारबंदी
---  मोकळेपणाने फिरण्यास मनाई.

(१०) पंचक्रोशी
--- पाच कोसांचा प्रदेश.

(११) सुभाषित
---  सुंदर शब्दांतील बोधपर वाक्य.

(१२) आकाशगंगा
---    आकाशातील ताऱ्यांचा पट्टा.

(१३)परस्परावलंबी
---   एकमेकांवर अवलंबून असणारे.

(१४)दंतकथा
---   एकाने दुसर्‍यास सांगून आलेली गोष्ट.

(१५) प्रेक्षक
---   पाहण्यास जमलेले लोक.

(१६) सुखलोलुप
---   सुखाच्या मागे लागलेला.

(१७) अभूतपूर्व
---     पूर्वी कधीही न घडलेले.

(१८) अश्रुतपूर्व
---     पूर्वी कधीही न ऐकलेले.

(१९) अदृष्टपूर्व
---   पूर्वी कधीही न पाहिलेला.

(२०) तत्कालीन
---   त्यावेळचा.

===========================
संकलक :- श्री. शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री  जि. धुळे
              ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment