माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 29 September 2019

वारली चित्रकलेविषयी थोडक्यात माहिती

    वारली चित्र हे चित्रपरंपरेतील चित्र आहे. वारली
चित्रकलाशैलीचा उदय ठाणे / पालघर जिल्हयात
वारली आदिवासी जमातीत झाला.
 
● वारली चित्राविषयी विशेष माहिती --
 
 (१) निसर्गाचे चित्रण :--
  वारली चित्रकलेत काही वनस्पतींच्या फांद्या,
 फुलझाडे,  उगवता सूर्य,  पक्षी यांची चित्रे रेखाटलेलीदिसतात.

(२) मानवीकृतीचे रेखाटन :-
       वारली चित्रकलेत स्त्री - पुरूष नृत्य करतांना,
खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात.
वारली चित्रात माणसांची हुबेहुब चित्रे नसतात. ती फक्त रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन व वर्तुळ
यांच्या साहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात.

(३) व्यवसाय  :-
        वारली चित्रात शेती करणारे स्त्री - पुरूष दिसतात.  पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय
असावा.

(४) घरे  :-
       वारली चित्रकलेत उतरत्या छपरांच्या झोपड्या
चित्रात दिसतात. झोपड्यांच्या भिंती कुडाच्या किंवा
मातीच्या असतात . त्यावर चित्रे काढलेली असतात.
      वारली चित्रातून वारली समाजजीवन व्यक्त होते.
हे लोक गरीब आहेत,  हे जाणवते. हे लोक जसे
जगतात, त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी
व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात.

ईऔत==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
              पिंपळनेर ता. साक्री  जि. धुळे
               ९४२२७३६७७५


No comments:

Post a Comment