माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 26 October 2019

आदिवासी समाजात दिवाळी सणाचे महत्त्व

आदिवासी मित्रानो,
    आदिवासी परंपरेत सर्वात मोठा मानल्या
गेलेल्या दिवाळी सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक
शुभेच्छा  ! दिवाळी म्हटलं की आदिवासी
बांधवांनी म्हटलेले गाणं आवर्जून आठवतं .
   दिन दिन दिवाळी, गायी, म्हशी ओवाळी
   गायी म्हशी कुणाच्या, रावणाच्या
   रावण  कुणाचा, आईबापाचा
   दे माई खोब-याची वाटी
   वाघाच्या पाठीत हाणेन काठी

    आपली आदिवासी संस्कृती ही निसर्गपूजक
असल्यामुळे या सणाचे निसर्ग व आदिवासी
माणसाचे अतूट नाते आहे. वरील गाण्यामधूनही
तेच दिसते. गायी - म्हशी ही आदिवासींची खरी
दौलत, म्हणूनच  या गाण्यात त्यांना प्रमाने
ओवाळले आहे. त्यांना ज्याच्यापासून भीती
वाटते. त्यात वाघोबाच्या पाठीत काठी
घालण्याचा बेतपण आला आहे.
   आदिवासी समाज हा वाघदेव,  नागदेव,
डोग-यादेव यांचे पूजन करतो. आणि त्यांना
देवसुध्दा मानतो. सण,  समारंभ, उत्सव हे
आपल्या आयुष्याला नवी उभारी देत असतात.
आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात
थोडीशी का असेना उसंत मिळावी, आपला
बहुतांश वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत जावा,
आप्तस्वकीय गाठीभेटी व्हाव्यात या उद्देशाने
आदिवासी संस्कृतीत ऋतुमानानुसार सण -
उत्सवांची रचना केली आहे. दिवाळी हा
आदिवासी संस्कृतीचा उत्सव आहे. अंधाराला
दूर सारून प्रकाशाचा संदेश देणारा हा सण
आहे.
  आदिवासी मित्रांनो, दिवाळीच्या आनंदात
अधिक भर घालण्यासाठी पर्यावरणाचा र्‍हास
होणार नाही ; याची काळजी घ्या.कारण
आदिवासी निसर्ग सौंदर्याची पूजा करणारा
आणि आपल्या जीवनात निसर्गाला सर्वोच्च
स्थान देणारा समाज म्हणजे आदिवासी आहे.

 
   लेखक :-- शंकर चौरे  (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
            ¤ ९४२२७३६७७५
     

No comments:

Post a Comment