माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 27 February 2020

दिलेल्या शब्दास ' णे ' अक्षर लावून नवीन शब्द बनविणे.


(भाषिक उपक्रम)

● दिलेल्या शब्दास ' णे ' अक्षर लावून नवीन शब्द
लिहा.

गाळ -- गाळणे | जळ -- जळणे
चाव -- चावणे | खण -- खणणे
काप -- कापणे | भर -- भरणे
झोप -- झोपणे | चाल -- चालणे
सांग -- सांगणे | पळ -- पळणे
जोड -- जोडणे | झेल -- झेलणे
माग -- मागणे | ओढ -- ओढणे
चोर -- चोरणे | डुल -- डुलणे
बोल -- बोलणे | घड --- घडणे
वाच -- वाचणे | टांग -- टांगणे
झाड -- झाडणे | लाव -- लावणे
भेट -- भेटणे | घास -- घासणे
ठेव -- ठेवणे | जग -- जगणे
धर -- धरणे | नाच -- नाचणे
वाट -- वाटणे | भाज -- भाजणे
थांब -- थांबणे | कर -- करणे
ऐक -- ऐकणे | उठ -- उठणे
घास -- घासणे | वाट -- वाटणे
फेक -- फेकणे | पाळ -- पाळणे
पाह -- पाहणे | खेळ -- खेळणे
दळ -- दळणे | शोध -- शोधणे
============================
लेखन :-- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५


Monday 24 February 2020

डझन, ग्रोस, शेकडा प्रश्नावली (सामान्यज्ञान)


(१) १ डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १२ वस्तू


(२) अर्धा डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ६ वस्तू


(३) पाव डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ३ वस्तू


(४) पाऊण डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ९ वस्तू


(५) सव्वा डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १५ वस्तू


(६) दीड डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १८ वस्तू


(७) अडीच डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ३० वस्तू


(८) एक ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- १२ डझन


(९) अर्धा ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- ६ डझन


(१०) पाव ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- ३ डझन


(११) पाऊण ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- ९ डझन


(१२) सव्वा ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- १५ डझन


(१३) एक ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १४४ वस्तू


(१४) अर्धा ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ७२ वस्तू


(१५) पाव ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ३६ वस्तू


(१६) पाऊण ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १०८ वस्तू


(१७) सव्वा ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १८० वस्तू


(१८) एक शेकडा म्हणजे किती ?
उत्तर-- १००


(१९) अर्धा शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- ५०


(२०) पाव शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- २५


(२१) पाऊण शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- ७५


(२२) सव्वा शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- १२५
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 22 February 2020

मराठी शब्दसौंदर्य -- नामांपासून विशेषणे


● नामांपासून विशेषणे सांगा.

नाम --- विशेषणे

(१) अर्ज -- अर्जदार
(२) मदत -- मदतगार
(३) नक्षी --- नक्षीदार
(४) भांडण -- भांडणखोर
(५) झुंज -- झुंजार
(६) मसाला -- मसालेदार
(७) जमीन -- जमीनदार
(८) रूची -- रूचकर
(९) खोडी -- खोडकर
(१०) इनाम -- इनामदार
(११) धन -- धनिक
(१२) खर्च -- खर्चिक
(१३) मोह -- मोहक
(१४) शरीर -- शारीरिक
(१५) धर्म -- धार्मिक
(१६) तारू -- तारक
(१७) रस -- रसाळ
(१८) खडक -- खडकाळ
(१९) फेस -- फेसाळ
(२०) डोंगर -- डोंगराळ
(२१) पाणी -- पाणथळ
(२२) प्रेम -- प्रेमळ
(२३) यश -- यशस्वी
(२५) डोळा -- डोळस
(२६) सोने -- सोनेरी
(२७) अभ्यास -- अभ्यासू
(२८) आंबा -- आंबट
(३०) लाकूड -- लाकडी
=============================
संकलक :-- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 19 February 2020

म्हणजे काय ? ( समानार्थी शब्द )


बाप म्हणजे पिता
माय म्हणजे माता
वेल म्हणजे लता
गाय म्हणजे गोमाता
विनय म्हणजे नम्रता 


रजनी म्हणजे रात
खेद म्हणजे खंत
हस्त म्हणजे हात
दंत म्हणजे दात
साथ म्हणजे संगत


दुनिया म्हणजे जग
रास म्हणजे ढीग
लुटारू म्हणजे ठग
अभ्र म्हणजे मेघ
रोष म्हणजे राग 


स्वच्छ म्हणजे निर्मळ
राजीव म्हणजे कमळ
श्रीफळ म्हणजे नारळ
गंध म्हणजे परिमळ
प्रातःकाळ म्हणजे सकाळ 


त्रास म्हणजे छळ
समय म्हणजे वेळ
वेदना म्हणजे कळ
रांग म्हणजे ओळ
बैल म्हणजे पोळ 


मोहिनी म्हणजे भुरळ
अवर्षण म्हणजे दुष्काळ
ललाट म्हणजे कपाळ
उतार म्हणजे ढाळ
तुच्छ म्हणजे चांडाळ 


काक म्हणजे कावळा
बक म्हणजे बगळा
सकल म्हणजे सगळा
झोका म्हणजे हिंदोळा
वर्षा म्हणजे पावसाळा 


समुदाय म्हणजे गट
अभिनेता म्हणजे नट
उदर म्हणजे पोट
आपत्ती म्हणजे संकट
कारस्थान म्हणजे कट 


हंगाम म्हणजे बहर
भुंगा म्हणजे भ्रमर
कटी म्हणजे कंबर
निर्दय म्हणजे कठोर
विलंब म्हणजे उशिर 


सदन म्हणजे घर
मूषक म्हणजे उंदीर
ओझे म्हणजे भार
मानव म्हणजे नर
चाकर म्हणजे नोकर
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५



Monday 17 February 2020

महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले ( किल्ला आणि जिल्हा )

(१) ' शिवनेरी ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे


(२) 'पन्हाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर


(३) 'जंजिरा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड


(४) ' सिंधुदुर्ग ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग


(५) 'अजिंक्यतारा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा


(६) ' तोरणा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे


(७) ' मुल्हेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक


(८)' देवगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग


(९) 'प्रतापगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा


(१०)' साल्हेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक


(११) ' कंधार ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नांदेड


(१२) ' करमाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सोलापूर


(१३) ' नळदुर्ग ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- उस्मानाबाद


(१४) ' माहुली ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- ठाणे


(१४) ' वसई ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पालघर


(१५) ' रायगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड


(१६) 'अर्नाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पालघर


(१७) ' कर्नाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड


(१८) ' हरिचंद्रगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अहमदनगर


(१९) ' सज्जनगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा


(२०) ' विशाळगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर


(२१) ' दौलताबाद ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
उत्तर -- औरंगाबाद


(२२) ' थाळनेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे


(२३) ' सिंहगड ' (कोंढाणा) किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
===============================
संकलक :-- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 16 February 2020

सामान्यज्ञान


(१) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गुलाब


(२) फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- आंबा


(३) तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- शेंगदाणा


(४) गरीबांची गाय कोणत्या प्राण्याला म्हणतात ?
उत्तर -- शेळी


(५) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू


(६) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल (हारावत)


(७) महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते ?
उत्तर -- मोठा बोंडारा


(८) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ


(९) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर -- मोर


(१०) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर -- कमळ


(११) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
उत्तर -- डाॅल्फीन मासा


(१२) महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती ?
उत्तर -- पुणे


(१३) महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई


(१४) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता ?
उत्तर -- औरंगाबाद


(१५) महाराष्ट्रातील तलवांचा जिल्हा कोणता ?
उत्तर -- गोंदिया
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Friday 14 February 2020

सामान्यज्ञान प्रश्नावली

(१) महाराष्ट्र हे भारतातील काय आहे ?

उत्तर-- राज्य
----------------------------------------------------
(२) २२ ची दुप्पट किती ?

उत्तर -- ४४
----------------------------------------------------
(३) ३० ची तिप्पट किती ?

उत्तर -- ९०
----------------------------------------------------
(४) ५० ची चौपट किती ?

उत्तर-- २००
----------------------------------------------------
(५) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?

उत्तर-- हिरवा
----------------------------------------------------
(६) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?

उत्तर-- सोंड
----------------------------------------------------
(७) घराची राखण करणारा प्राणी कोणता ?

उत्तर-- कुत्रा
----------------------------------------------------
(८) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?

उत्तर-- थवा
----------------------------------------------------
(९) इंग्रजी वर्षाचा शेवट कोणत्या महिन्याने होतो ?

उत्तर-- डिसेंबर
----------------------------------------------------
(१०) नकाशात वरची दिशा कोणती असते ?

उत्तर-- उत्तर
----------------------------------------------------
(११) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

उत्तर-- पंडित जवाहरलाल नेहरू
----------------------------------------------------
(१२) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर-- डाँ. राजेंद्र प्रसाद
----------------------------------------------------
(१३) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

उत्तर-- यशवंतराव चव्हाण
----------------------------------------------------
(१४) सजीव सृष्टी असलेला ग्रह कोणता ?

उत्तर -- पृथ्वी
----------------------------------------------------
(१५) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

उत्तर-- मराठी
=============================
संकलक :-- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 13 February 2020

गणितीय प्रश्नावली (सामान्यज्ञान)


(१) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर-- ६० सेकंद


(२) १ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर -- १०० सेंटीमीटर


(३) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर-- १००० मिलिलीटर


(४) १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर-- १००० ग्रॅम


(५) अर्धा मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर-- ३० सेकंद


(६) अर्धा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर-- ५० सेंटीमीटर


(७) अर्धा लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर -- ५०० मिलिलीटर 


(८) अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर-- ५०० ग्रॅम


(९) एका सप्ताहात किती दिवस असतात ?
उत्तर-- ७ दिवस


(१०) पाच सप्ताह म्हणजे किती दिवस ?
उत्तर-- ३५ दिवस


(११) १ तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- ६० मिनिटे


(१२) १ दिवसाचे किती तास असतात ?
उत्तर -- २४ तास
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 12 February 2020

भौगोलिक प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१)सौर कालगणनेनुसार एक वर्ष किती दिवसाचे असत ?

--- ३६५ दिवस


२)चांद्र कालगणनेनुसार एक वर्ष किती दिवसाचेअसते ?

--- ३५५


३) लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो ?

--- २९ दिवस


४) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात ?

--- दैनिक गती

५) हिंदू दिनदर्शिका कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ?

--- चांद्रसौर


६) सौर कालगणनेत एक वर्ष किती महिन्यांत विभागलेले असते ?

--- १२ (बारा)


(७) इस्लाम दिनदर्शिका कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ?

--- चांद्र


(८) इस्लाम दिनदर्शिकेतील महिना किती दिवसांचा असतो ?

--- २९ किंवा ३० दिवसांचा


९) भारतीय राष्ट्रीय पंचांग कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ?

--- सौर कालगणना


(१०) लीप वर्ष किती दिवसाचे असते ?

--- ३६६ दिवस
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday 11 February 2020

SAY ODD EVEN ONE .

 
(गटातील वेगळा शब्द सांगा/ ओळखा)

(1) PEN TEN HUT HEN


(2) HAT COW CAT BAT


(3) MUG JUG BUG NET


(4) BAD DAY MAY WAY


(5) COT DIP POT NOT


(6) NET PET ZIP SET


(7) BALL TREE TALL HALL


(8) BOOK LOOK HOOK KITE


(9) GOLD COOK COLD FOLD


(10) ROOM BELL TELL WELL


(11) FISH DISH WISH WEST


(12) HILL ROPE MILL BILL
=============================
Ans (उत्तरे ) :-- (1) HUT (2) COW (3) NET
(4) BAD L (5) DIP (6) ZIP (7) TREE
(8) KITE(9) COOK (10) ROOM
(11) WEST(12) ROPE
=============================
SHANKAR CHAURE
PIMPALNER TAL SAKRI DIST DHULE
9422736775


Monday 10 February 2020

भाषिक उपक्रम -- प्रश्न विचारूया !

( गटात प्रश्न विचारा आणि उत्तरे सांगा.)

● दिलेले शब्द वापरून गटात प्रश्न विचारा
आणि उत्तरे सांगा.

(१) सुप्रिया -- हुशार

प्रश्न -- सुप्रिया कशी आहे ?
उत्तर -- सुप्रिया हुशार आहे.

प्रश -- हुशार कोण आहे ?
उत्तर-- हुशार सुप्रिया आहे.
------------------------------------------------
(२) मीठ -- खारट

प्रश्न -- मीठ कसे आहे ?
उत्तर-- मीठ खारट आहे ?

प्रश्न -- खारट काय आहे ?
उत्तर-- मीठ खारट आहे.
--------------------------------------------------
(३) बर्फ -- थंड

प्रश्न-- बर्फ कसा आहे ?
उत्तर-- बर्फ थंड आहे.

प्रश्न-- थंड काय आहे ?
उत्तर-- थंड बर्फ आहे.
---------------------------------------------------
(४) आवळा -- तुरट

प्रश्न-- आवळा कसा आहे ?
उत्तर-- आवळा तुरट आहे.

प्रश्न -- तुरट काय आहे ?
उत्तर-- तुरट आवळा आहे.
----------------------------------------------------
(५) गूळ -- गोड

प्रश्न -- गूळ कसा आहे ?
उत्तर-- गूळ गोड आहे.

प्रश्न-- गोड काय आहे ?
उत्तर-- गोड गूळ आहे.
---------------------------------------------------
(६) खुर्ची -- लहान

प्रश्न -- खुर्ची कशी आहे ?
उत्तर-- खुर्ची लहान आहे.

प्रश्न -- लहान काय आहे ?
उत्तर-- लहान खुर्ची आहे.
---------------------------------------------------
(७) फूल -- सुगंधी

प्रश्न -- फूल कसे आहे ?
उत्तर-- फूल सुगंधी आहे.

प्रश्न-- सुगंधी काय आहे ?
उत्तर -- सुगंधी फूल आहे.
--------------------------------------------------
(८) कापूस -- हलका

प्रश्न-- कापूस कसा आहे ?
उत्तर-- कापूस हलका आहे.

प्रश्न-- हलका काय आहे ?
उत्तर-- हलका कापूस आहे.
--------------------------------------------------
(९) पाणी -- स्वच्छ

प्रश्न-- पाणी कसे आहे ?
उत्तर-- पाणी स्वच्छ आहे.

प्रश्न-- स्वच्छ काय आहे ?
उत्तर-- स्वच्छ पाणी आहे.
--------------------------------------------------
(१०) दुध -- गरम

प्रश्न-- दूध कसे आहे ?
उत्तर-- दूध गरम आहे.

प्रश्न-- गरम काय आहे ?
उत्तर-- गरम दूध आहे.
---------------------------------------------------
(११) लोखंड -- जड

प्रश्न-- लोखंड कसे आहे ?
उत्तर-- लोखंड जड आहे.

प्रश्न-- जड काय आहे ?
उत्तर-- जड लोखंड आहे.
-----------------------------------------------------
(१२) शर्ट -- रंगीत

प्रश्न-- शर्ट कसे आहे ?
उत्तर-- शर्ट रंगीत आहे.

प्रश्न-- रंगीत काय आहे ?
उत्तर-- रंगीत शर्ट आहे.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जि .प. प्रा. शाळा- जामनेपाडा केंद्र
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५



Sunday 9 February 2020

कालगणना -- शतक ( सामान्यज्ञान )

(१) कालगणनेच्या संदर्भात ' शतक ' या शब्दाचा अर्थ सांगा.

उत्तर -- कालगणनेच्या संदर्भात शतक म्हणजे १००
वर्षाचा काळ होय. ऐतिहासिक कालगणना करताना
१९ वे शतक, २० वे शतक असा उल्लेख केला जातो.
शतकाच्या उल्लेखाने ढोबळमानाने त्या शतकाच्या
म्हणजेच १०० वर्षाच्या कालखंडाचा बोध होतो.
-----------------------------------------------------------

(२) १९ वे शतक म्हणजे कोठून कोठेपर्यंत वर्षे ?

उत्तर-- १९ वे शतक म्हणजे इ.स. १८०१ ते १९००
या दरम्यानचा १०० वर्षांचा काळ होय.
------------------------------------------------------------

(३) २० वे शतक कोठून कोठेपर्यंत वर्षे ?

उत्तर-- २० वे शतक म्हणजे इ. स. १९०१ ते २०००
या दरम्यानचा १०० वर्षांचा काळ होय.
------------------------------------------------------------

(४) इ.स. १५०१ ते १६०० या दरम्यानचा १०० वर्षाचा
काळ कोणते शतक आहे ?

उत्तर -- १६ वे शतक
===============================
संकलक:- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 8 February 2020

सामान्यज्ञान (महाराष्ट्र)


(१) अजिंठा, वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत  ?

---  औरंगाबाद
------------------------------------------------------
(२) मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध  आहे  ?

---  वाघ
------------------------------------------------------
(३) रंकाळा तलाव कोठे आहे  ?

---  कोल्हापूर
------------------------------------------------------
(४) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्य़ात आहे  ?

---  सातारा
------------------------------------------------------
(५) जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे  ?

---  जलमार्ग
------------------------------------------------------
(६) शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण  कोणत्या
तालुक्यात आहे  ?

---  राहाता
------------------------------------------------------
(७) औरंगजेबाची कबर कोठे आहे  ?

---  खुल्ताबाद
------------------------------------------------------
(८) कोणत्या किल्ल्यावर मेंढातोफ व दुर्गा तोफ
आहे.

---  दौलताबाद
------------------------------------------------------
(९) सिंदखेड राजा येथे कोणाचा राजवाडा आहे ?

--- श्री. लखुजी जाधव
------------------------------------------------------
(१०) गोरेगाव चित्रनगरी ( फिल्मी सीटी) कोठे आहे ?

--- मुंबई
------------------------------------------------------
(११) रायगड जिल्हयाचे नाव पूर्वी काय होते ?

--- कुलाबा
------------------------------------------------------
(१२) इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्थापन केलेले
राजवाडे संशोधन मंदिर कोठे आहे ?

---- धुळे
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि .धुळे 

Thursday 6 February 2020

म्हणजे काय ? ( शब्दांचे विस्तारित रूपात अर्थ )

(१) इतिहास
--- भूतकाळातील घटनांची सुसंगत माहिती.
------------------------------------------------------
(२) कालगणना
--- घटनांचा कालक्रम मोजण्याची पद्धती.
-----------------------------------------------------
(३) ईसा
--- येशू ख्रिस्तांचे अरबी भाषेतील नाव.
-------------------------------------------------------
(४) इसवी सन
--- आंतरराष्ट्रीय पातळीवरील कालगणना.
-------------------------------------------------------
(५) आदिवासी
--- अगदी पूर्वीपासूनचे राहणारे.
--------------------------------------------------------
(६) ताम्रलेख
--- तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख.
-------------------------------------------------------
(७) शिलालेख
--- दगडावर कोरलेले लेख.
-------------------------------------------------------
(८) शिल्प
--- दगडावर केलेले कोरीव काम.
-------------------------------------------------------
(९) तपोभूमी
--- तप करण्याची जागा.
-------------------------------------------------------
(१०) शतायुषी
--- शंभर वर्षे आयुष्य असणारा.
-------------------------------------------------------
(११) वखार
--- मालाचा साठा करून ठेवण्याची जागा.
-------------------------------------------------------
(१२) आखाडा
--- कुस्ती खेळण्याची जागा.
-------------------------------------------------------
(१३) कायापालट
--- एकदम बद्दल.
--------------------------------------------------------
(१४) संस्थापक
--- एखाद्या संस्थेची स्थापना करणारा.
-------------------------------------------------------
(१५) सुभाषित
--- बोधपर वचन.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 5 February 2020

एका शब्दाचे अनेक अर्थ (मराठी शब्द)


(१) लहर 
--    लाट ,        मनाचा कल 
------------------------ --------------------------------------
(२) वजन 
---   भार,           मान 
--------------------------------------------------------------
(३) बाल 
---  बालक,          केस 
--------------------------------------------------------------
(४) पत्र 
---   पान,           चिठ्ठी 
--------------------------------------------------------------
(५) आकार 
---   आकृती,       दर,       किंमत 
--------------------------------------------------------------
(६) चूक 
---   लहान खिळा,          दोष 
--------------------------------------------------------------
(७) कलम 
---   लेखणी,         रोपांचे कलम. 
--------------------------------------------------------------
(८) गार 
---   गारगोटी,          थंड 
--------------------------------------------------------------
(९) चाळ 
---   पैंजण,         घरांची रांग 
--------------------------------------------------------------
(१०) चिमणी 
---     एक पक्षी,         गिरणीचे धुराडे. 
--------------------------------------------------------------
(११) घट 
---     मडके,      झीज,      नुकसान 
--------------------------------------------------------------
(१२) चक्र 
---     चाक,          एक शस्त्र 
--------------------------------------------------------------
(१३) घोर 
---     भयंकर,         काळजी 
--------------------------------------------------------------
(१४) छत्र 
---     छत्री,          आधार 
--------------------------------------------------------------
(१५) जंग 
---     लोखंडाचा जंग,       युध्द 
--------------------------------------------------------------
(१६) जात 
---    समाज,       प्रकार 
--------------------------------------------------------------
(१७) जोडा 
---     जोडपे,        बूट 
--------------------------------------------------------------
(१८) तट 
---    किनारा,      तीर किल्ल्याची भिंत 
--------------------------------------------------------------
(१९) ताव 
---     तापविणे,          कागद 
--------------------------------------------------------------
(२०) पास 
---    जवळचा,      उत्तीर्ण,       परवाना 
--------------------------------------------------------------
(२१) मठ 
---     एक कडधान्य,      संन्याशांचे ठिकाण 
--------------------------------------------------------------
(२२) रग 
---    गुर्मी,          उबदार पांघरण 
--------------------------------------------------------------
(२३) रस 
---     द्रवपदार्थ,     रूची,       गोडी 
--------------------------------------------------------------
(२४) विहार 
---    सहल,          बौध्दमठ 
--------------------------------------------------------------
(२५) हवा 
---     वायु ,        पाहिजे असा.
============================
 संकलक:- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
         पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे 
          ९४२२७३६७७५

Tuesday 4 February 2020

इतिहास प्रश्नावली (सामान्यज्ञान )


(१) कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले ?

उत्तर -- सिंहगड 
---------------------------------------------------
(२) केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे  ?

उत्तर -- उत्तराखंड 
---------------------------------------------------
(३) तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता  ?

उत्तर -- अकबर 
---------------------------------------------------
(४) रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे कोणाची समाधी आहे  ?

उत्तर -- राजमाता जिजामाता 
---------------------------------------------------
(५) छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला  ?

उत्तर -- ३ एप्रिल १६८०, रायगड 
---------------------------------------------------
(६) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता  ?

उत्तर -- बाबर 
---------------------------------------------------
(७) गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला  ?

उत्तर -- लुंबीनी ( नेपाळ )
---------------------------------------------------
(८) आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणे कोणत्या देशात आहेत  ?

उत्तर -- पाकिस्तान 
---------------------------------------------------
(९) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या  गडावर झाला  ?

उत्तर -- रायगड 
---------------------------------------------------
(१०) अफजलखानाचा वध कोठे झाला  ?

उत्तर -- प्रतापगड 
---------------------------------------------------
(११) शिवरायांच्या सैन्याचे मुख्य विभाग कोणते होते  ?

उत्तर -- घोडदळ व  पायदळ 
------------------------------------------------------
(१२) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे  ?

उत्तर -- जुन्नर 
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
          पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे 
          ९४२२७३६७७५

Monday 3 February 2020

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (माहिती)


(१) इंग्लंडचे राजे प्रिन्स आॅफ वेल्स यांच्या भारत
भेटीच्या स्मृत्यर्थ मुबंईतील काही प्रतिष्ठित व्यक्तीतींनी
१९०४ साली एक वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याचा
निर्णय घेतला. १९०५ साली त्याची पायाभरणी होऊन
१९२२ साली संग्रहालयाची इमारत उभी राहिली.
संग्रहालयात ' प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियम, आॅफ
वेस्टर्न इंडिया ' असे नाव देण्यात आले.

(२) १९९८ साली या संग्रहालयाचे नामकरण ' छत्रपती
शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ' असे झाले.

(३) इंडो - गाॅथिक शैलीत बांधलेल्या या इमारतीला
'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक इमारत ' असा दर्जा
देण्यात आला. हे संग्रहालय कला, पुरात्त्व आणि
निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गात विभागले आहे.

(४) बौध्द, जैन, हिंदू देवता यांची शिल्पे, नेपाळ, तिबेट
आणि भारतात सापडलेल्या धातूंच्या व दगडी मूर्ती,
भांडी, शस्त्रे इत्यादी प्राचीन वस्तू येथे ठेवण्यात आल्या
आहेत. सुमारे पन्नास हजार पुरावस्तू येथे संग्रहीत
केलेल्या आहेत.
===============================
संकलन:- श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 2 February 2020

म्हणजे काय ? ( मराठी शब्दसौंदर्य )


अनुमान -- तर्क    ● दाटी -- गर्दी
खेकडा -- कर्क    ●ख्याती -- कीर्ती
मग्न -- गर्क         ● कृपा -- मर्जी
दाट -- गर्द           ● योग्यता -- दर्जा
विनंती -- अर्ज     ● अपुरा -- अपूर्ण
दाखल -- दर्ज      ● झरा -- निर्झर
ॠर्ण -- कर्ज        ● स्वच्छ -- निर्मळ
साल -- वर्ष         ● मान -- गर्दन
आनंद -- हर्ष       ● कापणे -- कर्तन
कान -- कर्ण        ● स्तुती - वर्णन
अक्षर -- वर्ण        ● वागणूक -- वर्तन
सगळे -- पूर्ण        ● वाडवडील - पूर्वज
साप -- सर्प          ● निश्चय -- निर्धार
बोध -- अर्थ         ● आज्ञा -- निर्देश
घाम -- घर्म          ● माकड -- मर्कट
गुढ -- मर्म            ● ओले -- आर्द्रक
कातडे -- चर्म       ● कठोर -- निर्दय
पुरुष -- मर्द          ● निकाल -- निर्णय
किल्ला -- दुर्ग       ● घासणे -- घर्षण
उहापोह -- चर्चा    ● दान -- अर्पण
करणारा -- कर्ता   ● सोने -- सुवर्ण
बातमी -- वार्ता     ● सहवास -- संपर्क
समुद्र -- दर्या        ● सकल -- सर्व
============================
लेखन:- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५



Saturday 1 February 2020

सामान्यज्ञान -- ठिकाण व प्रसिद्धी


ठिकाण         कशासाठी प्रसिद्ध
       
(१) एकलहरे  -- औष्णिक विद्युत प्रकल्प.

(२) महाबळेश्वर --  थंड हवेचे ठिकाण.

(३) ओझर       -- मिग विमान कारखाना.

(४) अहमदाबाद  -- कापड गिरण्या.

(५) नवेगाव बांध  -- राष्ट्रीय उद्यान.

(६) आग्रा       -- ताजमहाल.

(७) पाचगणी   --  थंड हवेचे ठिकाण.

(८) राहुरी  -- महात्मा फुले कृषी विद्यापीठ

(९) नांदेड -- गुरूगोविंदसिंग समाधी स्थळ

(१०) शिर्डी  -- संत साईबाबा समाधी स्थळ.

(११) वणी (नाशिक)   --  सप्तश्रृंगीदेवी गड .

(१२) इचलकरंजी  -- हातमाग ऊद्योग.

(१३) नाशिक   -- चलनी नोटा कारखाना.

(१४)बल्लारपूर(चंद्रपूर) -- कागद गिरण्या.

(१५) अंबरनाथ -- आगपेटी उद्योग.

(१६) सोलापूर -- चादरी उद्योग.

(१७) येवले(नाशिक ) -- पैठणी उद्योग.

(१८) सावंतवाडी(सिंधुदुर्ग) -- लाकडी खेळणी.

(१९) पैठण (औरंगाबाद) -- पैठण्या व शालू उद्योग.

(२०) संगमनेर   -- विडी उद्योग.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे