माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 19 February 2020

म्हणजे काय ? ( समानार्थी शब्द )


बाप म्हणजे पिता
माय म्हणजे माता
वेल म्हणजे लता
गाय म्हणजे गोमाता
विनय म्हणजे नम्रता 


रजनी म्हणजे रात
खेद म्हणजे खंत
हस्त म्हणजे हात
दंत म्हणजे दात
साथ म्हणजे संगत


दुनिया म्हणजे जग
रास म्हणजे ढीग
लुटारू म्हणजे ठग
अभ्र म्हणजे मेघ
रोष म्हणजे राग 


स्वच्छ म्हणजे निर्मळ
राजीव म्हणजे कमळ
श्रीफळ म्हणजे नारळ
गंध म्हणजे परिमळ
प्रातःकाळ म्हणजे सकाळ 


त्रास म्हणजे छळ
समय म्हणजे वेळ
वेदना म्हणजे कळ
रांग म्हणजे ओळ
बैल म्हणजे पोळ 


मोहिनी म्हणजे भुरळ
अवर्षण म्हणजे दुष्काळ
ललाट म्हणजे कपाळ
उतार म्हणजे ढाळ
तुच्छ म्हणजे चांडाळ 


काक म्हणजे कावळा
बक म्हणजे बगळा
सकल म्हणजे सगळा
झोका म्हणजे हिंदोळा
वर्षा म्हणजे पावसाळा 


समुदाय म्हणजे गट
अभिनेता म्हणजे नट
उदर म्हणजे पोट
आपत्ती म्हणजे संकट
कारस्थान म्हणजे कट 


हंगाम म्हणजे बहर
भुंगा म्हणजे भ्रमर
कटी म्हणजे कंबर
निर्दय म्हणजे कठोर
विलंब म्हणजे उशिर 


सदन म्हणजे घर
मूषक म्हणजे उंदीर
ओझे म्हणजे भार
मानव म्हणजे नर
चाकर म्हणजे नोकर
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५



1 comment: