माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 9 February 2020

कालगणना -- शतक ( सामान्यज्ञान )

(१) कालगणनेच्या संदर्भात ' शतक ' या शब्दाचा अर्थ सांगा.

उत्तर -- कालगणनेच्या संदर्भात शतक म्हणजे १००
वर्षाचा काळ होय. ऐतिहासिक कालगणना करताना
१९ वे शतक, २० वे शतक असा उल्लेख केला जातो.
शतकाच्या उल्लेखाने ढोबळमानाने त्या शतकाच्या
म्हणजेच १०० वर्षाच्या कालखंडाचा बोध होतो.
-----------------------------------------------------------

(२) १९ वे शतक म्हणजे कोठून कोठेपर्यंत वर्षे ?

उत्तर-- १९ वे शतक म्हणजे इ.स. १८०१ ते १९००
या दरम्यानचा १०० वर्षांचा काळ होय.
------------------------------------------------------------

(३) २० वे शतक कोठून कोठेपर्यंत वर्षे ?

उत्तर-- २० वे शतक म्हणजे इ. स. १९०१ ते २०००
या दरम्यानचा १०० वर्षांचा काळ होय.
------------------------------------------------------------

(४) इ.स. १५०१ ते १६०० या दरम्यानचा १०० वर्षाचा
काळ कोणते शतक आहे ?

उत्तर -- १६ वे शतक
===============================
संकलक:- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment