माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 3 February 2020

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (माहिती)


(१) इंग्लंडचे राजे प्रिन्स आॅफ वेल्स यांच्या भारत
भेटीच्या स्मृत्यर्थ मुबंईतील काही प्रतिष्ठित व्यक्तीतींनी
१९०४ साली एक वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याचा
निर्णय घेतला. १९०५ साली त्याची पायाभरणी होऊन
१९२२ साली संग्रहालयाची इमारत उभी राहिली.
संग्रहालयात ' प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियम, आॅफ
वेस्टर्न इंडिया ' असे नाव देण्यात आले.

(२) १९९८ साली या संग्रहालयाचे नामकरण ' छत्रपती
शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ' असे झाले.

(३) इंडो - गाॅथिक शैलीत बांधलेल्या या इमारतीला
'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक इमारत ' असा दर्जा
देण्यात आला. हे संग्रहालय कला, पुरात्त्व आणि
निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गात विभागले आहे.

(४) बौध्द, जैन, हिंदू देवता यांची शिल्पे, नेपाळ, तिबेट
आणि भारतात सापडलेल्या धातूंच्या व दगडी मूर्ती,
भांडी, शस्त्रे इत्यादी प्राचीन वस्तू येथे ठेवण्यात आल्या
आहेत. सुमारे पन्नास हजार पुरावस्तू येथे संग्रहीत
केलेल्या आहेत.
===============================
संकलन:- श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment