माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 7 January 2023

सूर्यमाला ( भौगोलिक माहिती )


(1) सर्व ताऱ्यांना स्वत:चा प्रकाश असतो. अंधाऱ्या रात्री आपणांस आकाशात अनेक तारे लुकलुकताना दिसतात.
---------------------------
( 2) सूर्य हा सुद्धा एक ताराच आहे आणि म्हणूनच त्याला स्वतःचा प्रकाश आहे.
---------------------------
(3) इतर ताऱ्यांच्या तुलनेत सूर्य आपणाला खूप जवळ आहे, म्हणून तो मोठा आणि प्रखर दिसतो.
---------------------------
(4) सूर्यापासून आपल्याला प्रकाश आणि उष्णता मिळते.
---------------------------
(5) सूर्यापासून पहिला बुध, दुसरा शुक्र, तिसरा पृथ्वी, चौथा मंगळ, पाचवा गुरू, सहावा शनी, सातवा युरेनस, आठवा नेपच्यून असे आठ ग्रह आहेत. 
---------------------------
(6)  सूर्यमालेत बुध हा ग्रह सूर्यास सर्वांत जवळ, तर नेप्च्यून 
 हा सूर्यापासून सर्वांत लांब  आहे. सूर्यापासून पृथ्वी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
---------------------------
(7)  पृथ्वीला एक उपग्रह असून त्याला चंद्र म्हणतात. चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वीप्रमाणेच अन्य काही ग्रहांनाही उपग्रह आहेत. 
---------------------------
(8)  सूर्यमालेत सूर्य, आठ ग्रह व उपग्रह आहेत आणि ग्रहांसह सर्व आकाशगोलांचा आकार गोल आहे. सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील एकमेव तारा आहे.
---------------------------
(9) ग्रह स्वतःभोवती तसेच सूर्याभोवती फिरतात, त्यास ग्रहांची गती म्हणतात.
---------------------------
(10)  पृथ्वीच्या सूर्यासमोरील भागात उजेड असतो, तेथे दिन असतो आणि विरुद्ध बाजूस अंधार असतो तेथे रात्र असते.
---------------------------
(11)  पृथ्वी स्वत: भोवती फिरते. त्यामुळे दिनामागून रात्र आणि रात्रीमागून दिन असे दिन - रात्रीचे चक्र सतत सुरू राहते.
---------------------------
 (12) एक दिन आणि एक रात्र मिळून एक पूर्ण दिवस होतो.
---------------------------
(13)  पृथ्वीस स्वत:भोवती फिरण्यास सुमारे २४ तास म्हणजेच एक पूर्ण दिवस लागतो; म्हणून त्या गतीला 'दैनिक गती' म्हणतात.
---------------------------
 (14)  सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्याच्या या मार्गाला 'ग्रहांची कक्षा' म्हणतात. सर्व ग्रहांची कक्षा लंबवर्तुळाकार असते.
---------------------------
(15) पृथ्वी सूर्याभोवतीही फिरते. पृथ्वीला ही एक फेरी पूर्ण करण्यास एक वर्ष लागते; म्हणून त्या गतीला 'वार्षिक गती' म्हणतात. वार्षिक गतीमुळे ऋतू होतात. एका वर्षात १२ महिने म्हणजेच ३६५ दिवस असतात.
==========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment