माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 23 January 2023

" नवी दिशा, नवे उपक्रम " पुस्तक प्रकाशन सोहळा (माझी विचारधारा )


नवी दिशा, नवे उपक्रम 
 पुस्तक प्रकाशनाचा उधळला रंग 
पुस्तक रूपी उपक्रमात 
चार महिने  होतो दंग

नवी दिशा, नवे उपक्रमात 
ताई - भाऊंची जोड 
चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाने
प्रकाशन सोहळा झाला गोड

नवी दिशा, नवे उपक्रमाचे
गुणगाऊ मनोभाव
देवराव चव्हाण सरांनी 
मार्गदर्शन केलं प्रेमभाव

नवी दिशा, नवे उपक्रम 
ज्ञानाची आहे गमंत
भाषा, गणित, विज्ञान आणि 
सामान्यज्ञानाची संगत

देवराव चव्हाण सरांच्या मनात
 सोज्वळतेचा दिवा
नवी दिशा, नवे उपक्रम 
पुस्तक रूपाने लाभला ठेवा.

नवी दिशा, नवे उपक्रम 
पुस्तक ज्ञानरूपी दर्पण.
आपण सर्व उपक्रमशील शिक्षकांनी 
ज्ञान केलं अर्पण.

नवी दिशा, नवे उपक्रम 
 ज्ञानसागराची किनार
आपण सर्व दिलं एकमेकांना
 मनापासून आधार

नवी दिशा, नवे उपक्रमाला 
आज आली शोभा
 देवराव चव्हाण सरांच्या रूपाने 
मार्गदर्शक उभा.

नवी दिशा, नवे उपक्रम 
ज्ञानरूपी सोनेरी कळस
 या सोहळ्यात नाही 
 नाही वाटलं आळस.

नवी दिशा, नवे उपक्रम 
अप्रतिम सुंदर 
कर्तृत्ववान भाऊ - ताईंची
 येथे झाली कदर.

नवी दिशा, नवे उपक्रमात
 गुरूजनं कुशल
 उपक्रम, सामान्यज्ञानाची
दिशा आहे स्पेशल.

नवी दिशा, नवे उपक्रम 
आहे पवित्र 
या पुस्तकातील उपक्रम 
सादर होतील सर्वत्र

इंग्रजी भाषेत चंद्रला 
म्हणतात मून
नवी दिशा, नवे उपक्रमात
सप्तरंगी गुण
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment