माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 13 September 2024

रंगांची जादू

---- इंद्रधनुष्यात सात रंग असतात. पावसाच्या थेंबामधून प्रकाशकिरण जातो, तेव्हा त्या पांढऱ्या रंगातून अनुक्रमे तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात रंग उमटतात. पांढऱ्या रंगात लपलेले हे सात
रंग असतात, म्हणजे ही जादू आहे. म्हणून इंद्रधनुष्यातील रंगांना 'जादूच्या पेटीतले रंग' असे म्हटले आहे.

✓ प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच-पाच गोष्टींची नावे सांगा.

 (१) पांढरा
 ---- पांढरी भिंत, पांढरा रुमाल, पांढरा कागद, पांढरी गाय, पांढरे मीठ. 
---------------------------------
(२) निळा 
---- निळे आकाश, निळा समुद्र, निळी शाई, निळे जाकीट, निळे पाकीट.
---------------------------------
(३) हिरवा 
---- हिरवे झाड, हिरवे पान, हिरवा शालू, हिरवी मिरची, हिरवा पोपट.
---------------------------------
(४) लाल 
---- लाल टोपी, लाल साडी, लाल टोमॅटो, लाल पिशवी, लाल चप्पल. 
---------------------------------
(५) काळा 
---- काळी शाई, काळा ढग, काळा अंधार, काळी इजार.
---------------------------------
(६) जांभळा 
---- जांभळी वेल, जांभळा कपडा, जांभळा शर्ट, जांभळे वांगे, जांभळे जांभूळ.
---------------------------------
(७) तांबूस / तांबडा 
---- तांबडा टमाटा, तांबडा रुमाल, तांबडे टेबल, तांबूस ढग, तांबडी माती.
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
पो. रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment