माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 25 September 2024

काळ (काळाचे प्रकार )

--- क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा जो बोध होतो, त्यास काळ म्हणतात.

 ✓काळाचे प्रकार व पोटप्रकार -- मुख्य काळ तीन आहेत.

(१) वर्तमानकाळ : -
--- या काळात क्रिया आता घडते असा बोध होतो.
 उदा. -- ती धावते.
----------------------------------------------
(२) भूतकाळ : 
--- या काळात क्रिया पूर्वी घडली असा बोध होतो. 
उदा.‌ -- ती धावली.
----------------------------------------------
(३) भविष्यकाळ : 
--- या काळात क्रिया पुढे घडेल असा बोध होतो. 
उदा. -- ती धावेल.
==========================
✓ काळाचे चार पोटप्रकार आहेत
(१) साधा , (२) अपूर्ण, (३) पूर्ण , (४) रीती.

✓ तिन्ही काळांतील सर्व प्रकारांतील क्रियापदांची रूपे :

∆∆ (१) वर्तमानकाळ ---
---- मी पुस्तक वाचतो. (साधा वर्तमानकाळ)
---- मी पुस्तक वाचत आहे. (अपूर्ण वर्तमानकाळ)
----  मी पुस्तक वाचले आहे. ( पूर्ण वर्तमानकाळ)
---- मी पुस्तक वाचत असतो. ( रीती वर्तमानकाळ)
--------------------------------------------
∆∆ (२) भूतकाळ ---
---- मी पुस्तक वाचले. ( साधा भूतकाळ)
---- मी पुस्तक वाचत होतो. ( अपूर्ण भूतकाळ)
---- मी पुस्तक वाचले होते.( पूर्ण भूतकाळ)
---- मी पुस्तक वाचत असे. ( रीती भूतकाळ)
----------------------------------------------
∆∆ (३) भविष्यकाळ --
---- मी पुस्तक वाचेन. ( साधा भविष्यकाळ)
---- मी पुस्तक वाचत असेन.( अपूर्ण भविष्यकाळ)
---- मी पुस्तक वाचले असेन. ( पूर्ण भविष्यकाळ)
---- मी पुस्तक वाचत जाईन.( रीती भविष्यकाळ)
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment