माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 15 September 2024

सामान्यज्ञान ( भारत राष्ट्रगीत, राजमुद्रा, राष्ट्रध्वज, कॅलेंडर, प्रतिज्ञा )

∆ भारताचे राष्ट्रगीत : 

✓जन गण भन
✓ रचना -- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
✓(मूळ गीत ५ कडव्यांचे, मात्र पहिल्या कडव्यास राष्ट्रगीत म्हणून मान्यता) हे गीत गुरुदेवांनी पहिल्यांदा बंगाली भाषेत लिहिले. १९११ मध्ये अबिद अली यांनी त्याचे हिंदी भाषांतर केले.
✓प्रथम गायन -- २७ डिसेंबर १९११ (कोलकाता अधिवेशन, अध्यक्ष बिशन नारायण दास)
✓राष्ट्रगीतास घटना समितीची मान्यता: २४ जानेवारी १९५०; (गायनाचा कालावधी: ५२ सेकंद)
===========================

∆ राष्ट्रीय गीत : 

✓वंदे मातरम् (निवड: बंकिमचंद्र चटर्जी यांच्या 'आनंदमठ' कादंबरीतून)
✓ प्रथम गायन : १८९६ चे कोलकाता अधिवेशन. (अध्यक्ष: रहिमतुल्ला सयानी)
===========================

∆  राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) : 

✓राष्ट्रचिन्हाची निवड सम्राट अशोकाच्या सारनाथ (उत्तर प्रदेश) येथील स्तंभावरून.
✓राष्ट्रचिन्हास मान्यता : २६ जानेवारी १९५०
✓राष्ट्रचिन्हाचे स्वरूप : सिंह, घोडा, बैल व हत्ती या प्राण्यांची प्रतिकात्मक चित्रे. चार सिंहांपैकी तीन दर्शनी बाजूस व एक पाठीमागे.
✓राष्ट्रचिन्हाच्या तळभागाकडे डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल असे 'धर्मचक्र' आहे.
✓राष्ट्रचिन्हाखाली 'सत्यमेव जयते' हा देवनागरी लिपीतील संदेश असून त्याची निवड 'मुंडक उपनिषदातून' केली आहे.
✓'सत्त्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य बनविण्याची जबाबदारी पं. मदनमोहन मालवीय यांच्याकडे होती.
==========================

∆ भारताचा राष्ट्रध्वज : 

✓२२ जुलै १९४७ रोजी संविधान समितीने राष्ट्रध्वजास मान्यता दिली.
✓स्वरूप -- तिरंगा • सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा व सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा.
[केशरी (भगवा) : शौर्य व त्यागाचे प्रतिक. 
पांढरा शांतता व पावित्र्य. 
हिरवा : समृद्धीचे प्रतिक.
✓मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यावर निळसर (Navy Blue) रंगाचे अशोक चक्र निवडले असून त्यास २४ आरे आहेत.
✓ हे चक्र सारनाथ येथील स्तंभावरून • राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर '२ : ३' इतके असते.
✓ राष्ट्रध्वजाची संकल्पना व रचना मछलीपट्टण (आंध्र प्रदेश) येथील पिंगाली वेंकय्या या शेतकऱ्याने मांडली.
✓कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीवस्त्रापासून व विशिष्ट ९ आकारांतच तयार करणे बंधनकारक आहे.
✓ राष्ट्रध्वजाचा आकार : अतिमहनीय व्यक्तींच्या विमानावर ४५०४३०० मिमी; राजकीय महत्त्वाच्या व्यक्तींच्या मोटारीवर २२५x१५० मिमी. आकाराचा ध्वज (तिरंगा) लावतात.
============================

∆ राष्ट्रीय कॅलेंडर : 
✓ मान्यता -- २२ मार्च १९५७ शके कालगणनेनुसार रचना (इसवीसनाच्या मागे ७८ वर्षे) • राष्ट्रीय कॅलेंडरनुसार (शके कालगणना) नववर्षाची सुरूवात चैत्र शुध्द प्रतिपदा (गुढी पाडवा)
✓ ग्रेगेरियन कॅलेंडरशी सांगड घालताना, चैत्र शुध्द प्रतिपदा दरवर्षी २२ मार्च रोजी व लीप वर्षात २१ मार्च रोजी येते.
✓ या कॅलेंडरनुसार वर्षाचे ३६५ दिवस मानतात.
✓१९४७ मध्ये भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली.
===========================

∆  राष्ट्रीय प्रतिज्ञा :

✓भारत माझा देश आहे... (India is My Country...)
✓ ही प्रतिज्ञा सर्वप्रथम १९६२ साली पी. वेंकट सुब्बा राव यांनी तेलगू भाषेत लिहिली.
✓ १९६३ साली विशाखापट्टणम् येथील शाळेत या प्रार्थनेचे प्रथम वाचन झाले.
================================
संकलन : - शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment