माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 19 April 2023

लाल फडकी

फडकीतच जन्मून मी
झाली मोठी बघता - बघता 
तीचं महत्त्व जाणते मी
कोकणी समाजात महानता 

आजी आली, आई आली
फडकीचं पावित्र्य जपते जगता जगता
लाल रंग आवडतो मज
पांढरे ठिपक्यांचे मोल मोजता मोजता 

फडकी लाल वटवृक्ष
देई वात्सल्य सावली
आमच्या संस्कृती जीवनावर
उभी कणसरा माऊली 

रूप सुंदर फडकीचे
ती आहे ममता
भेदभाव नाही मनी तिच्या
ती आहे समता 

फडकीचं सुंदर रान
झिजते होऊन चंदन
फुले सुंगधित होऊन
झेली लाल तुफान 

सुखदुःखात आधार देते
जीवन फुलवणारी लाडकी
कितीही असू द्या ऊन - थंडी
क्षणात सारं हलकं करते फडकी

कसे फेडावे ऋण फडकीचे
कोकणी संस्कृतीत लागला लळा 
फडकीच्या उबेत शिरता 
जुळून येतो जिव्हाळा 

फडकी आजीची ... फडकी आईची
फडकी अनोखी प्रेमळ खूप 
फडकी आमची ... संस्कृती जपते
फडकी असे हे संस्कृतीरूप 

लाल लाल फडकी माझी
उमटवून गेली ठसा
फडकी आहे या जगी
ऋण काय मोलू कसा 

फडकी म्हणजे जणू
संस्कृतीची तीन अक्षरे
फडकीचे ठिपके म्हणजे
वात्सल्याची तीन पाखरे

फडकी म्हणजे जणू
कोकणी संस्कृतींचा अथांग सागर
फडकी माय म्हणजे
सर्व सुखाचे आगर

फडकी म्हणजे जणू
आदिम संस्कृतीची माऊली
फडकी माय म्हणजे
कृपेची सावली

कवी / लेखक :- शंकर सिताराम चौरे
काकरपाडा ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
=====================
मार्गदर्शक :- श्री. महारू सिताराम चौरे ( मा. शिक्षक)

Thursday, 13 April 2023

वनस्पतीचे उपयोग


(१) कोरफड 
---- कोरफड ही औषधी वनस्पती आहे. निरनिराळ्या त्वचारोगांवर आणि भाजणे, कापणे अशा जखमांवर कोरफड अत्यंत गुणकारी असते. कोरफडीच्या रसाने पचनसंस्थेचे विकार दूर होतात. मधुमेह आणि कॅन्सरच्या उपचारांत कोरफडीचा वापर केला जातो. सौंदर्यप्रसाधनातही कोरफडीच्या जेलचा उपयोग करतात.
-------------------------------
(२) हळद 
---- हळद ही स्वयंपाकात रोजच वापरली जाते. हळदीला अनेक औषधी गुणधर्मही आहेत. जखमा भरून काढणे व जंतुनाशकासारखे कार्य करणे या गुणधर्मांमुळे हळदीचा वापर काही औषधांत केला जातो. सौंदर्यप्रसाधनातही हळद वापरली जाते. खोकला व सर्दीच्या विकारात हळदीची पूड घातलेल्या दुधाचे सेवन केल्यास लाभदायक ठरते.
-------------------------------
(३) तुळस 
---- तुळस ही औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या पानांच्या रसाने निरनिराळे विकार बरे होतात. तुळस ही कीटकांना दूर ठेवणारी वनस्पती आहे. जुन्या काळी प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असे. तुळशीच्या वाळलेल्या खोडापासून तुळशी माळा बनवल्या जातात. आयुर्वेदात तुळशीपासून अनेक औषधे बनवली जातात. थायलंडच्या काही खाद्यपदार्थात तुळशीच्या पानांचा वापर होतो. 'कर्पूर तुळशी' या तुळशीच्या जातीपासून तेलाची निर्मिती करण्यात येते.
-------------------------------
(४) करंज 
---- करंजाच्या वृक्षापासून तेल तयार करतात. अनेक विकारांवर गुणकारी असलेली आयुर्वेदिक : औषधे ही करंजाच्या झाडापासून किंवा बियांपासून तयार करतात. करंजाच्या झाडाची फळे, पाने, मुळे, खोडाची साल, बिया, डहाळ्या आणि बियांपासून बनवलेले तेल या सर्वांपासून निरनिराळी औषधे तयार करण्यात येतात. बायोडिझेलची निर्मितीदेखील करंजापासून करण्यात येते.
-------------------------------
(५) मोह 
 ---- मोहाचे वृक्ष आदिवासी भागात जंगल प्रदेशांत आढळून येतात. मोहाची फुले आणि बिया यांच्यापासून औषधे व इतर द्रवे तयार करण्यात येतात. मोहाच्या तेलाचा वापर डोकेदुखी, त्वचाविकार आणि संधिवात या विकारांवर केला जातो. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून जॅम बनवला जातो.
आदिवासी स्त्री-पुरुषांत मोहाची दारू लोकप्रिय आहे.
------------------------------
(६) द्राक्ष 
---- द्राक्ष हे लोकप्रिय फळ आहे. ही वनस्पती वेलींच्या प्रकारात
आहे.  बिनबियांच्या द्राक्ष उत्पादनाने महाराष्ट्रात सर्वांना द्राक्षे मिळू लागली. द्राक्षे ताज्या स्वरूपात खाल्ली जातात. द्राक्षे वाळवून त्यांचे बेदाणे करतात. द्राक्षापासून औषधी द्राक्षासवही बनवण्यात येते. 'वाईन' चे उत्पादनदेखील द्राक्षांपासून होते.
-------------------------------
(७) आले 
---- आले स्वयंपाकात वापरले जाते. तसेच त्याचा औषध म्हणूनही उपयोग होतो. ताज्या आल्यार रस पोटाच्या अनेक प्रकारच्या तक्रारींसाठी घेतला जातो. सुकवलेल्या आल्याला 'सुंठ' म्हणतात सुंठीचा औषध म्हणून उपयोग होतो. डोकेदुखी, मळमळणे, पित्तविकार अशांवर घरगुती उपचार म्हणू नेहमीच आले व सुंठीचा उपयोग होतो.
-------------------------------
(८) आंबा 
---- आंबा या ग्रीष्म ऋतूत येणाऱ्या फळाला, 'फळांचा राजा' म्हणतात. आंब्यात मोठ्या प्रमाणात 'अ' जीवनसत्व आणि शर्करा असते. (आंब्यापासून आमरस, जॅम, लोणची, सरबत अशी विविध उत्पादनेदेखील तयार करतात) आंब्याच्या पानांना 
मंगलप्रसंगी महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक मंगलप्रसंगी व तोरणांमध्ये आंब्याच्या झाडाची पाने वापरली जातात.
-------------------------------
(९) निलगिरी 
---- निलगिरीची वाळलेली पाने आणि निलगिरीपासून बनवलेले तेल या दोन्हींचा उत्तम औषध म्हणून वापर होतो. सर्दी-ताप यांवर निलगिरी तेलाचा रामबाण उपाय होतो. स्वच्छतेसाठीही निलगिरी तेल वापरले जाते. दुर्गंधी दूर करण्यासाठी निलगिरीचा वापर होतो. निलगिरीच्या वृक्षाचे लाकूडही उपयुक्त असते. खोडापासून कागदही बनवतात.
-------------------------------
(१०) बाभूळ 
---- बाभळीच्या पानांचा व शेंगांचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करण्यात येतो. बाभळीच्या कोवळ्या फांदयांपासून दात घासण्यासाठी काड्या बनवण्यात येतात. बाभळीच्या फांदयांवरील काट्यांमुळे कुंपणासाठी त्याचा वापर होतो. बाभळीच्या खोडापासून स्रवणाऱ्या गोंदाला बरीच मागणी असते. बाभळीचे लाकूड अतिशय टणक असल्याने बोटबांधणीसाठी त्याचा वापर केला जातो. 
-------------------------------
(११) साग 
---- सागाच्या लाकडाचा फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असते. घरांच्या बांधणीत आणि खिडक्या दारे बनवण्यासाठी सागाचे लाकूड लागते. ही मागणी पुरवण्यासाठी भारतीय वन खाते सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करीत असते.
-------------------------------
(१२) पालक 
---- पालक ही पालेभाजी फारच लोकप्रिय आहे. यात अनेक जीवनसत्त्वे व खनिजे असतात. शरीराच्या अनेक तक्रारी दूर करायच्या असतील; तर नियमितपणे पालकाचे सेवन करणे फायदयाचे असते. पालक बुद्धिवर्धक आणि हृदयाचे आरोग्य जपणारी भाजी आहे. बद्धकोष्ठावर पालक परिणामकारक ठरतो.
=====================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

Wednesday, 12 April 2023

आदर्शाचा झरा - पिताबाई भोये (कोकणी)


पिता आई म्हणजे दयेचा सागर,
पिता आई म्हणजे मायेने भरलेली घागर.

पिता आई म्हणजे भोये परिवाची माता,
पिता आई म्हणजे संस्काराची गाथा.

पिता आई म्हणजे भोये परिवाचे भूषण,
पिता आई  म्हणजे भोये परिवाची शान

पिता आई  म्हणजे दया क्षमा, 
पिता आई  म्हणजे विश्वासाची तमा.

पिता आई म्हणजे परिवाराचा आदर्शाचा झरा,
पिता आई  भोये परिवाराचा तारा

पिता आई  म्हणजे भोये परिवाराचा आधार, 
पिता आई  म्हणजे भोये परिवाराचा साथीदार.

पिता आई  म्हणजे आदर्शाचे स्वरुप, 
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा हुरुप,

पिता आई म्हणजे भोये परिवाराची करूणा
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा दागिना

पिता आई म्हणजे भोये परिवाराची सावली,
पिता आई  म्हणजे भोये परिवाराची माऊली,

पिता आई म्हणजे भोये परिवाराचा शिल्पकार 
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा हुंकार,

पिता आई म्हणजे भोये परिवाराची माय
पिता आई  म्हणजे भोये परिवाराचा हृदय 

पिता आई म्हणजे भोये परिवाराची एकता 
पिता आई म्हणजे भोये परिवाराची ममता 

पिता आई  म्हणजे भोये परिवाराचा अभिमान
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा सन्मान 

पिता आई म्हणजे भोये परिवाराची शक्ती 
पिता आई म्हणजे भोये परिवाराची भक्ती 

पिता आई म्हणजे भोये परिवाराची धडपड 
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा आधारवड
=======================
कै. पिता आईंना भावपूर्ण आदरांजली.
=======================
लेखन :- शंकर चौरे सर (पिंपळनेर )
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Tuesday, 11 April 2023

महात्मा ज्योतिबा फुले तुमच्यामुळेच .. (आठवण ज्योतिबाची..)


ज्योतिबा तुमच्याळेच मी शाळेत जाते.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी वाचन करते.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी लेखन करते.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी भाषण करते. 
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी नेतृत्व करते.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी नाविन्याचा शोध घेते.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी जागरूक झाली. 
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी ज्ञानी झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी स्वावलंबी झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी जबाबदार झाली. 
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी कष्टाळू झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी कार्यतत्पर झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी धीट झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी सुसंस्कृत झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी सुखी झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी कौतुकास पात्र झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी अभिमानी झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी प्रेरणादायी झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मी राष्ट्रपती झाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच मला दूरदृष्टी मिळाली.
ज्योतिबा तुमच्यामुळेच माझी प्रगती झाली. 
ज्योतिबा तुमच्यामुळेच माझ्या जीवनाला गती आली.

लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प.प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र- रोहोड 
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५ /  ७७२१९४१४९६

Wednesday, 5 April 2023

What colour is the - - - - - ?


1)What colour is the parrot ?
Ans :-- Green 
-------------------------------
(2) What colour is the sky ?
Ans :-- Blue 
-------------------------------
(3) What is the colour of ripe bananas ?
Ans :-  Yellow 
-------------------------------
(4) What is the colour of rose ?
Ans :- pink
-------------------------------
(5) What colour is the crow ?
Ans :-- Black 
-------------------------------
(6) What colour is the apple  ?
Ans :--  Red 
-------------------------------
(7) What is the colour of milk ?
Ans :- White 
-------------------------------
(8)  What is colour of your Hairs ?
Ans :-   Black
-------------------------------
(9) What is colour of sunflower ?
Ans :-  Yellow
-------------------------------
(10) What is colour of leaves ?
Ans :-  Green.
-------------------------------
(11) How many colours are there in Rainbow ?
Ans :-- Seven
=======================
Shankar Sitaram Chaure  (Teacher)
Z  P. School -- Jamnepada,  post - Rohod
Tal. Sakri,  Dist - Dhule
9422736775  / 7721941496