माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 1 April 2026

भौगोलिक माहिती‌ ( परिसर अभ्यास )

(1) सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत.

(2) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू आहे.

(3) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध आहे.

(4)भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल एककात मोजतात.

(5) लीप वर्षात 366 दिवस असतात.

(6) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे.

(7) शुक्राला पहाटेचा तारा असेही म्हणतात.

(8) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे.

(9) सूर्यापासून सर्वात लांब ग्रह नेपच्यून आहे.

(10) मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणतात.

(11) पृथ्वीला जल ग्रह म्हणतात.

(12) सूर्यग्रहण अमावस्येला होऊ शकते.

(13) सूर्यग्रहणाचे तीन प्रकार पडतात.

(14) सूर्यमालेत सूर्य हा तारा आहे.

(15) चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे.

(16) 21 जूनच्या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धाकडे कलतो.

(17) 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.

(18) शनी ग्रहाभोवती कडा आहे.

(19) पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा सूर्य आहे.

(20) सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात.

(21) सूर्य हा हायड्रोजन व हेलिअमचा बनलेला आहे.

(22) सूर्य हा ग्रह नसून तारा आहे.

(23) ग्रह स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरतात.

(24) तारे मात्र फक्त स्वतःभोवती फिरतात.

(25) पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% पाणी आहे.

(26) पृथ्वीच्या पृष्ठभागावर 29% जमिन आहे.

(27) सर्वात प्रकाशमान ग्रह शुक्र आहे.

(28) सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह शुक्र आहे.

(29) मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे.

(30) पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण म्हणतात.

(31) पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते त्यास पृथ्वीचे परिवलन म्हणतात.

(32) बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे.

(33) चंद्र दररोज आदल्या दिवशीपेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो.

(34) बटु ग्रह म्हणजे नेपच्यूननचे पलीकडील ग्रह.

(35) सूर्यकुलातील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह बुध आहे.

(36) सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह पृथ्वी आहे.

(37) सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्यास 8 मिनिट 20 सेकंद कालावधी लागतो.

(38) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळास दिन म्हणतात.

(39) वर्षातील सर्वात मोठा दिवस 21 जून आहे.

(40) पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवसांचा काळ लागतो.

(41) वर्षातील सर्वात लहान दिवस 21 डिसेंबर आहे. 

(42) खग्रास सूर्यग्रहण अमावस्येला होतो.

(43) चंद्रग्रहण पौर्णिमेला होते.

(44) चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.

(45) समुद्राची भरती आणि ओहटी यातील अंतर 12 तास 25 मिनिटे असतो.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गरताड गावठाण 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
9422736775 /  7721941496