माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 14 January 2018

कोण ते ओळखा - आपले समाजसेवक

==========================
(१) जागरूकतेने देशांच्या सीमांचे रक्षण करतात.

(२) आजारी माणसाला औषधे देतात. 
      रोग्याला बरे करतात.

(३) आपली पत्रे एकमेकांना पोहोचवतात.

(४) मुलांना ज्ञान देतात व योग्य वळण लावतात.

(५) प्रवाशांना तिकिटे देतात. त्यांना योग्य
     ठिकाणी पोहोचवतात.

(६) रोग्याची (रुग्णाची ) सेवा ( शुश्रूषा ) करतात.

(७) खटल्यांमध्ये योग्य बाजू मांडतात व न्याय
     मिळवून देतात.

(८) रस्त्यावरील वाहनांचे नियंत्रण करतात व
     अपघात टाळतात. 

-------------------------------------------------
 उत्तरे :-१. सैनिक, २. डॉक्टर,  ३. पोस्टमन
        ४. शिक्षक, ५. कंडक्टर, ६.परिचारिका(नर्स)
            ७. वकील, ८. वाहतूक नियंत्रक पोलीस.

-------------------------------------------------
 संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
                जि. प.प्रा. शाळा - बांडीकुहेर
                ता. साक्री जि. धुळे
                ९४२२७३६७७५
    

No comments:

Post a Comment