माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 10 February 2019

चला जाणून घेऊया, भारताची सुरक्षा व्यवस्थेची माहिती

(१) राष्ट्रीय सुरक्षा :-
     (1) राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवणाऱ्या
          उपाययोजनांना  'राष्ट्रीय सुरक्षा ' असे म्हणतात. 
     (2) देशाचे संरक्षण ही त्या देशाच्या शासनाची
          जबाबदारी असते;  तर त्या कार्यात सहभागी
          होणे, ही नागरिकांची जबाबदारी असते.
     (3) सेनादलांना मदत करण्यासाठी निम -
          लष्करी दले तसेच संरक्षण करणारी यंत्रणा
          व व्यवस्था अद्यावत ठेवावी लागते.

(२) राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेची गरज :-
           (1) राष्ट्राराष्ट्रांतील संघर्षाच्या वेळी
     भौगोलिक अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला
     धोके निर्माण होतात. (2) या संघर्षाचे
     शांततेच्या मार्गाने निराकरण झाले नाही;
     तर युद्धाचा धोका संभवतो. (3) अशा
     परिस्थितीत राष्ट्राच्या अस्तित्वाचे,  ऐक्याचे
     आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी
     प्रत्येक राष्ट्राला आपली सेनादले सुसज्ज
     ठेवावी लागतात. (4) देशाची सुरक्षा व्यवस्था
    बळकट असल्यास देशाच्या विकासासालाही
     पोषक वातावरण तयार होते.

(३) भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप :-
    (1) भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी
       भारताचे राष्ट्रपती असून;  ते तिन्ही सेनादलाचे 
       सरसेनापती असतात. (2) मंत्रिमंडळाच्या
       सल्ल्याने पंतप्रधान आपले संरक्षणविषयक धोरण ठरवतात.

(४) भारतातील निमलष्करी दले  :-

    (1) सीमा सुरक्षा दल  :-
        ●सीमा भागात नागरिकांच्या मनात
          सुरक्षिततेची भाग निर्माण करणे.
       ● सीमेवर गस्त घालणे.

     (2) तटरक्षक दल :-
        ● सागरी किना-यांचे रक्षण करणे.

   (3)केंद्रीय राखीव पोलीस दल  :-
         कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या
         कामी विविध राज्यांतील प्रशासनास मदत करणे.

    (4) जलद कृती दल  :-
        बॉम्बस्फोट,  दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस
        धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली
        करून जनजीवन सुरळीत करणे.

   (5) गृहरक्षक दल  :-
        1. सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व
        बंद या काळात नागरिकांना दूध, पाणी,
        औषधे इ. वस्तूचा पुरवठा करण्यात मदत.
        करणे. 2 भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या
        वेळी लोकांना मदत करणे.
==============================
● सेनादलाचे (सैन्यदले )  तीन प्रकार  :-
  (1) भूदल :-
       भारताच्या भौगोलिक सीमांचे संरक्षण
     करणे, हे भूदलाचे काम आहे.

  (2) नौदल  :-
     भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची
     जबाबदारी नौदलावर आहे.

 (3) वायुदल  :-
      वायुदलावर भारताच्या हवाई सीमांचे
      व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे.
    
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

    

    

               
        

1 comment:

  1. अप्रतिम माहिती संकलन सरजी

    ReplyDelete