माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 7 February 2019

ओळखा पाहू --  मी कोण आहे  ?

(१) मी तुमच्या शरीराचा अवयव आहे.
     मी तुम्हांला खायला मदत करतो.
     मी तुम्हांला बोलायला मदत करतो.
     मी कोण आहे  ?

------------------------------------


(२) माझा स्पर्श तूम्हांला जाणवू शकतो; 
     परंतु तुम्ही मला स्पर्श करू शकणार
     नाही किंवा पाहू शकणार नाही. तुम्ही
     माझ्याशिवाय जगू शकणार नाही.
     मी कोण आहे  ?
----------------------------------------------
(३) मी जमिनीवरील सर्वांत मोठा प्राणी
     आहे. मी माझ्या नाकाने वास घेतो,
    पाने व फळे खुडतो आणि पाणी पितो.
    मी माझ्या नाकाचा हातासारखा उपयोग
    करतो. मी कोण आहे  ?
----------------------------------------------
(४) मी काळा, पिवळा कीटक आहे.
     मी मध गोळा करते. तुम्ही मला त्रास
     दिलात, तर मी तुम्हांला दंश करीन.
    मी कोण आहे  ?
----------------------------------------------
उत्तरे :-(१) तोंड , (२) हवा, (३) हत्ती, (४) मधमाशी.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५
    

No comments:

Post a Comment