माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 23 February 2019

थोडक्यात उत्तर सांगा. ( सामान्यज्ञान )


(१) एकूण मुख्य दिशा किती आहेत ?
---  ४ ( चार )

(२) एकूण उपदिशा किती आहेत ?
---  ४ ( चार )

(३) प्रमुख दिशा कोणती आहे ?
---  पूर्व

(४) नकाशात वरची दिशा कोणती असते  ?
---  उत्तर

(५) नकाशात खालची दिशा कोणती असते  ?
---  दक्षिण

(६)नकाशात डाव्या हाताची दिशा कोणती असते  ?
---  पश्चिम

(७) नकाशात उजव्या हाताची दिशा कोणती असते  ?
---  पूर्व

(८) मराठी वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होते  ?
---  चैत्र

(९) मराठी वर्षाचा शेवट कोणत्या महिन्याने होतो  ?
---  फाल्गुन

(१०) इंग्रजी वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होते  ?
---  जानेवारी

(११) इंग्रजी वर्षाचा शेवट कोणत्या महिन्याने होतो  ?
---  डिसेंबर

(१२) एका वर्षाचे महिने किती  ?
---  १२  ( बारा )

(१३) ३१ दिवसाचे इंग्रजी महिने किती  ?
---   ७ ( सात )

(१४) ३० दिवसांचे इंग्रजी महिने किती  ?
---   ४ ( चार )

(१५) २९ किंवा २८ दिवसांचे महिने किती  ?
---    १  ( एक )

(१६) कोणते दोन इंग्रजी महिने लागोपाठ ३१ दिवसांचे असतात  ?
---   जुलै,  आॅगस्ट

(१७) साध्या इंग्रजी वर्षात एकूण दिवस किती  ?
---    ३६५ दिवस

(१८)लिप इंग्रजी वर्षात एकूण दिवस किती  ?
---   ३६६ दिवस

(१९) एक शेकडा  (शतक) म्हणजे किती  ?
---   १००  ( शंभर )

(२०) १ तासात सेकंद काटा पूर्ण गोल किती फेऱ्या मारतो  ?
---   ६०  ( साठ )
===========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment