माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 24 April 2020

मराठी निबंध लेखन :- पोपट / खार

(१) पोपट

    पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग हिरवागार
असतो. त्याची चोच लालभडक, बाकदार व धारदार
असते. त्याच्या गळ्याभोवती काळी रेघ असते. त्याला
कंठ म्हणतात.
पोपटाच्या समुदायाला थवा असे म्हणतात. निळ्या
आकाशात हिरवागार पोपट छान दिसतो. पोपट
हिरव्यागार झाडात पटकन दिसत नाही. पोपट 
झाडाच्या ढोलीत राहतो.
     पोपट हा खूप लोकांचा आवडता पक्षी आहे. म्हणून
हा पक्षी बरेच लोक आवडीने पाळतात. पोपटाला
पिंज-यातील एका वाटीत त्याचे खाणे व एका वाटीत 
पाणी ठेवतात. पोपटाला पेरू, हिरवी मिरची व भिजलेली 
चण्याची डाळ आवडते. पिंज-यात दांडीवर बसून झोके घेतो, 
तेव्हा तो फार छान दिसतो. आपण शिकवू तसे पोपट बोलतो. 
हे पोपटाचे वैशिष्टय आहे. 

=================================

( २) खार

     खार हा एक चिमुकला प्राणी आहे. खार आकाराने
लांबट असते. तिला चार पाय असतात व झुबकेदार
शेपूट असते. तिचे कान छोटे आणि डोळे बारीक असतात. 
खारी तांबूस, पिंगट किंवा पांढरट करड्या रंगाच्या असतात. 
त्यांच्या पाठीवर तीन किंवा पाच पट्टे असतात.
खार काड्या व पाने जमविते व झाडाच्या ढोलीत
आपले घर करते. पाने, फुले, मध, फळ व कीटक हे
खारीचे अन्न असते. ती पक्ष्यांची अंडीही खाते. ती फार
भित्री पण अत्यंत चपळ असते. ती झाडावर तुरुतुरु
वरखाली पळत असते. ती तोंडांने ' चिक् चिक् ' आवाज
करते.
    खार मागील पाय दुमडून दोन पायांवर बसू शकते. जेव्हा 
ती अशी बसून व शेपटी फुलवून एखादे फळ खात
असते, तेव्हा ती फारच गोंडस दिसते.

==================================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment