माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 7 April 2020

म्हणजे काय ? ( शब्दांचे विस्तारित स्वरूपात अर्थ )


(१) दुर्ग
--- सागरातील किल्ला.

(२) उगम
--- नदीची सुरूवात होते ती जागा.

(३) गुहा
--- डोंगराच्या आतील पोकळ जागा.

(४) तसू
--- दोन बोटांचे माप.

(५) लेणी
--- डोंगरातील दगडात खोदलेले शिल्प.

(६) शिल्प
--- दगडावर कोरलेले कोरीव काम.

(७) संगम
--- दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण.

(८) रणगाडा
--- तोफ असलेला गाडा.

(९) पेय
--- पिण्यास योग्य असा द्रवपदार्थ.

(१०) पहाट
--- सुर्योदयापुर्वीचा सुरूवातीचा काळ.

(११) चौक
--- चार रस्ते एकत्र येतात ती जागा.

(१२) तिठा
--- तीन रस्ते एकत्र येतात ती जागा.

(१३) शिलालेख
--- दगडावर कोरलेले लेख.

(१४) पाणबुडी
--- पाण्याखालून चालणारी बोट.

(१५) जलचर
--- पाण्यात राहणारे प्राणी.

(१६) झावळ्या
--- नारळाच्या झाडाची पाने.

(१७) पाणवठा
--- गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा.

(१८) वरमाय
--- नव-या मुलाची आई.

(१९) भूचर
--- जमिनीवर राहणारा.

(२०) चावडी
--- गावच्या कामकाजाची जागा.

(२१) अतिवृष्टी
--- खूप पाऊस पडणे.

(२२) वनचर
--- वनात राहणारे प्राणी.

(23) व-हाडी
--- लग्नासाठी जमलेले लोक.

(२४) नावाडी
--- होडी चालवणारा.

(२५) धबधबा
--- उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह.

(२६) भुईकोट
--- सपाट जमिनीवरचा किल्ला.

(२७) उभयचर
-- जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी. 

=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment