माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 31 December 2021

एका शब्दात उत्तरे सांगा.



१)सूर्योदयाची दिशा कोणती ?
-----  ‌‌पूर्व

(२) सूर्यास्ताची दिशा कोणती ?
----- पश्चिम

(३) उत्तर दिशेसमोरील दिशा कोणती ?
----- दक्षिण

(४) दक्षिण दिशेसमोरील दिशा कोणती ?
----- उत्तर

(५) भारताच्या दक्षिण दिशेस असणारा महासागर कोणता ?
----- हिंदी

(६) भारताच्या पश्चिमेस असणारा समुद्र कोणता ?
----- अरबी

(७) भारताच्या पूर्वेस असणारा उपसागर कोणता ?
------ बंगाल

(८) मुख्य दिशा किती ?
----- चार

(९) साठ सेकंदाच्या कालावधीस काय म्हणतात ?
------ मिनिट

(१०) साठ मिनिटांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- तास

(११) चोवीस तासांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- दिवस

(१२) सात दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- आठवडा

(१३) पंधरा दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
---- पंधरवडा

(१४) तीस दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
------ महिना

(१५) बारा महिन्यांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- वर्ष
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५






Thursday 30 December 2021

कालगणना (दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष )




(१) दिवस म्हणजे काय ?
----- पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा २४ तासांचा कालावधी म्हणजे एक दिवस होय.
---------------------------
(२) आठवडा म्हणजे काय ? 
-----  आठवड्याचा कालावधी सात दिवसांचा असतो.  सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी नवीन आठवडा सुरू होतो.
-----------------------------------------------------
(३) पंधरवडा म्हणजे काय ?
-----  प्रत्येकी पंधरा-पंधरा दिवसांच्या कालावधीस पंधरवडा असे महणतात.
-----------------------------------------------------
(४) महिना म्हणजे काय ?
----- एका अमावास्येपासून दुसऱ्या अमावास्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केलेली असते. या काळास महिना असे म्हणतात. 
-----------------------------------------------------
(५) वर्ष म्हणजे काय ?
----- पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा सुमारे ३६५ दिवसांचा कालावधी म्हणजे एक वर्ष होय.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 29 December 2021

ओळखा पाहू मी कोण ?



(१) दिसत नाही कधी कुणाला
पण जाणवतो क्षणाक्षणाला
छातीच्या पिंजऱ्यात लपून असतो
भीती वाटली तर धडधडतो
ओळखा पाहू मी कोण ?
-------------------------------
(२) घर सारविण्यासाठी उपयोग होतो
 माझ्यापासून बायोगॅस तयार होतो
 कुजल्यावर मी खत होतो 
ओळखा पाहू मी कोण ?
-------------------------------------
(३) माझ्यापासून बनवितात स्वेटर 
घोंगडी बनवून वापरतो धनगर
थंडी, वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी माझा वापर
ओळखा पाहू मी कोण ?
--------------------------------------
(४) झाडांना मी आधार देतो
 क्षार व पाणी शोषून घेतो
 त्यांना खोडाकडे मी पाठवितो. 
ओळखा पाहू मी कोण 
-------------------------------------
(५) तऱ्हेतऱ्हेचे रंग मजेचे
वेगवेगळ्या आकाराचे आणि सुगंधाचे 
म्हणून देवालाही आवडतो आम्ही 
फळांना जन्म देतो आम्ही
ओळखा पाहू आम्ही कोण ?
-----------------------------------------
उत्तरे --
 (१) हृदय (२) शेण (३) लोकर (४) झाडाचे मूळ (५) फुले
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday 28 December 2021

शब्दडोंगर (भाषिक उपक्रम )



* पुढील शब्द घेऊन शब्दडोंगर तयार करा.
(१) घर,  (२) गाव, (३) झाड, (४) फूल

(१) ‌घर

घर
हे घर
हे घर आहे.
हे घर छान आहे.
हे घर छान, सुबक आहे.
हे घर छान, सुबक व टुमदार आहे. 
हे घर छान, सुबक, टुमदार व कौलारू आहे.
-----------------------------------------------------
(२) ‌ गाव

गाव
हे गाव
हे गाव आहे.
हे गाव छोटे आहे.
हे गाव छोटे, स्वच्छ आहे. 
हे गाव छोटे, स्वच्छ व नेटके आहे.
हे गाव छोटे, स्वच्छ, नेटके व निसर्गरम्य आहे.
-----------------------------------------------------
(३) झाड

झाड
हे झाड 
हे झाड आहे. 
हे झाड मोठे आहे. 
हे झाड मोठे, डेरेदार आहे. 
 हे झाड मोठे, डेरेदार व उंच आहे. 
हे झाड मोठे, डेरेदार, उंच व हिरवे आहे.
-----------------------------------------------------
(४) फूल

फूल
हे फूल
हे फूल आहे. 
हे फूल लाल आहे. 
हे फूल लाल, सुंदर आहे.
 हे फूल लाल, सुंदर व टपोरे आहे. 
हे फूल लाल, सुंदर, टपोरे व सुगंधी आहे.
=============================
संकलन:- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 27 December 2021

दिलेल्या शब्दाशी संबंधीत शब्दांची यादी करा.



(१) अन्न
----  पोळी,  भाजी, भात, फळे, भाकर.

(२) घर
---- दरवाजा,  खिडकी, बाथरूम, हाॅल,  टी. व्ही.

(३) झाड
---- पाने,  फुले, फांदी, फळ, लाकूड, मूळ.

(४) पाणी
---- शेती,  पिणे, स्वयंपाक, नदी, समुद्र, पाऊस, तळे.

(५) नदी
---- पाणी, गोदावरी, भीमा, समुद्र, धरण, मासे.

(६) आकाश
---- निळा, चंद्र, तारे, ढग, इंद्रधनुष्य, सूर्य.

(७) खेळ
----  क्रिकेट, बाॅल, बॅट, बुध्दिबळ, फूटबाॅल, कबड्डी.

(८) शाळा
---- इमारत, वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, पुस्तके, फळा.

(९) अभ्यास
---- वाचन, लेखन, ऐकणे, पुस्तके, वही, पेन.

(१०) रंग
---- काळा, पांढरा, हिरवा, गुलाबी, लाल, चित्रकला.

(११) कपडे
---- शर्ट, पॅन्ट, बनियन, साडी, परकर, धोतर.

(१२) प्राणी
----  पाळीव, गाय, बैल, मांजर, जंगली, वाघ, सिंह.

(१३) कुटुंब
----  वडील, आई, काका, काकू, आजी, आजोबा.

(१४) पैसे
----  रूपये, नाणी, बॅंक, धनादेश, रोकड, कर्ज.

(१५) निसर्ग
---- झाडे, गवत, आकाश, हवा, पाणी, चंद्र, सूर्य.

(१६) लोक
---- ‌ गरीब, श्रीमंत, उंच, बुटके, दयाळू, रागीट, हुशार.

(१७) पक्षी
---- चिमणी, कावळा, चोच, पंख, पीस, रंग, मोर.

(१८) संगणक
----  माऊस,  की - बोर्ड, स्पिकर, सीपीयू, फाईल.
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 26 December 2021

कालमापन ( तास , दिवस, महिना, वर्ष )


   
      पृथ्वी स्वतःभोवती भोवऱ्यासारखी फिरत असते. तिला स्वतःभोवती एक फेरी मारायला २४ तास लागतात. २४ तास म्हणजेच एक पूर्ण दिवस, तिच्या स्वतःभोवती फिरण्यामुळेच दिवस व रात्र होतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. सूर्याभोवती फिरताना पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो, तो भाग प्रकाशात असतो. अशा प्रकाश असण्याच्या काळालादेखील आपण 'दिवस' असेच म्हणतो. जो भाग सूर्याच्या समोर नसतो तेथे अंधार असतो. त्या अंधाराच्या काळाला आपण 'रात्र' असे म्हणतो.

       पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला सुमारे ३६५ दिवस लागतात. या कालावधीला १ वर्ष म्हणतात. या एका वर्षाचे साधारणपणे १२ समान भाग केलेले आहेत. प्रत्येक भागाला 'महिना' असे म्हणतात. प्रत्येक महिन्याला स्वतंत्र नाव आहे. प्रत्येक महिन्यात साधारणपणे चार सप्ताह असतात. सप्ताहात सात दिवस असतात. सप्ताहातील दिवसाला वार म्हणतात. प्रत्येक वाराला स्वतंत्र नाव दिलेले आहे. एकदा आलेला वार पुन्हा ७ दिवसांनंतर येतो. .

       कोणत्या महिन्यात किती दिवस व कोणत्या दिवशी कोणती तारीख येते, ही माहिती दिनदर्शिकेवरून कळते.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 25 December 2021

का ? ( कारणे सांगा पाहू .)



(१) उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे कपडे का घालतात?

 ----- पांढरे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत. म्हणून उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे कपडे घालतात.
------------------------------------------
(२) सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग का असतो?

----- काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो, म्हणून सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग असतो.
-------------------------------------------
(३) गॅसवर किंवा चुलीवर ठेवण्याच्या पातळ तांब्याच्या भांड्यांना द्रव बाहेरून तळाला माती का लावतात?

---- माती ही उष्णतेचे दुर्वाहक आहे. गॅसवर किंवा चुलीवर ठेवण्याच्या पातळ तांब्याच्या भांड्यांना बाहेरून तळाला माती लावल्याने भांड्यातल पदार्थाला मंद आच दिली जाते.
==========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५


Friday 24 December 2021

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ.



(१) संग तसा रंग
---- संगतीप्रमाणे वर्तन करणे.
--------------------------------
(२) शेजीबाईची कढी , धाव धाव वाढी.
---- एखाद्याची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे.
--------------------------------
(३) सारा गाव मामाचा एक नाही कामाचा.
----  जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे; पण त्यांपैकी कोणाचाच उपयोग न होणे.
-----------------------------------------------------
(४) मानेवर गळू आणि पायाला जळू.
---- रोग एकीकडे उपाय भलतीकडे.
-----------------------------------------------------
(५) डोळ्यात केर आणि कानात फुंकर.
---- रोग एका जागी व उपचार दुस-या जागी.
-----------------------------------------------------
(६)  शितावरून भाताची परीक्षा.
----- वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होते.
-----------------------------------------------------
(७)  रात्र थोडी सोंगे फार.
---- कामे भरपूर ; पण वेळ थोडा असणे.
-----------------------------------------------------
(८) कामापुरता मामा.
---- गरजेपुरते गोड बोलणारा; मतलबी माणूस.
-----------------------------------------------------
(९) इकडे आड,  तिकडे विहीर.
---- दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे.
-----------------------------------------------------
(१०) अंथरुण पाहून पाय पसरावे.
---- ऐपतीच्या मानाने खर्च करावा.
-----------------------------------------------------
(११)बळी तो कान पिळी.
---- बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो.
-----------------------------------------------------
(१२) एका पिसाने मोर. ( होत नाही ).
---- थोड्याशा यशाने हुरळून जाणे.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 23 December 2021

गुरू गुरूजी ( समानार्थी शब्द )



गूरुजी शिक्षक मास्तर
परमेश देव ईश्वर
भाऊ बंधू सहोदर
स्नेही मित्र साथीदार

चाणाक्ष चतुर हुशार
चाकर दास नोकर
मनसुबा बेत विचार
खेळ मनोरंजन विहार

काळोख तिमिर अंधार
आस्था जिव्हाळा आदर
सुरेख रम्य सुंदर
नजराणा भेट उपहार

तरबेज पारंगत‌ निपुण
बुद्धिमान पंडित विद्वान
आनंद संतोष समाधान
महा मोठा महान

माय माऊली ममता
बाप वडील पिता
आस्था काळजी चिंता
रयत प्रजा जनता

अभ्यास व्यासंग परिपाठ 
मार्ग रस्ता वाट
प्रात:काळ उषा पहाट
कठीण अवघड बिकट

छंद नाद आवड
सतत अविरत अखंड 
प्रकाश तेज उजेड
मेहनत प्रयत्न धडपड
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 22 December 2021

कोनांचे प्रकार ( भूमिती माहिती -- कोन )



(१) शून्य कोन :-
----  शून्य अंश माप असणाऱ्या कोनाला शून्य कोन असे म्हणतात.

(२) लघुकोन  :-
---- ज्या कोनाचे माप 0° पेक्षा जास्त परंतु 90% पेक्षा कमी असते. त्या कोनास लघुकोन असे म्हणतात. 

(३)  काटकोन :
----  90° मापाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात. 

(४) विशालकोन :-
----  ज्या कोनाचे माप 90° पेक्षा जास्त परंतु 180° पेक्षा कमी असते, त्या कोनास विशालकोन असे म्हणतात.

(५) सरळकोन :-
---- 180° मापाच्या कोनाला सरळकोन असे म्हणतात. 

(६) प्रविशाल कोन :-
---- ज्या कोनाचे माप 180° पेक्षा जास्त परंतु 360° पेक्षा कमी असते, त्या कोनास प्रविशाल कोन असे म्हणतात. 

(७) पूर्ण कोन :-
---- 360° मापाच्या कोनाला पूर्ण कोन असे म्हणतात. 
================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
        जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
       ता. साक्री जि. धुळे
      ९४२२७३६७७५


2.

Monday 20 December 2021

गणितीय प्रश्नावली



(१)लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती ?
उत्तर -- १०

(२) मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती ?
उत्तर -- ९

(३) लहानात लहान एक अंकी नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर -- १

(४) मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती ?
उत्तर --. ९९

(५) लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती ?
उत्तर -- १००

(६) मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ?
उत्तर -- ९९९

(७) मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर -- सांगता येत नाही.

(८) एक शतक म्हणजे किती एकक  ?
उत्तर --  १००

(९) १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर --  १ वेळा

(१०)  १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर --  ११ वेळा

(११) १  ते  १०० पर्यंत १ हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर -- २१ वेळा

(१२)  १ ते १०० पर्यंत  २ ते ९ अंक  हे प्रत्येकी किती वेळा येतात ?
उत्तर --  २० वेळा

(१३) १ ते १०० पर्यंत १ हा अंक शतकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर --  १ वेळा

(१४) १ ते १०० या संख्यांमध्ये एक अंकी संख्या एकूण किती आहेत ?
उत्तर --  ९

(१५) १ ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?
उत्तर -- ९०

(१६) १ ते १०० या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या एकूण किती आहेत ?
उत्तर -- १  ( एक )

(१७) १ दशक म्हणजे किती एकक ?
उत्तर -- १० एकक

(१८)  १ शतक म्हणजे किती दशक ?
उत्तर -- १० दशक

(१९)   १ ते १० पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- ५५

(२०)  १ ते १०० पर्यंत ९ हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर --  २० वेळा
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 19 December 2021

जोडशब्द ( मराठी भाषा जोडशब्द )



मराठीत काही वेळा पहिल्या शब्दाच्या अर्थाचाच शब्द जोडून
जोडशब्द तयार होतो  किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन जोडशब्द तयार होतात.

अघळपघळ अदलाबदल अधूनमधून अवतीभोवती
आडपडदा  आरडाओरडा आसपास आडवातिडवा
आंबटचिंबट इडापिडा उघडाबोडका उपासतापास उधारउसनवार  उरलासुरला एकटादुकटा ऐसपैस 
 ऐषआराम ओढाताण ओबडधोबड अंगतपंगत 
उंचनीच अंदाधुंदी कडीकोयंडा कडेकपारी
 कडेकोट कच्चीबच्ची‌ कपडालता कर्तासवरता  
कागदपत्र काटकसर  कानाकोपरा कापडचोपड 
काबाडकष्ट  कामधंदा कामकाज कायदेकानू
 कावराबावरा काळवेळ काळासावळा कांदाभाकरी किड्कमिडूक क्रियाकर्म कुजबूज केरकचरा 
कोडकौतुक  कोर्टकचेरी खबरबात खाडाखोड 
खाचखळगे खाणाखुणा खेडोपाडी ख्यालीखुशाली
खेळखंडोबा गडकिल्ले गडकोट गणगोत गल्लीबोळ
गाजावाजा गाठभेट गुरेढोरे गोडधोड गोडीगुलाबी 
गोरगरीब गोरामोरा गोरागोमटा गोळाबेरीज 
घरदार चट्टामट्टा चढउतार चारापाणी चालढकल  
चिठ्ठीचपाटी चारचौघे चिटपाखरू चीजवस्तू 
चुगलीचहाडी चूपचाप चूकभूल चेष्टामस्करी 
चोळामोळा जमीनजुमला जवळपास जडीबुटी 
जाडजूड जाडाभरडा जाळपोळ ‌ जीर्णशीर्ण 
जीवजंतू जुनापुराणा जेवणखाण झाडेझुडपे 
ट़ंगळमंगळ टिवल्याबावल्या  ठाकठीक ठावठिकाणा  
डागडुजी डामडौल तडकाफडकी तारतम्य 
ताळमेळ ताळतंत्रतिखटमीठ तोडफोड‌ तोळामासा
 तंटाबखेडा थकबाकी थट्टामस्करी थाटमाट
 थातुरमातुर थांगपत्ता दगाफटका दमदाटी दयामाया 
दंगाधोपा दंगामस्ती दगडधोंडा दागदागिने दानधर्म 
दाणापाणी दाणागोटा दाणावैरण दिवाबत्ती 
दिवसाढव‌ दीनदुबळा दुधदुभते देवधर्म देवघेव
 देवाणवाण धडधाकट धक्काबुक्की धष्टपुष्ट
धनदौलत धनधान्य धरपकड धरबंध धागादोरा
 धूमधाम  धूळदाण ध्यानीमनी नदीनाला नफातोटा
 नवाकोरा‌ नोकरचाकर पडझड पाचपोच पाटपाणी
 पाऊसपाणी पाठपुरावा पानसुपारी पालापाचोळा पाहुणारावळा पाळेमुळे पूजाअर्चा पैपाहुणा  
पोरेबाळे पोरेसोरे फाटाफूट फौजफाटा फंदफितुरी‌ 
बरेवाईट बहीणभावंडे  बागबगीचा बाजारहाट
बापलेक बायाबापड्या बोलभांड भाऊबंद 
भाकरतुकडा भाजीपाला भोळाभाबडा भांडणतंटा 
भांडीकुंडी भीडभाड मनोमन मानपान  मायमाऊली
 मारपीट मारझोड मालमसाला मीठभाकरी
मीठमिरची मुलेबाळे मेवामिठाई मोलमजुरी
मोडतोड मंत्रतंत्र रडतखडत रमतगमत राजेमहाराजे
रीतिरिवाज रूपरंग‌ रूपसुंदर रोखठोक रोगराई
लतावेली लाकूडफाटा लाडीगोडी लुळापांगळा
वजनेमापे वृक्षवेली वाडवडील शहाणासुरता 
शिक्कामोर्तब शेजारीपाजारी शेंठसावकार शेतीभाती 
शेतीवाडी सगेसोयरे सणवार सरमिसळ सरसकट
सरळसोट संगतसोबत सटरफटर सतीसावित्री
सडासारवण सल्लामसलत सहीसलामत
साजशृंगार साजियगोजिरा साधाभोळा साधासुधा 
साधुसंत साफसफाई‌ सुखशांती सोनेनाणे
सोयरसुतक सोयराधारा सोक्षमोक्ष सांगोपांग
स्थावरजंगम स्थिरस्थावर हवापाणी हळदकुंकू 
हालअपेष्टा हालहवाल हावभाव हेवादावा होमहवन
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 18 December 2021

ऊर्जा साधनांची थोडक्यात माहिती (भौगोलिक माहिती)



(१) कोळसा.

----(१) प्राचीन काळी भू-हालचालींमुळे वनस्पती व प्राण्यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. (२) त्यावर दाब व उष्णता या घटकांचा परिणाम होऊन त्यांमधील घटकांचे विघटन झाले व केवळ काव्ये शिल्लक राहिली. (३) त्यापासून कोळशाची निर्मिती झाली. (४) साधा कोळसा स्वयंपाकघरात किंवा भटारखान्यात वापरला जातो. (५) दगडी कोळसा उद्योगधंद्यांमध्ये व त्याचप्रमाणे औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वापरला जातो.
--------------------------------------------------------------
(२) खनिज तेल व नैसर्गिक वायू,

---- (१) खनिज तेल भूपृष्ठाखाली अथवा सागरतळाखाली जमिनीत सापडते. (२) बहुतेक खनिज तेलांच्या विहिरींमध्ये नैसर्गिक वायूंचे साठेही आढळतात. (३) खनिज तेलाचे साठे मर्यादित स्वरूपात असतात. त्यामानाने त्याची मागणी जास्त आहे. त्यामुळे खनिज तेलाची किंमत जास्त असते. (४) खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे त्यास 'काळे सोने' असे म्हणतात. (५) औष्णिक विद्युत निर्मितीसाठी या ऊर्जा साधनांचा वापर होतो.
--------------------------------------------------------------
(३) बायोगॅस

---- (१) प्राण्यांची विष्ठा व जैविक टाकाऊ पदार्थ यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती करता येते.(२) या ऊर्जेचा वापर स्वयंपाकघरातील गॅस म्हणून पाणी गरम करण्यासाठी दिवे प्रकाशित करण्यासाठी करता येतो. (३) ग्रामीण भागांत काही शेतकऱ्यांनी घराच्या आवारात बायोगॅस प्रकल्प उभे केले आहेत.
--------------------------------------------------------------
(४) कचऱ्यापासून ऊर्जा

---- (१) मोठी शहरे व महानगरे येथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातील जैविक कचऱ्याचा वापर वायुनिर्मितीसाठी करता येतो. (२) या वायूपासून विद्युत निर्मिती करता येते. (३) कन्चन्यापासून ऊर्जा तयार करून शहरांतील कचऱ्याच्या समस्येवर मात करता येऊ शकते व वीजनिर्मितीच्या बाबतीत शहरे स्वयंसिद्ध होऊ शकतात. 
--------------------------------------------------------------
(५) अणुऊर्जा.

----(१) युरेनियम, धोरियम अशा खनिजांच्या अणूचे विभाजन करून ऊर्जा निर्माण करता येते. (२) यासाठी अगदी थोड्या प्रमाणात या खनिजांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करता येते. (३) भारतासह संयुक्त संस्थाने, रशिया, फ्रान्स, जपान इत्यादी काही मोजक्या देशांमध्येच या ऊर्जेचा वापर केला जातो.
--------------------------------------------------------------
(६) जलऊर्जा.

---- (१) वाहत्या पाण्याच्या गतिज ऊर्जेपासून मिळवलेल्या ऊर्जेला 'जलऊर्जा' म्हणतात. (२) या ऊर्जेचा वापर करून जलविद्युत निर्मिती केली जाते. (३) जलऊर्जेमुळे पर्यावरणाची हानी होत नाही. तसेच जलविद्युत निर्माण करताना वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करता येतो.
--------------------------------------------------------------
(७) पवनऊर्जा.

----  (१) वाऱ्याच्या शक्तीचा वापर विद्युतनिर्मितीसाठी अलीकडेच सुरू झाला आहे. (२) पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असावा लागतो. (३) वान्याच्या वेगामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात व गतिज ऊर्जा निर्माण होते. या गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाते. (४) शेतीसाठी, बरगुती वापरासाठी व उद्योगांसाठी या ऊर्जेचा वापर केला जातो.
--------------------------------------------------------------
 (८) सौरऊर्जा.

---- (१) सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. (२) भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात सौरऊर्जेचा वापर करण्यास भरपूर वाव आहे. (३) सौरऊर्जेद्वारा कुकर, दिवे, हिटर वाहने इत्यादी उपकरणे चालवता येतात. (४) सौरऊर्जेची निर्मिती सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यांवर अवलंबून असते.
--------------------------------------------------------------
(९) सागरी ऊर्जा.

----- (१) सागरी लाटा व भरती-ओहोटी या सागर जलाच्या हालचाली अविरतपणे चालू असतात. (२) लाटांचा वेग व शक्ती यांचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचे तंत्र आता अवगत झाले आहे. (३) सागरी ऊर्जा या गतिज ऊर्जेचे विदयुत ऊर्जेत रूपांतर करता येते. (४) ही ऊर्जा प्रदूषणमुक्त व अक्षय आहे. (५) भारतासारख्या द्विपकल्पीय देशात या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. 
--------------------------------------------------------------
(१०) भूऔष्णिक ऊर्जा.

---- (१) पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक ३२ मीटरला १° से ने वाढते. (२) या जमिनीखालील तापमानाचा वापर करून आता विदयुतनिर्मिती केली जात आहे. (३) भूऔष्णिक ऊर्जेचा वापर विदयुत निर्मितीसाठी केला जातो. (४) भारतात हिमाचल प्रदेश राज्यात मणिकरण येथे भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे.
==================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५


Friday 17 December 2021

Listen, read and write your answer. ( खालील प्रश्नांची ( Yes, No अशी ) उत्तरे द्या.



(1) Is a crow pink ?
--- No

(2) Is a tiger green ? 
--- No

(3) Is a parrot green ?
--- Yes

(4) Is the sun cold ?
--- No

(5) Is a rabbit slow ?
--- No

(6) Does a bag fly ?
--- No

(7) Is sugar sweet ?
--- Yes

(8) Do lions fly ?
--- No

(9)  Do tigers sing ?
--- No

(10) Does a table walk ?
--- No

(11)  Does a tree jump ?
--- No

(12)  Does the chair cry ?
--- No

(13) Do stones run ?
--- No

(15) Does an egg laugh ?
--- No

(17) Does a lion roar ?
--- Yes 

(18) Does a wall speak ?
--- No

(19) Do the Birds Fly ?
--- Yes

(20) Do dog run ?
--- Yes
=========================
SHANKAR  SITARAM. CHAURE
z. p. school - jamnepada 
tal. sakri  dist - dhule
9422736775

Thursday 16 December 2021

प्रश्न मराठीत - उत्तर इंग्रजीत सांगा .



(1) अन्नाची चव घेण्याकरिता शरीराचा कोणता अवयव वापरला जातो ?
उत्तर --  Tongue ( टंग )

(2) आपण हाताच्या कोणत्या अवयवावर घड्याळ घालतो ?
उत्तर -- Wrist  ( रिस्ट )

(3) शरीराच्या सर्व हालचालींवर शरीराचा कोणता अवयव नियंत्रण ठेवतो ?
उत्तर -- Brain  (ब्रेन )

(4) टीव्ही पाहताना शरीराच्या कोणत्या भागाचा प्रामुख्याने उपयोग होतो ?
उत्तर -- Eyes ( आइज )

(5) आपल्या संपूर्ण शरीरात रक्त नेणा-या अवयवाचे नाव सांगा ?
उत्तर -- Heart  ( हार्ट )

(6) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- Cub (कब )

(7) वाघाचे निवासस्थान कोणते ?
उत्तर --. Den ( डेन )

(8) मुख्य दिशा किती ?
उत्तर -- Four  ( फोर )

(9) उंदराचे राहण्याचे ठिकाण कोणते ?
उत्तर -- Hole   ( होल )

(10) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- Calf  ( काफ )

(11) पक्ष्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- Nest  ( नेस्ट  )

(12) ' खुराडा ' कोणाच्या घरास म्हणतात ?
उत्तर -- Hen  ( हेन )

(13) एका आठवड्याचे दिवस किती ?
उत्तर -- Seven  ( सेव्हन)

(14) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?
उत्तर -- West  ( वेस्ट )
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 15 December 2021

सामान्यज्ञान प्रश्नावली



(1) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
उत्तर -- रविंद्रनाथ टागोर

(2) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर -- डॉ. राजेंद्र प्रसाद

(3) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
उत्तर -- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

(4) छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तर -- मुंबई

(5) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील

(6) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
उत्तर -- आमृतसर

(7) महाराष्ट्रात कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे ‌?
उत्तर -- वारली चित्रकला

(8) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू

(9) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला

(10) भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या ?
उत्तर -- इंदिरा गांधी

(11) भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या शहरात सुरू झाली ?
उत्तर -- मुंबई

(12) भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती ?
उत्तर -- ७ ( सात )
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday 14 December 2021

हिंदी निबंध -- मोर / गाय / बाघ



(१)  मोर

         मोर एक सुंदर पक्षी है। यह बाग और जंगल में पाया जाता है।
          मोर का शरीर लंबा होता है। उसकी गरदन नीले रंग की होती है। उसके सिर पर कलगी होती है। मोर के पंख लंबे और रंगबिरंगे होते हैं। उसके पंखों पर आँख के आकार के नीले-नीले सुंदर धब्बे होते हैं। 
        मोर स्वभाव से साहसी होता है। वर्षा उसकी प्रिय ऋतु है। काले-काले बादलों को देखकर मोर खुशी से झूम उठता है और पंख फैलाकर नाचने लगता है।
         मोर अनाज के दाने, नरम फल और कीड़े-मकोड़े खाता है। 
        मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है। 
===============================
(२) गाय

          गाय एक दुधारु पशु है। यह सफेद, गेरुए, काले या चितकबरे रंग की होती है। गाय के दो सींग होते हैं। उसकी पूँछ लंबी होती है। 
         गाय घास, भूसा, दाना और खली खाती है। गाय हमें दूध देती है। उसका दूध मीठा, पचने में हल्का और पौष्टिक होता है।
       गाय के बच्चे को 'बछड़ा' या 'बछिया' कहते हैं। जब बछड़ा बड़ा होता है, तब उसे 'बैल' कहा जाता है।
      गाय पूज्य मानी जाती है। उसे हम गोमाता मानते हैं।
===============================
(३)  बाघ

          बाघ एक भयानक जंगली जानवर है। उसका शरीर लंबा और गठीला होता है। बाघ बहुत ताकतवर होता है। उसके दाँत नुकीले और पंजों के नाखून तेज होते हैं। उसकी पूँछ लंबी होती है। उसका रंग पीला होता है। कुछ प्रदेशों में सफेद बाघ भी पाए जाते हैं। बाघ के शरीर पर काली धारियाँ होती हैं। वह अँधेरे में भी देख सकता है। बाघ पानी में अच्छी तरह तैर सकता है।
       बाघ मांसाहारी पशु है। वह हिरन जैसे जंगली जानवरों का शिकार करता है।
       बाघ हमारा राष्ट्रीय पशु है। बाघ को हम चिड़ियाघर में देख सकते हैं।
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

सामान्यज्ञान - प्रश्नावली



 (१) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ‌?
उत्तर -- खुराडे

(२) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा

(३) दोन नद्या एकत्र मिळतात त्या ठिकाणास काय म्हणतात ?
उत्तर -- संगम

(४) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- राई

(५) चिमणीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- चिवचिव

(६) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे

(७) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- पाडस  / शावक

(८) उंदराच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ

(९) गाईच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- गोठा

(१०)जादूचे खेळ करून दाखवणा-यास काय म्हणतात ?
उत्तर -- जादूगार

(११) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ‌?
उत्तर -- वासरू

(१२)) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- तबेला

(१३) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर --  करडू

(१४) च़ंद्रापासून येणा-या प्रकाशाला काय म्हणतात ?
उत्तर -- चांदणे

(१५) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- रेकणे
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 13 December 2021

गणितीय सामान्यज्ञान प्रश्नावली



(१) डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात ?
उत्तर -- ३१ दिवस

(२) मे महिन्यानंतर कोणता महिना येतो ?
उत्तर -- जून

(३) १ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर ?
उत्तर -- १०० सेमी

(४) १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- १००० मीटर

(५) १  किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर --  १००० ग्रॅम

(६) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर -- १००० मिली

(७) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- ६० सेकंद

(८)  १ तास म्हणजे किती मिनिटे  ?
उत्तर -- ६० मिनिटे

(९)चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार

(१०) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर --  तीन

(११) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार

(१२) १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती ?
उत्तर --. ५५

(१३) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर --. ९९

(१४) १ डझन म्हणजे किती वस्तू ( नग )  ?
उत्तर -- १२

(१५)  १ दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर -- २४ तास
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 12 December 2021

एका शब्दात उत्तर सांगा ? (सामान्यज्ञान)



(१) पृथ्वीचा आकार कसा आहे ?
उत्तर  -- गोल

(२) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो  ?
उत्तर -- पूर्व

(३) आठवड्याचे दिवस किती ? 
उत्तर --  सात

(४) एक वर्षाचे महिने किती  ?
उत्तर  -- बारा

(५) भारतीय सौर वर्षाचे महिने किती? 
उत्तर :-- ‌बारा 

(६) ग्रेगरियन वर्षाचे महिने किती?
उत्तर  --    बारा 

(७) मुख्य दिशा किती आहेत  ?
उत्तर --  चार

(८)  उपदिशा किती आहेत ?
उत्तर --  चार

(९)  मुख्य ऋतू किती आहेत ?
उत्तर --  तीन

(१०)  भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर  --  मोर

(११) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?
उत्तर -- वाघ

(१२) नदीच्या काठांना काय म्हणतात ?
उत्तर -- तीर  / थडी

(१३) कोळी किड्याला किती पाय असतात ?
उत्तर --  आठ

(१४) आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर --.  शहामृग

(१५) ज्ञान देणा-या अवयवांना काय म्हणतात ?
उत्तर --  ज्ञानेंद्रिये

(१६) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?
उत्तर  -- पाच

(१७) चवीचे प्रकार किती आहेत ?
उत्तर -- चार
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 11 December 2021

वह हैं कौन ? ( पढो , समझो और बताओ )



1) वह लकड़ी काटता है।
वह खटिया बनाता है।
वह खिड़की बनाता है। 
वह मेज बनाता है।
वह है कौन ?

उत्तर :- वह बढ़ई है।
--------------------------------
2) वह खेत जोतता है।
 वह फसल उगाता है। 
वह सबको अन्न खिलाता है। 
वह है कौन ?

उत्तर :- वह किसान है।
----------------------------------
3) वह मिट्टी रौंदता है।
वह मटका बनाता है।
वह सुराही बनाता है।
वह है कौन ?

उत्तर :-  वह कुम्हार है।
---------------------------------------
4) वह मरीजों की जाँच करता है।
 वह मरीजों को दवा देता है। 
वह मरीजों को सुई लगाता है। 
वह है कौन ?

उत्तर : -  वह डॉक्टर है।
------------------------------------
5) वह दाढ़ी बनाता है।
वह बाल बनाता है।
वह बालों की मालिश करता है।
वह है कौन ?

उत्तर : वह नाई है।
-----------------------------------------
6) वह पौधों को पानी देता है। 
 वह बाग की रखवाली करता है। 
वह फूलों की माला बनाता है। 
वह है कौन ?

उत्तर : -  वह माली है।
-----------------------------------------
7) वह खाकी कमीज और पैंट पहनता है।
 वह चोरों को पकड़ता है।
वह हमारी रक्षा करता है।
वह है कौन ?

उत्तर : - वह पुलिस है।
-----------------------------------------
8) वह सीना तानकर खड़ा होता है।
वह पहरा देता है।
वह देश की रखवाली करता है।
वह है कौन ?

उत्तर :-  वह सैनिक है।
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌शिक्षक )
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
    ता. साक्री, जि. धुळे
   9422736775

Friday 10 December 2021

वनस्पती सामान्यज्ञान प्रश्नावली



तुम्हांला माहीत असलेल्या वनस्पतींची नावे सांगा.

 (१) कोणत्या वनस्पतींची आपण मुळे खातो.
उत्तर --  गाजर ,  मुळा ,  बीट. 
-------------------------
(२) कोणत्या वनस्पतीचे आपण खोड खातो.
उत्तर  --  ऊस,   बटाटा,   आले. 
---------------------------------------------
(३) कोणत्या वनस्पतीची आपण पाने खातो.
उत्तर  --  कोबी,   मेथी,  पालक. 
---------------------------------------------
(४) कोणत्या वनस्पतीची फळे आपण भाजी म्हणून खातो.
उत्तर  --  टोमॅटो ,  भेंडी ,  भोपळा.
---------------------------------------------
(५) कोणत्या वनस्पतीच्या आपण बिया खातो.
उत्तर  --  वाटाणा,  तूर , हरभरा ,  मूग ,  वाल.
---------------------------------------------
(६) कोणत्या वनस्पतीची खोडे खडबडीत असतात.
उत्तर -- वड,  पिंपळ ,  आंबा.
---------------------------------------------
(७) कोणत्या वनस्पतींची खोडे गुळगुळीत असतात.
उत्तर -- कडुनिंब ,  निलगिरी, ‌ गुलमोहर,  पेरू
-----------------------------------------------
(८) कोणत्या वनस्पतींची पाने खरखरीत असतात.
उत्तर --  पारिजातक , बांबू  ,  सूर्यफूल.
----------------------------------------------
(९) कोणत्या वनस्पतींची पाने गुळगुळीत असतात.
उत्तर --  आंबा,  अळू,  पिंपळ ,  जास्वंद.
----------------------------------------------
(१०) कोणत्या वनस्पतींच्या खोडांना काटे असतात.
उत्तर --  गुलाब,  बोर , निवडुंग,   करवंद,  लिंबू
----------------------------------------------
(११) कोणत्या वनस्पती भक्कम खोडाच्या असतात ?
उत्तर  --  वड,  पिंपळ,  आंबा,  गुलमोहर,  चिंच
---------------------------------------------
(१२) कोणत्या वनस्पती आधाराने वाढतात  ?
उत्तर  --  कारल्याचा वेल,  भोपळ्याचा वेल ,  द्राक्षाचा वेल , जाई.
---------------------------------------------
(१३) कोणत्या वनस्पतींना शेंगा येतात  ?
उत्तर --- गवार,  शेवगा,  मटार ,  गुलमोहर, फरसबी
-----------------------------------------------
(१४) कोणत्या फळात एक बी असते  ?
उत्तर --  आंबा,  आवळा , बोरे,   जांभूळ,  खजूर
-----------------------------------------------
 (१५) कोणत्या फळात अनेक  बिया असतात  ?
उत्तर -- कलिंगड,  सीताफळ ,  फणस , चिकू,  पेरू
----------------------------------------------
(१६) कोणत्या वनस्पतींना रंगीत फुले येतात ?
उत्तर -- गुलाब , जास्वंदी,  झेंडू,  डेलिया,  सूर्याफूल.
========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
        ता. साक्री, जि. धुळे
     ‌  ९४२२७३६७७५

Thursday 9 December 2021

Words of the same pronunciation but different in meanings. ( वडर्स ऑफ द सेम प्रनन्सिएशन बट डिफरन्ट इन मिनिंग्ज )



सारख्या उच्चाराचे पण वेगळा अर्थ असणारे शब्द

Beat  ( बीट ) -- मारणे
Bit  ( बीट ) -- गट

Carrot  ( कॅरट ) -- गाजर
Carat  ( कॅरट ) -- रत्न मोजण्याचे माप

Deer  ( डिअर ) -- हरिण
Dear  ( डिअर ) -- प्रिय

Ear ( इअर ) --  कान
Year  ( इअर ) -- वर्ष

Fail  ( फेल ) -- नापास
Fell  ( फेल ) -- खाली पडणे

Gate  ( गेट ) -- फाटक
Get  ( गेट ) -- मिळणे

Hare  ( हेअर ) -- ससा
Hair ( हेअर ) -- केस

Hear  ( हिअर ) -- ऐकणे
Here  (  हिअर ) -- इकडे / इथे

Heat  ( हीट ) -- उष्णता
Hit  ( हीट ) -- फटका , टोला मारणे

I  ( आय )  -- मी
Eye  ( आय ) -- डोळा

In  (इन ) -- आत
Inn  ( इन ) -- खानावळ

Leak  ( लीक ) -- गळणे
Lick  ( लीक ) -- चाटणे

Leave  ( लिव्ह ) -- सोडून देणे
Live  ( लिव्ह ) -- राहणे

Latter  ( लेटर ) -- पुढचा, नंतर
Letter  ( लेटर ) -- पत्र

Main  ( मेन ) -- प्रमुख
Mane  ( मेन ) -- आयाळ

Meal  ( मील ) -- जेवण
Mill  ( मिल ) -- गिरणी

Meat  ( मीट ) - मटण
Meet  ( मीट ) -- भेटणे

Not  ( नाॅट ) -- नाही
Knot  ( नाॅट ) -- गाठ

One  ( वन ) -- एक
Won ( वन ) - जि़कला

Pool  ( पूल ) -- डबके
Pull  ( पूल ) -- ओढणे

Read  ( रेड ) -- वाचले
Red  ( रेड ) -- लाल

Reach  ( रीच ) -- पोहचणे
Rich  ( रीच ) -- श्रीमंत

Seat  ( सीट ) -- आसन
Sit  ( सिट ) -- बसणे

seen  (सीन ) -- पाहिले
Scene  ( सीन ) -- देखावा

Sleep  ( स्लीप ) -- झोपणे
Slip  ( स्लीप ) -- घसरणे, निसटणे

Sea  (  सी  ) -- समुद्र
See  ( सी ) -- पाहणे

Sheep ( शीप ) -- मेंढी
Ship  ( शीप ) -- जहाज

Son ( सन ) -- मुलगा
Sun  ( सन ) -- सूर्य

Steal  ( स्टील ) -- चोरणे
Steel  ( स्टील ) -- लोख़ंड , पोलाद

Tell  ( टेल ) -- सांगणे
Tail  ( टेल ) -- शेपूट

To  ( टू  ) -- कडे
Two  ( टू ) -- दोन

Too  ( टू  ) -- सुध्दा
Two  ( टू  ) -- दोन

Wet  ( वेट )  -- ओला
Vet  ( वेट ) -- पशुवैद्य

Wait  ( वेट ) -- वाट पहाणे
Wet  ( वेट  ) -- ओला

Waste  ( वेस्ट ) -- वाया घालवणे
West  ( वेस्ट ) -- पश्चिम दिशा

Whole  ( होल ) -- संपूर्ण
Hole  ( होल ) -- छिद्र

Weak  ( विक ) -- अशक्त
Week  ( विक ) -- आठवडा

Write  ( राईट ) -- लिहिणे
Right  ( राईट )  -- उजवा

Root ( रूट ) -- मूळ
Route ( रूट ) - मार्ग
======================
Shankar  Sitaram  Chaure
z. p. school - jamnepada 
tal. sakri  dist - dhule
9422736775

Wednesday 8 December 2021

फरक सांगा ( सजीव -- निर्जीव ) / ( हातांची बोटे आणि पायांची बोटे)



~~~~ सजीव --
(१)सजीवांना अन्न, पाणी आणि हवा यांची गरज असते.
(२) सजीव स्वत:हून हालचाल करतात.
(३) सजीवांची वाढ होते..

~~~~ निर्जीव --
१. निर्जीवांना अन्न, पाणी आणि हवा यांची गरज नसते.
२. निर्जीव स्वतःहून हालचाल करीत नाहीत.
३. निर्जीवांची वाढ होत नाही.

============================
~~~~  हातांची बोटे --
(१) हातांची बोटे लांब असतात.
(२) हातांच्या बोटांचा अंगठा इतर बोटांच्या समोरच्या बाजूस करता येतो.

~~~~ पायांची बोटे --
(१) पायांची बोटे आखूड असतात. 
(२) पायांच्या बोटांचा अंगठा इतर बोटांच्या समोरच्या बाजूस करता येत नाही.
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday 7 December 2021

दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा.


       भाषिक उपक्रम
(१) ळ  पा  क   ------ कपाळ
(२) णी  प  पा  ------ पापणी
(३) घा  ड  गु  -------- गुडघा
(४) ड  क  बो ------- बोकड
(५) र  ज  मां -------- मांजर
(६) रु  क  को -------- कोकरु
(७) व  ढ  गा --------- गाढव
(८) रु  स  वा -------- वासरू
(९)  र दी उं ---------- उंदीर
(१०) ड क मा -------- माकड
(११) रु  गा  कां -------- कांगारू
(१२) ण  री  ह -------- हरीण
(१३) फ  रा  जि --------- जिराफ
(१४) स   र   त  -------- तरस
(१५) डा  र  स  -------- सरडा
(१६) र   ग   म  ---------- मगर
(१७) व  स  का --------- कासव
(१८) डा  क  खे --------- खेकडा
(१९) डा  ब  कों  --------- कोंबडा
(२०) ळ  की  को  -------- कोकीळ
(२१) ळा  ग  ब --------- बगळा
(२२) क  द  ब ---------- बदक
(२३) ट  प  पो ------------ पोपट
(२४)  ड  ब  घु ------------ घुबड
(२५) णी  म  चि ----------- चिमणी
(२६) ळ  म  क ----------- कमळ
(२७) टा  टा  ब ------------ बटाटा
(२८) स  ण  फ ----------- फणस
(२९) ळ  र  ना ------------- नारळ
(३०) ळा  व  आ ------------ आवळा
=========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 5 December 2021

डाॅ बाबासाहेब आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर )



        डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर
समाजसुधारक होते. त्यांचा जन्म
१४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील
महू या गावी एका गरीब कुटुंबात झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे
मूळ गाव. त्यांचे सुरूवातीचे प्राथमिक
शिक्षण दापोलीच्या शाळेत झाले.
  माध्यमिक शिक्षणासाठी ते मुंबईत आले.
उत्तम  तऱ्हेने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळवून
एल्फिन्स्टन कॉलेजात गेले. तिथून पदवी
संपादन केल्यावर बडोदे सरकारच्या मदतीने
भीमराव अमेरिकेस गेले. अर्थशास्त्रात
एम. ए.; पी. एच. डी. पदवी प्राप्त करून
ते परत भारतात आले. मुंबईत सिड्नहॅम
कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी करू लागले.
नोकरी करीत असतानाच आपल्या अस्पृश्य
समजण्यात येणाऱ्या बांधवांना त्या त्रासातून
मुक्त करण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण
केली.
       पुढे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू 
महाराजची मदत घेऊन ते इंग्लंडला गेले
आणि अर्थशास्त्रातील डी. एस. सी. ही
सर्वोच्च पदवी व बॅरिस्टर ही पदवी संपादन
करून ते मुंबईच्या सरकारी महाविद्यालयात
आधी प्राध्यापकाची व मग प्राचार्य म्हणून
नोकरी करू लागले. महाडचे चवदार तळे
व नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांना
खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केले.
  बाबासाहेबांना दलित समाजाविषयी खूप
कळकळ होती. दलितांची सुधारणा व्हावी.
म्हणून ते झटले. जातीभेद नाहीसा व्हावा,
असे त्यांना वाटे. यासाठी लोकांनी खूप
शिकले पाहिजे, असे त्यांना वाटे. यासाठी
त्यांनी शाळा व महाविद्यालये काढली.
शिक्षणाचा प्रसार केला.
  त्यांना वाचनाचे खूप वेड होते. त्यांनी
स्वतः खूप ग्रंथ लिहिले होते. डाॅ. बाबासाहेब
आंबेडकर कायदेपंडित म्हणून ओळखले
जात.ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार
होते.
  ६ डिसेंबर १९५६ मध्ये त्यांचे निधन झाले.
  अशा या भारताच्या थोर सुपुत्राला सरकारने
' भारतरत्न ' ही पदवी बहाल केली.
---------------------------------------------
 संकलन:- शंकर सिताराम चौरे  (प्रा.शिक्षक)
 जि. प. शाळा - जामनेपाडा 
 केंद्र - रोहोड ,  ता.साक्री जि.धुळे
         📞 ९४२२७३६७७५

Saturday 4 December 2021

पृथ्वीची आवरणे (भौगोलिक माहिती )



 
• शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण ही पृथ्वीची चार आवरणे आहेत.

(१) शिलावरण :-
--- पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भाग म्हणजे 'शिलावरण' होय.
 --- पृष्ठभागापासून शिलावरण १०० किमी खोल आहे.
--- शिलावरणावरच पर्वत, पठार, मैदाने इत्यादी भूरूपे दिसतात.
--- शिलावरण खडकांनी बनले आहे. खडकांचे अग्निज खडक, स्तरित खडक व रूपांतरित खडक असे तीन प्रकार आहेत.
--- जमिनीच्या सलग व मोठ्या भागास 'खंड' म्हणतात.
--- आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व अंटाविंटका ही सात खंडे आहेत. 
--- खंडांच्या दरम्यान महासागर आहेत.
-------------------------------------------------------
(२) जलावरण :-

--- पृथ्वीवरचा जलभाग म्हणजे 'जलावरण' होय. 
--- महासागर, सागर (समुद्र), सरोवर, तलाव, नदया हे सर्व जलावरणाचे भाग आहेत.
--- खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास 'महासागर' म्हणतात.
 --- पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी व आर्क्टिक असे चार महासागर आहेत. सर्व महासागर सलग आहेत.
--- आकाराने लहान खाऱ्या पाण्याचे साठे म्हणजे 'समुद्र' होत.
--- काही समुद्र हे पूर्णत: भूवेष्टित असतात. 
--- तीन बाजूंनी जमीन असणारा खाऱ्या पाण्याचा जलाशय म्हणजे 'उपसागर होय.
--- जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग म्हणजे 'आखात' होय.
--- दोन जलाशयांना जोडणारा अरुंद जलाशय म्हणजे ' सामुद्रधुनी' होय.
------------------------------------------------------------
(3) वातावरण :-

--- पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणास 'वातावरण' म्हणतात.
---  वातावरण वायू, बाप्प, धूलिकण यांपासून बनले आहे.
--- वातावरणातून सर्व सजीवांना प्राणवायू मिळतो. 
---  पृष्ठालगत वातावरण दाट असते, जास्त उंचीवर हवा विरळ असते.
---  ओझोन वायू सूर्याची अपायकारक किरणे शोषतो. त्यामुळे जीवसृष्टयेचे रक्षण होते.
---------------------------------------------------------------
(४)  जीवावरण :-

---  पृथ्वीच्या तीनही आवरणात आढळणारी जीवसृष्टी म्हणजे ' ' जीवावरण ' .
---  जीवावरणात वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव असतात.
----  सजीवांना प्राणवायू, उष्णता, पाणी व अन्न लागते.
---  भूपृष्ठाजवळ सजीवांची संख्या जास्त आहे. 
---  जमिनीखाली आणि जलाशयात एका ठराविक खोलीपर्यंत जीवावरण आढळते.
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५



Friday 3 December 2021

Pairs of Rhyming Words.



* यमक जुळणा-या शब्दांच्या जोड्या.

Nice  = Rice  ( नाईस - राईस )
Fish  =  Dish  ( फिश  - डिश )
Good = Food  ( गूड - फूड )
Cold = Gold  ( कोल्ड  - गोल्ड )
Boot = Foot  ( बूट  - फूट )
Bear  = Tear ( बीयर - टिअर )
Ball  = Tall  ( बाॅल  - टाॅल )
Nine = Line ( नाईन - लाईन )
Cook = Look   ( कूक - लूक )
Duck = Luck. ( डक  - लक )
Moon  = Noon  ( मून - नून )
Pink  = Link ( पिंक - लिंक )
Heel  =  Peel  ( हिल -  पील )
Seed = Need  ( सिड - नीड )
Door  = Poor ( डोर - पुअर )
Late  = Gate ( लेट - गेट )
Soil  = Boil (साॅईल - बाॅईल )
Rain  = Main ( रेन - मेन )
Fire  = Wire ( फायर - वायर )
Seat  = Heat ( सीट - हीट )
Last  = Fast  ( लास्ट - फास्ट )
Nill  = Bill  ( नील - बील )
Hand  = Band (हॅन्ड - बॅण्ड )
Tent = Sent ( टेन्ट - सेंन्ट )
West  = Test ( वेस्ट - टेस्ट )
Sick  = Kick  ( सिक  - किक )
Room  = Zoom ( रुम  - झुम )
Team  = Beam  ( टीम - बीम )
Page  = Cage  ( पेज  - केज )
Bone = Tone   ( बोन - टोन )
Mind  = Bind  ( माइंड  - बाईड )
Cool  = Pool  ( कूल - पूल )
=====================
SHANKAR  CHAURE
z. p. school - jamnepada 
tal. sakri , dist. - dhule
9422736775

Thursday 2 December 2021

मराठी शब्दसौंदर्य ( शब्द साखळी )



* शब्द वाचा व लिहा.

(१) काळसर  लालसर  ओलसर  गोडसर

(२) शानदार  जमीनदार  दुकानदार  धारदार

(३) वर्षभर  वीतभर  डबाभर दिवसभर

(४) कलाकार  सावकार चित्रकार  पुढाकार

(५) सुखकर  खेळकर  विणकर  दिनकर

(६) जादूगार  कामगार  रोजगार गुन्हेगार

(७) दूधवाला  भाजीवाला पाववाला  मसालेवाला

(८) लहानपण  मोठेपण  बालपण  शहाणपण

(९) शेतकरी  वारकरी  गावकरी पहारेकरी

(१०) करणार  येणार जाणार मिळणार

(११) तेलकट  मातकट  मळकट पोरकट

(१२) गुणवंत शीलवंत  भगवंत धैर्यवंत

(१३) कारखाना  दवाखाना तोफखाना  हत्तीखाना

(१४) औरंगाबाद  हैद्राबाद अहमदाबाद  खुल्दाबाद
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 1 December 2021

पाहुणा शब्द ओळखा.(गटातील वेगळा शब्द ओळखा.)



(१) निळा   काळा  फळा   लाल  
उत्तर --- फळा
-----------------------------
(२) धोतर  पांढरा  साडी  परकर
उत्तर --- पांढरा
------------------------------
(३) साखर  गोड  आंबट   कडू
उत्तर --- साखर
-----------------------------
(४) जिरे  हळद  हिंग  बाजरी
उत्तर --- बाजरी
-------------------------------------
(५) ताट  ग्लास  भाकर   परात
उत्तर --- भाकर
-------------------------------------
(६) खारट  मीठ  कडू   आंबट 
उत्तर --- मीठ
-------------------------------------
(७)साग  कडूनिंब   कमळ  शिसव
उत्तर --- कमळ
-------------------------------------
(८) दूध  पाणी    माती   ताक
उत्तर --- माती
-------------------------------------
(९)  डास  ताप  सर्दी  खोकला 
उत्तर --- डास
-------------------------------------
(१०) सोने  पिवळा  चांदी  तांबे
उत्तर --- पिवळा
-------------------------------------
(११) गाय  म्हैस  लांडगा  शेळी
उत्तर --- लांडगा
-------------------------------------
(१२) साप  सरडा अजगर  ससा
उत्तर --- ससा
-------------------------------------
(१३) कासव  खेकडा  पाल  मगर
उत्तर --- पाल
-------------------------------------
(१४) माशी  टिटवी  झुरळ  डास
उत्तर --- टिटवी
-------------------------------------
(१५) बगळा  मोर  गाढव  बदक
उत्तर --- गाढव
-------------------------------------
(१६) गुलाब  झेंडू  चाफा  गवार
उत्तर --- गवार
-------------------------------------
(१७) आंबा  फणस  टोमॅटो. चिकू
उत्तर --- टोमॅटो
-------------------------------------
(१८) वाघ  सिंह  बैल   हरिण
उत्तर --- बैल
-------------------------------------
(१९) वांगे  मेथी  पालक  कोथिंबीर
उत्तर --- वांगे
-------------------------------------
(२०)  गाजर  रताळे  मुळा  पपई
उत्तर --- पपई
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday 30 November 2021

' प्र ' चे जोडाक्षरी शब्द ( प् + र = प्र )



● शब्द वाचा व लिहा.

प्रत प्रकरण प्रतिमा 
प्रगत प्रकृती प्रतिशब्द 
प्रणव प्रकोप प्रतिष्ठा 
प्रसर प्रख्यात प्रतिज्ञा 
प्रहर प्रगल्भ प्रतीक्षा
प्रखर प्रचंड प्रदर्शन
प्रथम प्रचारक प्रदान 
प्रबळ प्रचीती प्रदीप 
प्रकार प्रगती प्रदेश 
प्रकाश प्रणाम प्रपंच 
प्रताप प्रति प्रफुल्ल 
प्रघात प्रतिकार प्रबंध 
प्रचार प्रतिकूल प्रभा 
प्रत्यय प्रतिक्रिया प्रभाकर 
प्रत्यक्ष प्रतिपक्ष प्रभात 
प्रसन्न प्रतिबंध प्रभाव 
प्रधान प्रभू प्रमोद 
प्रमाण प्रमुख प्रयाग
प्रथा प्रयोग प्रवाह
प्रवास प्रवासी प्रवीण 
प्रशांत प्रवेश प्रशंसक
प्रश्न प्रशंसा प्रारंभ 
प्रसरण प्रसिद्ध प्रस्ताव 
प्रसाद प्रस्तुत प्राणी 
प्रसार प्रज्ञा प्राप्त 
प्रहार प्रांत प्रेम 
प्रसंग प्रार्थना प्रेमळ
प्रजा प्राण प्रमोद 
प्रभावी प्रेरक प्रिया
प्रमुख प्रियंका प्रिती
प्रवचन प्राची प्राचीन 
प्रदूषण प्रक्षेपण प्रमाणपत्र 
प्रजासत्ताक प्राध्यापक प्रशिक्षण 
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड 
ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५

रसविचार ( व्याकरण मराठी भाषाभ्यास )


✓माणसाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. 

✓काही भावना स्थिर व कायमस्वरूपी (शाश्वत) असतात.
 उदा., आनंद, दुःख, राग, भीती इत्यादी.

✓ साहित्यामधील गदय व पदय या प्रकारांत अनेकविध भावनांचे आविष्करण होते. या भावनांना 'रस' म्हणतात. साहित्यातील हे रस अनुभवणे म्हणजे 'रसास्वाद' होय.

मराठी कुमारभारती नवनीत : इयत्ता नववी

✓स्थायिभावाची उत्कट स्थिती म्हणजे रस होय.

एकूण नऊ रस आहेत : (१) करुण (२) शृंगार (३) वीर
(४) हास्य (५) रौद्र (६) भयानक (७) बीभत्स (८) अदभुत
(९) शांत.

■ रस व साहित्यातील भावनांचे वर्णन खालील प्रमाणे अभ्यासूया.
(१) करुण --
शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना यांचे
साहित्यातील वर्णन.

(२) शृंगार --
स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकूळ मन यांचे साहित्यातील वर्णन.

(३) वीररस --
 पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचे साहित्यातील वर्णन.

(४) हास्य --
विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, चेष्टा-मस्करी यांचे
साहित्यातील वर्णन.

(५) रौद्र --
क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप यांचे
साहित्यातील वर्णन.

(६) भयानक --
भयानक वर्णने, भीतिदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या यांचे साहित्यातील वर्णन.

(७) बीभत्स --
 किळस, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावनांचे साहित्यातील
वर्णन.

(८)अद्भुत --
 अद्भुतरम्य विस्मयजनक, आश्चर्यकारक भावनांचे साहित्यातील वर्णन. 

(९) शांत --
भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे साहित्यातील वर्णन.
================================
स़ंकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
          जिल्हा परिषद शाळा - जामनेपाडा 
          केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
         ९४२२७३६७७५

Friday 26 November 2021

मराठी वाक्य वाचा आणि लिहा.



मी खेळतो.
मी खेळलो.
मी खेळणार.
मी खेळत आहे. 
मी खेळत होतो
मी खेळत असेल.
मी खेळलो आहे. 
मी खेळलो होतो.
मी खेळलो असेल.
मी खेळत आलेला आहे. 
मी खेळत आलेला होतो.
मी खेळत आलेला असेल.
मी खेळु शकतो.
मी खेळु शकलो.
मी खेळेन.
मी कदाचित खेळेन.
मी खेळेनच.
मी खेळायला पाहिजे.
मी खेळीन.
मी खेळायला पाहिजे. 
मी खेळु शकलो आहे.
मी खेळु शकलो असतो.
मी खेळलो असेल.
मी कदाचित खेळलो असेल.
मी खेळलो असेलच.
मी खेळायला पाहिजे होत.
मी खेळलो असतो.
मी खेळायला पाहिजे होत. 
मला खेळाव लागत.
मला खेळाव लागल. 
मला खेळाव लागेल.
मी खेळण्याच्या बेतात आहे.
मी खेळण्याच्या मार्गावर आहे. 
मी खेळण्याची शक्यता आहे.
मी खेळण्यास समर्थ आहे.
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 25 November 2021

आपले संविधान ( भारतीय संविधान )



(१) भारतीय संविधान.

---- लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार चालवण्यासाठी संविधानाची गरज होती. त्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या सभेने स्वीकारलेल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली. भारतीय संविधान हे लिखित स्वरूपात असून त्यात भारतीय नागरिकांचे हक्क स्पष्ट केलेले आहेत. तसेच नागरिकांची कर्तव्येही सांगितली आहेत. संविधानात 
दिलेल्या नियमांनुसार आपले प्रतिनिधी राज्यकारभार 
करतात.
-----------------------------------------------------
(२) संविधान सभा.

----- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी लिखित संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद हे या सभेचे अध्यक्ष होते. संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. या मसुदा समितीने संविधानाला अंतिम रूप दिल्यावर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले.
----------------------------------------------------
(३) भारतीय संविधान का निर्माण करण्यात आले?

----- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी संविधान निर्माण करण्यात आले आहे. राज्यकारभार करताना लोकप्रतिनिधी संविधानातील नियमांचा आधार घेतात. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही. संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्येही सांगितली असल्याने नागरिकांनाही संविधानाचा उपयोग होतो.
---------------------------------------------------
(४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 
----- संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी एक मसुदा समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधानाला अंतिम स्वरूप देण्याचे मोलाचे कार्य केले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५