माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 2 October 2021

मराठी ( भाषा ) --- व्याकरण प्रश्नावली



(१) ' ‌पाणि '  या शब्दाचा अर्थ सांगा.
उत्तर --- हात

(२) ' श्वास ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर --- उच्छवास

(३) ' पिपीलिका ' या शब्दाचा अर्थ सांगा .
उत्तर --. मुंगी

(४) ' उदंड ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर ---. कमी

(५) '  दीन ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
उत्तर --. गरीब

(६) ' वृध्द '  या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर ---. तरुण

(७) 'दंडक ' या शब्दाचा अर्थ सांगा.
उत्तर -- नियम

(८) '  सम ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर -- विषम

(९)  ' मूषक ' या शब्दाचा अर्थ सांगा.
उत्तर -- उंदीर

(१०)  ' बेडूक ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
उत्तर --  बेडकी

(११) ' अतिथी ' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- पाहुणा

(१२) 'मुख्य '  या शब्दास समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- प्रमुख

(१३) '  हिरवागार ' या शब्दाची जात ओळखा .
उत्तर --- ‌विशेषण

(१४) ' वानर ' या शब्दाचे  स्त्रीलिंगी ‌रूप सांगा ?
उत्तर ---- ‌वानरी

(१५)  ' मडके '  या शब्दाचे अनेकवचनी‌ शब्द सांगा.
उत्तर --- ‌मडकी
==================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
      ‌ केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
     ‌९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment