माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 25 October 2021

तात्काळ काय उपाय कराल? ( सामान्य विज्ञान ‌)



(१) सर्पदंश.

-----  जखम पाण्याने धुवून लगेच दंशाच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे. सापाचे विष हृदयाकडे अथवा
मेंदूकडे पोचणार नाही.  यासाठी असे कापड बांधणे आवश्यक आहे. दंश झालेल्या व्यक्तीस धीर देऊन शक्य तितक्या लगेच डॉक्टरकडे नेऊन विषावरच्या उताऱ्याचे इंजेक्शन दयावे.
-----------------------------------------------------------------
(२) उष्माघात 

-----  रुग्णास थंड जागी किंवा सावलीत न्यावे. शरीर थंड पाण्याने पुसावे आणि मानेवर व डोक्यावर थंड पाण्याच्या
 घड्या घालाव्यात. पिण्यास भरपूर पाणी किंवा सरबत दयावे. शरीर शुष्क होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. उल्टो किंवा अशक्तपणा आला असेल; तर पोटावर उताणे झोपवून मान एका बाजूस करून ठेवावी. 
-----------------------------------------------------------------
(३) कुत्रा चावला.

-----  कुत्र्याने केलेली जखम स्वच्छ व निर्जंतुक पाण्याने धुवावी. पोटॅशियम परमँग्नेटच्या पाण्यानेही धुवून घ्यावी. जखमेवर कोरडे कापड ठेवावे. ड्रेसिंगसाठी डॉक्टरकडे न्यावे. अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यास सांगावे.
-----------------------------------------------------------------
(४) खरचटले / रक्तस्राव

----- रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करावा. जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा स्थितीत बसवावे. जखम स्वच्छ धुवावी. जखम झालेला भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंचावर ठेवावा. जंतुनाशक मलम लावावे. जखम खोल असल्यास डॉक्टरकडे नेऊन टाके घालावेत.
-----------------------------------------------------------------
(५) भाजले / पोळले

-----  सर्वप्रथम किती प्रमाणात भाजले आहे, ते पाहावे. किरकोळ भाजले असल्यास भाजलेला भाग थंड पाण्यात बुडवून ठेवावा. व्यक्तीला पिण्यास पाणी दयावे. निर्जंतुक पाण्याने जखम साफ करावी किंवा जंतुनाशक मलम लावावे. जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवावी. गंभीररीत्या भाजले असल्यास मानसिक आधार दयावा आणि शक्यतो लगेच डॉक्टरी इलाज करावा.
==================================
संकलक :-  शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
        केंद्र - रोहोड,  ता. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment