माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 23 October 2021

म्हणीच्या अर्थावरून म्हण ओळखणे. (भाषिक उपक्रम )



पुढील चौकींत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा

(१) न आवडणाऱ्या माणसाने कितीही
     चांगली गोष्ट केली, तरी ती वाईट दिसते.
     त्या व्यक्तीचे काम आवडत नाही.

उत्तर : नावडतीचे मीठ आळणी.
-------------------------------------------------------

(२) एखादी गोष्ट तात्काळ व्हावी याकरिता
      काही लोक उतावळेपणाने जे उपाय 
      करतात त्यांना हे म्हटले जाते.

उत्तर : उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
--------------------------------------------------------

(३) एखादया माणसाला काम करता येत
      नसले, की तो कारणे देत असतो.

उत्तर : नाचता येईना अंगण वाकडे.
--------------------------------------------------------

(४) जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही 
      पुराव्याची गरज भासत नसते.

उत्तर : हातच्या कांकणाला आरसा कशाला?
===============================
संकलक  :- शंकर सिताराम चौरे  ( प्रा. शिक्षक )
              जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
              केंद्र - रोहोड, ता. साक्री , जि. धुळे
              ता. साक्री, जि. धुळे

No comments:

Post a Comment