माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 30 October 2021

‌आपली राष्ट्रीय प्रतीके(राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा)



(१) राष्ट्रध्वज

----  आपला राष्ट्रध्वज हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. आपल्या राष्ट्रध्वजावर निश्चित संदेश देणारे तीन रंग आहेत. सर्वांत वरच्या बाजूस असणारा केशरी रंग त्याग व शौर्याचा संदेश देतो. मध्यभागी असलेला पांढरा रंग शांतीचा संदेश देतो; तर खालच्या बाजूस असलेला हिरवा रंग समृद्धीचा संदेश देतो. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यावर असलेले निळ्या रंगाचे अशोक चक्र आपणांस देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश देते.. 
--------------------------------------------------------------
(२) राष्ट्रगीत

---- ‌ 'जनगणमन' हे आपले राष्ट्रगीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत लिहिले आहे. या गीतात त्यांनी भारतातील विविध प्रदेश, नदया व पर्वत यांचे वर्णन केले आहे. राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. म्हणून राष्ट्रगीत सुरू असताना आपण सावधान स्थितीत उभे राहावे. राष्ट्रगीताचा आदर करणे, हे आपले कर्तव्य आहे.
----------------------------------------------------------------
 (३) राजमुद्रा

---- ‌ चार सिंहाकृती असलेली आपली राजमुद्रा हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे. राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली 'सत्यमेव जयते' हे वचन आहे. सर्व नोटा, नाणी, शासकीय पत्रे इत्यादींवर ही राजमुद्रा असते.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment