माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 5 March 2022

एव्हरेस्टवीर -- चंद्रकला गावीत


 नाव- कु. चंद्रकला उत्तम गावीत
गाव - मोहपाडा पो. शेंदवड ता. साक्री जि.धुळे

चंद्रकला गावीत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील

आदिवासी दुर्गम भागातील मोहपाडा (मोहगाव)  गावची

ही तरुणी चंद्रकला उत्तम गावीत एवदशी मुलगी कुणाला खर वाटणार नाही की ही मुलगी एव्हरेस्ट सर करून आली. मात्र तिच्याशी बोलतानाच जाणवते. तिच्यातली आग आणि झुंजायची धमक. एक भाऊ एक बहीण आई- वडिल, काका- काकू, आजी-आजोबा आणि ती असं तिच कुटूंब. झोपडी वजा साधं कौलारू घर. परिस्थिती बेताचीच. थोड्या फार शेतीवर कुटूंबाची गुजराण कशीबशी होते. कारण पाण्याची समस्या मोठी आहे. पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावरच शेती होते. पावसाने धोका दिलाच तर मात्र मोलमजुरी शिवाय दुसरा पर्याय नसतो. तिची आई कमलबाई आणि वडिल उत्तम गावीत बाहेरगावी शेतमजुरीसाठी जातात, मात्र मुलींनी खूप शिकावं असे त्या दोघांना खूप वाटतं. वडिलांनी चंद्रकेलाला इंदवे - 
 आश्रम शाळेत शिक्षणासाठी पाठवलं. ती बारावी पास होऊन
सद्या कर्म आ. मा. पाटील महाविद्यालय पिंपळनेर ता. साक्री,
जि. धुळे  एस. वाय. बी. ए. शिक्षण घेते.लहानपणापासूनच ही मुलगी हुशार आहे. ती रनिंगमध्ये तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर असे तिने राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले. याच वाटेवर तिनं एक महत्त्वकांशी स्वप्न पाहिलं एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्याचे स्वप्न. या मोहिमेसाठी आपली निवड व्हावी म्हणून तिनं कसोशीने प्रयत्न केले. यासाठी - क्रीडा शिक्षक - मंगेश
 ठाकरे सर यांनी तिच्या स्वप्नावर विश्वास ठेवला आणि त्यांनी मदत केली व मार्गदर्शन केलं. मिशन शौर्यासाठी निवड तर झालीख मात्र त्यानंतर वर्धा, हैदराबाद, दार्जिलिंग, सिक्किम, लडाख या ठिकाणी खडतर प्रशिक्षण या मुलीला देण्यात आले.
चंद्रकला सांगते, त्या प्रशिक्षणातूनच खूप काही शिकायला मिळाले. आम्हां आदिवासी मुला- मुलींमध्ये उत्साह होताच, मात्र उत्तम आत्मविश्वास निर्माण झाला. आम्हाला वाटले की, हे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू ! आणि आम्ही केलंच !
एव्हरेस्ट सर करण्यासाठी तिला भरपूर अडचणी आल्या परंतु त्या अडचणींवर मात केली. ते शिखर गाठण्यासाठी सात ते आठ टप्यांमध्ये चढायचे होते. शिखर सर करण्यासाठी तिला शर्पा (गाईड) यांच्या मार्गदर्शनाने चढाईला सहा दिवस व उतरायला दोन दिवस लागले. ते शिखर सर्व बर्फाळ भागाने व्यापलेला असल्या कारणाने काही उंची पर्यंत ऑक्सिजन मिळते व पुढे ऑक्सिजन मिळत नसल्याने स्वतः पाठीवर चार ते पाच किलो वजनाचे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन व बर्फापासून संरक्षणासाठी बर्फाक भागात -लागणारे कपडे व बूट इत्यादी ओझं घेऊन एव्हरेस्ट शिखर आठ दिवसांत तिनं सर केलं.
   सलाम तिच्या कर्तृत्ववला.

शब्दांकन :- श्री. महारू सिताराम चौरे (मा. शिक्षक )
 मो. नं. 9421527722 (पिंपळनेर )
श्री. शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक - पिंपळनेर) 
मो. नं. 9422736775


No comments:

Post a Comment