माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 16 May 2024

तर्कसंगती अनुमान प्रश्नावली (स्पर्धा परीक्षा )


(१) पुस्तक वहीपेक्षा लांब आहे, पेनची लांबी वहीपेक्षा कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय ?

उत्तर --- पुस्तक
--------------
(२) लोकर कापसापेक्षा महाग आहे, तर रेशीमइतका नाही, तर सर्वात महाग काय ?

उत्तर --- रेशीम 
------------------------------
(३) २०० पानांच्या पुस्तकाचा २५ % भाग वाचून संपवला, तर त्या पुस्तकाची किती पाने वाचावयाची शिल्लक राहतील ?

उत्तर ---  १५०
------------------------------
(४) ८ पुस्तकांची एकूण किंमत १६०० रूपये आहे, तर ४ पुस्तकांची किंमत किती रूपये असेल ?

उत्तर --- ८०० 
------------------------------
(५)  १ पेन १० रूपयांस खरेदी करून १२ रूपयांत विकला, तर किती टक्के नफा झाला ?

उत्तर --- २० टक्के
------------------------------
(६) एका चादरीची किंमत १५० रूपये याप्रमाणे ३००० रूपयांमध्ये किती चादरी येतील ?

उत्तर --- २०
------------------------------
(७) ३ कागदं टाइप करण्यास ४० मिनिटे लागली, तर १२ कागदं टाइप करण्यास किती वेळ लागेल ?

उत्तर ---  २ तास ४० मिनिटे
------------------------------
(८) एक कपाट २००० रूपयांना विकल्याने दुकानदाराला ४०० रूपये नफा झाला तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती ?

उत्तर --- १६०० रूपये 
------------------------------
(९)  एका तासात ३६०० सेकंद असतात, तर २ तासांत किती सेकंद असतील  ?

उत्तर --- ७२००
------------------------------
(१०) मुंबईहून एक विमान ताशी ६७० किमी वेगाने दुबईला ४ तासांत पोहचले, तर मुंबई ते दुबई हे अ़ंतर किती ?

उत्तर --- २६८०
(= ६७०× ४ = २६८० )
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे

No comments:

Post a Comment