माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 2 May 2024

गणितीय माहिती ( गणितीय सामान्यज्ञान )


(1) ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो ( बाकी शून्य उरते ) त्यांना समसंख्या म्हणतात. कोणत्याही समसंख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक अंक असतो.
------------------------
(2) ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही (बाकी एक उरते) त्यांना विषमसंख्या म्हणतात. कोणत्याही विषमसंख्येच्या  एककस्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एक अंक असतो.
----------------------------------
(3) ज्या संख्येला 1 किंवा प्रत्यक्ष त्या संख्येनेच भाग जातो. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. उदा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 इत्यादी मूळ संख्या होत.
-------------------------------------
(4) कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्यास येणारी संख्या ही समसंख्याच असते.
उदा. 10 + 14 = 24    / ‌  18 -- 12 = 6
---------------------------------------
(5) कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्यास येणारी संख्या ही समसंख्याच असते.
 उदा.  9 + 7 = 16   /      23 -- 19 = 4
--------------------------------------
(6) एक ही मूळ संख्या नाही. दोन ही एकमेव मूळसंख्या सम आहे. इतर सर्व मूळसंख्या विषम आहेत.
--------------------------------------
(7) कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणाऱ्या संख्येला त्या संख्येचा वर्ग म्हणतात.
    उदा. 3 × 3 = 9 यामध्ये 9 ही संख्या 3 या संख्येचा वर्ग आहे, असे म्हणतात तर 3 ही संख्या नऊचा वर्गमूळ आहे, असे म्हणतात.
-----------------------------------------
(8) कोणत्याही संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणल्यास त्या संख्येचा घन येतो.
 उदा. 3 × 3 × 3 = 27 यामध्ये 27 ही 3 या संख्येचा घन आहे तर 3 ही संख्या 27 या संख्येचा घनमूळ आहे.
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा 
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775  / 7721941496

No comments:

Post a Comment