घराभोवती बाग असेल, तर त्या झाडांचा
पालापाचोळा जमिनीवर गळणारच.
वाळक्या फांद्या कधी वा-या वादळानं तुटून
खाली पडणारच. बरेचसे बागवान हा सगळा
'कचरा कुंपणाबाहेर फेकून देतात. मुळात
ह्याची काही आवश्यकता नाही. पालापाचोळा
हा कचरा नाहीच. ते झाडांचं अन्न आहे !
झाडांना ते परत द्या. स्वच्छतेची फारच हौस
असेल, तर झाडून गोळा केलेला पालापाचोळा
एका कुजखड्डयात साठवा. पावसाळ्यात
त्याचं छान खत होईल. किंवा झाडांच्या
बुंध्यापाशी पाचळण(मलचिंग)करा. तिथेच
त्याचं छान खत होईल. जमीन झाकलेली
राहिल्याने पाण्याची वाफ कमी होईल- ते
वाचेल. ह्यातून सार्वजनिक स्वच्छता -
व्यवस्थेवरचा भार कमी होईल. हाही आणखी
एक लाभ.
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
पं.स.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
Tuesday, 22 May 2018
पर्यावरण उपक्रम:-" पालापाचोळा कचरा नव्हे "
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment