माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 1 May 2018

माझा महाराष्ट्र



  माझा महाराष्ट्र नावाप्रमाणेच महान आहे.
म्हणून मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान
वाटतो.
  १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व मराठी
ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे.
  महाराष्ट्र हा बहुतांश डोंगराळ प्रदेश ; पण
मराठी माणसाने कष्ट करून त्याला सुपीक
बनवले. ऊस पिकवून साखर कारखाने उभारले.
फळाफुलांच्या बागा फुलवल्या. महाराष्ट्रातल्या
हापूस आंब्याने आज सारे जग जिंकले.
  माझ्या महाराष्ट्राला देदीप्यमान इतिहास आहे.
श्रीशिवरायांनी पहिले जनतेचे राज्य उभारले.
त्या काळाची आठवण देणारे अनेक गड, दुर्ग
महाराष्ट्रात आहेत. शिल्पकारांच्या बोटातील
जादू दाखवणारी अजिंठा - वेरूळची लेणी
महाराष्ट्रात आहेत.  गोदावरी, भीमा, चंद्रभागा
या नद्यांकाठची तीर्थक्षेत्रे आणि अनेक मंदिरे
यांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. मुंबई ही भारताची
आर्थिक व औद्योगिक राजधानी आहे. शिक्षण
व साहित्य या क्षेत्रांत महाराष्ट्र सदैव अग्रभागी
आहे. महाराष्ट्रात अनेक नररत्ने जन्माला आली.
सचिन तेंडुलकर सारखे भारतरत्न महाराष्ट्राची
छान आहे. महाराष्ट्राचा मराठी बाणा जगात
विख्यात आहे.

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि. प. प्रा.शाळा बांडीकुहेर
              ता. साक्री जि. धुळे
               📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment