--- तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलभूत मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात.
----------------------------
(२) अक्षर :-
--- आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. बोलणे नष्ट होते; परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते; म्हणून या सांकेतिक खुणांना 'अक्षर' (नष्ट न होणारे) असे म्हणतात.
----------------------------
(३) शब्द :-
--- ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तरच त्यास शब्द असे म्हणतात. उदा. पतंग
----------------------------
(४) वाक्य :-
--- 'पूर्ण अर्थाचे बोलणे' किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात.
----------------------------
(५) व्याकरण :-
--- आधी भाषा बनते व मग तिचे व्याकरण ठरते. भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात आले आहेत.
यावरून-
'भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण' असे म्हणतात.
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment