माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 31 October 2023

प्रश्न मराठीत, उत्तर इंग्रजीत सांगा.

(१) समुद्राच्या पाण्याची चव कशी असते ?
उत्तर -- Salty ( साॅल्टी )
------------
(२) ' सरडा ' या प्राण्याला किती पाय असतात ?
उत्तर -- Four ( फोर )
------------
(३) आवळा या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- One ( वन )
-----------------------------------
(४) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- Six ( सिक्स )
-----------------------------------
(५) मुंंगी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- Six ( सिक्स )
-----------------------------------
(६) आकाशाचा रंग कोणता आहे ?
उत्तर --  Blue ( ब्लू )
-----------------------------------
(७) जांभूळ या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- One ( वन )
-----------------------------------
(८) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
उत्तर -- Seven ( सेव्हन )
-----------------------------------
(९) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- Rose ( रोझ )
-----------------------------------
(१०) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- Nest  ( नेस्ट )
-----------------------------------
(११) आंबा या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- One ( वन )
-----------------------------------
(१२) ' खुराडा ' कोणाच्या घरास म्हणतात ?
उत्तर -- Hen ( हेन )
-----------------------------------
(१३) कावकाव असा कोणता पक्षी ओरडतो ?
उत्तर -- Crow ( क्रो )
-----------------------------------
(१४) रक्ताचे रंग कसे असते ?
उत्तर -- Res ( रेड )
-----------------------------------
(१५) मानवी रक्ताची चव कशी असते ?
उत्तर --  Salty ( साॅल्टी )
-----------------------------------
(१६) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?
उत्तर --  Green ( ग्रीन )
-----------------------------------
(१७) मिठाची चव कशी असते ?
उत्तर -- Salty ( साॅल्टी )
-----------------------------------
(१८) साखरेची चव कशी असते ?
उत्तर -- Sweet ( स्वीट)
-----------------------------------
(१९) कावळा कोणत्या रंगाचा असतो ?
उत्तर -- Black ( ब्लॅक )
-----------------------------------
(२०) झुरळाला किती पाय असतात ?
उत्तर -- Six ( सिक्स)
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775  / 7721941496

Sunday, 29 October 2023

शाब्दिक उदाहरणे ( बेरीज / वजाबाकी )

(१) एका वर्गात ३० मुलगे व २० मुली आहेत, तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती ?
-------------------
(२) जून महिन्यात २० दिवस आणि जुलै महिन्यात १५ दिवस दूध घेतले, तर एकूण किती दिवस दूध घेतले ?
-------------------
(३) एका दुकानातून १०० रुपयांची चादर व ४० रुपयांचा टॉवेल खरेदी केला, तर दोन्हींची मिळून किंमत किती ?
-----------------------------------
(४) एका गोठ्यात १५ गायी व २५ म्हशी आहेत, तर त्या गोठ्यात किती गुरे आहेत ?
-----------------------------------
(५) एका रोपवाटिकेत चिकूची ५० व डाळिंबाची ३० रोपे आहेत, तर एकूण रोपे किती ?
-----------------------------------
(६) एका पुस्तकातील ८० पानांपैकी ६० पाने वाचून झाली, तर किती पाने वाचायची राहिली ?
-----------------------------------
(७) एका दुकानात ७० कपाट होते. त्यांपैकी १० कपाट विकले, तर दुकानात किती कपाट उरले ?
-----------------------------------
(८) एका कळपात शेळ्यांची व मेंढ्यांची एकूण संख्या १०० आहे. त्यांपैकी ३० मेंढ्या आहेत, तर शेळ्यांची संख्या किती ?
-----------------------------------
(९) वर्गातील ५० मुलांपैकी ४० मुले चित्रकला स्पर्धेस बसली, तर किती मुले चित्रकला स्पर्धेस बसली नाहीत ?
-----------------------------------
(१०) कविताला गणितात ७० गुण मिळाले व भाषेत ६० गुण मिळाले, तर कोणत्या विषयात किती गुण जास्त मिळाले ?
-----------------------------------
(११) सुमितच्या  गोठ्यात ३२ गायी आहेत. त्यांपैकी ३० गायी चरायला गेल्या. गोठ्यात किती गायी राहिल्या ?
-----------------------------------
(१२) यात्रेला जाणाऱ्या ८० यात्रेकरूंपैकी ५० स्त्रिया आहेत व इतर पुरुष आहेत, तर पुरुषांची संख्या किती ?
-----------------------------------
(१३) बसमध्ये सुरुवातीला ३५ प्रवासी होते. पुढच्या स्थानकावर १५ प्रवासी बसमध्ये चढले, तर आता बसमध्ये किती प्रवासी आहेत ?
-----------------------------------
(१४) राजूने ४० रुपयांची साखर व २० रुपयांचे शेंगदाणे विकत आणले, तर त्याने किती रुपये खर्च केले ?
-----------------------------------
(१५) शेवंताजवळ १०० रुपये आहेत. तिने ९० रुपयांच्या वह्या विकत घेतल्या, तर तिच्याजवळ किती रुपये राहिले ?
-----------------------------------
(१६) शंकरच्या बागेत ४१ झाडे आंब्याची व ५१ झाडे काजूची आहेत, तर एकूण झाडे किती ?
-----------------------------------
(१७) एका गोदामात ७० पोती धान्य आहे. त्यांपैकी ४० पोती गव्हाची आहेत, तर इतर धान्य असलेली पोती किती ?
-----------------------------------
(१८) एका सत्र परीक्षेत संगिताला गणितात ५० गुण व भाषेत ४० गुण मिळाले, तर संगीताला दोन्ही विषयांत मिळून एकूण किती गुण मिळाले ?
-----------------------------------
(१९) अतुलजवळ गुलाबाची १२ व शेवंतीची ८ फुले आहेत, तर त्याच्याजवळ एकूण फुले किती ?
-----------------------------------
(२०) एका वर्गात ५० विद्यार्थी आहेत. त्यांपैकी ३० मुलगे व बाकीच्या मुली आहेत. तर मुलींची संख्या किती आहे ?
-----------------------------------
(२१) ९१  आंब्यांपैकी ५० आंबे पहिल्या पेटीत भरले व उरलेले दुसऱ्या पेटीत भरले तर दुसऱ्या पेटीत किती आंबे भरले ?
-----------------------------------
(२२) धोंडीबाच्या गोठ्यात ४२ गायी आहेत. त्यांपैकी ४० गायी रानात चरायला गेल्या. आता गोठ्यात किती गायी राहिल्या ?
-----------------------------------
(२३) डब्यात ६५ खडू आहेत. त्यांपैकी ३० खडू रंगीत व बाकीचे पांढरे आहेत. तर पांढरे खडू किती ?
-----------------------------------
(२४) बसमध्ये ५० प्रवासी होते. त्यांत २५ स्त्रिया व बाकीचे पुरुष होते. तर बसमध्ये पुरुष किती ?
-----------------------------------
(२५) मामांनी खाऊसाठी सुरेशला ४० रुपये व गौरीला ५० रुपये दिले. तर दोघांना मिळून किती रुपये दिले ?
-----------------------------------
(२६) एका गुलाबाच्या झाडाला १० फुले. दुसऱ्याला १२ फुले. तर दोन झाडांची मिळून फुले किती ?
-----------------------------------
(२७) बाळूजवळ १० गोटया आहेत, रोहितजवळ २० गोट्या आहेत व महेशजवळ ५ गोटया आहेत. तिघांच्या गोट्या एकत्र केल्यास त्या किती होतील ?
-----------------------------------
(२८) शाळेच्या कार्यक्रमात मुलांनी १० झाडे आणि मुलींनी १५ झाडे लावली. सर्वांनी मिळून किती झाडे लावली ?
-----------------------------------
(२९) वर्गातील ४८ विदयार्थ्यांपैकी ७ विदयार्थी सहलीस जाऊ शकले नाहीत. तर किती विदयार्थी सहलीस गेले ?
-----------------------------------
(३०) दादांनी बाजारातून २० चिकू आणली. त्यांपैकी ८ चिकू मुलांना दिली. तर किती चिकू शिल्लक राहिली ?
-----------------------------------
(३१) एका गोठ्यात ४५ गाई आणि २० म्हशी आहेत. तर म्हशींपेक्षा गाई कितीने जास्त आहेत ?
-----------------------------------
(३२) बसमध्ये ४८ प्रवासी बसून आणि ६ प्रवासी उभे राहून प्रवास करत होते. तर बसमधील एकूण प्रवासी किती ?
-----------------------------------
(३३) बाजारातून आणलेल्या आंब्यांपैकी ३५ आंबे पिकलेले आणि १५ आंबे न पिकलेले होते. तर बाजारातून किती आंबे आणले होते ?
-----------------------------------
(३४) रोहितने वाढदिवसाला ८० चॉकलेट आणली होती. त्यांपैकी मित्रांना ७५ चॉकलेट वाटली. तर आता किती चॉकलेट शिल्लक राहिली ?
-----------------------------------
(३५) दुसरीच्या वर्गात ५२ विदयार्थी होते. त्यांपैकी २२ मुली व बाकीचे मुलगे होते. तर त्या वर्गात मुलगे किती ?
-----------------------------------
(३६) सुनीलने ३०० रूपयांचे दप्तर व १०० रूपयांची पुस्तके खरेदी केली, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले ?
-----------------------------------
(३७)अजितने पेरूची १२ झाडे व पपईची २२ झाडे लावली, तर त्याने एकूण किती झाडे लावली ?
-----------------------------------
(३८)सुरेखाने कागदाच्या १५ होड्या बनवल्या. अमितने कागदाच्या २१ होड्या बनवल्या. एकूण होड्या किती ?
-----------------------------------
(३९) अकबरने पक्ष्यांना दाणे टाकले. आधी १५ चिमण्या आल्या. दाणे खाऊन गेल्या. नंतर २० कबुतरे दाणे खाऊन गेली, तर एकूण किती पक्ष्यांनी दाणे खाल्ले ?
-----------------------------------
(४०) सागरने गोष्टींची १२ पुस्तके वाचली. शबनमने गोष्टींची २४ पुस्तके वाचली, तर दोघांनी मिळून किती पुस्तके वाचली ?
-----------------------------------
(४१) उकडलेल्या २५ बटाट्यांपैकी १५ बटाटे विजयने सोलले, तर किती बटाटे सोलायचे राहिले ?
-----------------------------------
(४२) राहुलकडे २५ चॉकलेट होती. त्यांपैकी त्याने ११ चॉकलेट मित्रांना वाटली, तर त्याच्याजवळ किती उरली ?
-----------------------------------
(४३) सलीमच्या दुकानात ३७ सायकली होत्या. त्यांपैकी २७ विकल्या गेल्या. किती सायकली उरल्या ?
-----------------------------------
(४४)मारियाने रोपवाटिकेतून ४८ रोपे आणली. त्यांपैकी २४ रोपे बागेत लावली. किती रोपे लावायची राहिली ?
-----------------------------------
(४५) मिहिरकडे २६ खडू होते. रमाने त्याला आणखी काही खडू दिले. मग त्याच्याकडे ३६ खडू झाले, तर रमाने त्याला किती खडू दिले ?
-----------------------------------
(४६)छायाने ४८ मणी आणले होते. माळ करून झाल्यावर त्यांपैकी ६ मणी उरले. किती मणी माळेत ओवले गेले ?
-----------------------------------
(४७)बाबांनी सागाची ७५ रोपे लावली. काकांनी सागाची २५ रोपे लावली, तर दोघांनी मिळून किती रोपे लावली ?
-----------------------------------
(४८) लक्ष्मणच्या शेतात ५७ पोती शेंगा निघाल्या व शारदाबाईंच्या शेतात २३ पोती शेंगा निघाल्या, तर एकूण किती पोती शेंगा निघाल्या ?
-----------------------------------
(४९) सलमाने १२ माळा तयार केल्या. रेशमाने ३२ माळा तयार केल्या. रेशमाने सलमापेक्षा किती जास्त माळा तयार केल्या ?
-----------------------------------
(५०) सागरने ४८ लाडू बनवले. अमितने १७ लाडू बनवले, तर सागरने अमितपेक्षा किती लाडू जास्त बनवले ?
-----------------------------------
(५१) मंगलच्या आईने ४५ रुपयांची कंपासपेटी व ३० रुपयांचे इतर साहित्य खरेदी केले, तर त्यांनी एकूण किती रुपयांची खरेदी केली ? 
-----------------------------------
(५२) वर्गात एकूण मुले ३२ आहेत. त्यांत १६ मुली आहेत, तर मुलगे किती ?
-----------------------------------
(५३)अनुराधाने ५१ दोरीच्या उड्या मारल्या. समीरने २१ दोरीच्या उड्या मारल्या, तर अनुराधाने किती दोरीच्या उड्या जास्त मारल्या ?
-----------------------------------
(५४) सुजाताने ४५ कोंबड्या आणि १५ बदके पाळली आहेत, तर बदकांपेक्षा कोंबड्या किती जास्त आहेत ?
-----------------------------------
(५५) एका शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात ३५ विद्यार्थी आणि इयत्ता तिसरीच्या वर्गात २५ विद्यार्थी आहेत; तर दोन्ही वर्गात मिळून किती विद्यार्थी आहेत ?
-----------------------------------
(५६)दादाकडे १५ रुपये होते, मावशीने त्याला अजून २० रुपये दिले, आता दादाकडे किती रुपये झाले ?
-----------------------------------
(५७) कपाटात २४ पुस्तके होती, त्यात अजून १२ पुस्तके ठेवली, तर कपाटात एकूण किती पुस्तके झाली ?
-----------------------------------
(५८) घरात १८ डबे होते, आईने बाजारातून आणखी ११ डबे आणले, आता घरात एकूण किती डबे झाले ?
-----------------------------------
(५९) साजीदकडे २४ अंडी आहेत व शबानाकडे ३२ अंडी आहेत, तर दोघांकडे मिळून एकूण अंडी किती ?
-----------------------------------
(६०)मारियाकडे ३० नाणी गोळा झाली, आणि मिहीरकडे २४ नाणी आहेत. दोघांकडे मिळून एकूण नाणी किती ?
-----------------------------------
(६१)आनंदने गोष्टीची २८ पुस्तके वाचली. सागरने १४ पुस्तके वाचली. आनंदने सागरपेक्षा किती पुस्तके जास्त वाचली ?
-----------------------------------
(६२) सुधीरकडे ४६ गोट्या होत्या. त्यांपैकी १२ गोट्या हरवल्या, तर आता त्याच्याकडे किती गोट्या असतील ?
-----------------------------------
(६२)परडीत ५८ फुले सदाफुलीची तर ३२ फुले जास्वंदाची आहेत. सदाफुलीपेक्षा जास्वंदाची फुले किती कमी आहेत ?
-----------------------------------
(६३) टोपलीत १६ केळी होती. मनप्रीतने आणखी काही केळी टोपलीत ठेवल्यानंतर टोपलीत ३२ केळी झाली, तर मनप्रीतने किती केळी टोपलीत ठेवली असतील ?
-----------------------------------
(६४)वैशालीने ५४ मणी आणले होते. माळ करून झाल्यावर तिच्याकडे १० मणी उरले. तर माळेत किती मणी ओवले ?
-----------------------------------
(६५)वेदश्रीने पुस्तकाची ९ पाने वाचली. आणखी किती पाने वाचली म्हणजे १५ पाने वाचून होतील ?
-----------------------------------
(६६) हसनने ३० बिया जमा केल्या. त्यातल्या काही बिया चिकूच्या आहेत. उरलेल्या २२ बिया सीताफळाच्या आहेत. तर चिकूच्या किती बिया आहेत ?
-----------------------------------
(६७) मनज्योतने बदामाची १४ झाडे आणि पेरूची २१ झाडे लावली, तर तिने एकूण किती झाडे लावली ?
-----------------------------------
(६८) रवीकडे १५ फुगे आहेत. नीताकडे २१ फुगे आहेत. दोघांकडे मिळून किती फुगे आहेत?
-----------------------------------
(६९) क्षितिजकडे १२ कप होते. त्याने आचलला ५ कप दिले. आता क्षितिजकडे किती कप उरले ?
-----------------------------------
(७०) रमाजवळ १८ चिंचोके आणि यशजवळ ७ चिंचोके तर दोघांजवळ मिळून किती चिंचोके ?
-----------------------------------
(७१) आनंदजवळ २६ स्टिकर्स आहेत, त्याने आणखी ५ स्टिकर्स विकत घेतले. आता त्याच्या जवळ किती स्टिकर्स झाले ?
-----------------------------------
(७२)एका माळावर २४ गाई आणि ३४ म्हशी चरत होत्या, तर माळावर एकूण किती गुरे चरत होती ?
-----------------------------------
(७३)सलमाने काल ३४ रुमाल शिवले. आज तिने आणखी ३२ रुमाल शिवले, तर सलमाने दोन दिवसांत मिळून किती रुमाल शिवले?
-----------------------------------
(७४)वसिमकडे २५ गोट्या होत्या. आज खेळात त्याने १३ गोट्या जिंकल्या, तर आता वसिमकडे किती गोट्या आहेत ?
-----------------------------------
(७५) दुकानदाराकडे काल ३५ पतंग होते. आज त्याने अजून १५ पतंग आणले, तर आता दुकानदाराकडे एकूण किती पतंग झाले?
-----------------------------------
(७६)गौरीकडे १५ रुपये होते. आईने तिला अजून २६ रुपये दिले, तर आता तिच्याकडे किती रुपये झाले ?
-----------------------------------
(७७) मायाने दुकानातून २ रुपयांचे खोडरबर, ५ रुपयांची पेन्सिल व १५ रुपयांचे रंगीत खडू घेतले, तर तिने दुकानदाराला किती रुपये दयावे ? 
-----------------------------------
(७८)टेकडीवर ५० गुलमोहराची, ५० कडूलिंबाची व  सागाची
१००  झाडे लावली, तर एकूण झाडे लावली ?
-----------------------------------
(७९) शाळेत ३०० मुली व २०० मुलगे आहेत, तर मुलग्यांपेक्षा मुली किती जास्त आहेत ?
-----------------------------------
(८०) मेरीकडे ५०० रुपये होते. तिने त्यांपैकी २०० रुपयांची पुस्तके घेतली, तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले ?
-----------------------------------
(८१) गंगारामला फुलांची ११ झाडे लावायची होती. त्यांतली ४ झाडे लावून झाली. किती लावायची राहिली ?
-----------------------------------
(८२) टोपलीतून १३ आंबे काढल्यावर टोपलीत ७ आंबे उरले. तर आधी टोपलीत किती आंबे होते ?
-----------------------------------
(८३) शिवाजवळ गोष्टींची १३ पुस्तके होती. त्यांपैकी ५ पुस्तके त्याने वाचली. तर किती पुस्तके वाचायची राहिली ?
-----------------------------------
(८४) शोभाकडे ५ फुगे होते. तिला मावशीने आणखी २ फुगे दिले. तर तिच्याजवळ एकूण किती फुगे झाले ?
-----------------------------------
(८५) शीलाजवळ १२ बांगड्या होत्या. आईने तिला नवीन १२ बांगड्या दिल्या. तर एकूण किती बांगड्या झाल्या ?
-----------------------------------
(८६) दुकानातून २५ रुपयांचा गूळ, २० रुपयांची साखर खरेदी केली. तर दुकानदारास एकूण किती रुपये दयावेत ?
-----------------------------------
(८७) एका वर्गात ४८ मुले आहेत. त्यांपैकी २८ मुलगे व बाकीच्या मुली आहेत. तर मुलींची संख्या किती आहे ?
-----------------------------------
(८८) १०० सफरचंदापैकी ६० सफरचंद पहिल्या पेटीत भरले व उरलेले दुसऱ्या पेटीत भरले. तर दुसऱ्या पेटीत किती सफरचंद भरले ?
-----------------------------------
(८९) सितारामच्या गोठ्यात ७५ गायी आहेत. त्यांपैकी ६५  गाई रानात चरायला गेल्या. आता गोठ्यात किती गाई राहिल्या ?
-----------------------------------
(९०) डब्यात ८० लाडू होते. त्यांपैकी ४५ लाडू संपले तर डब्यात किती लाडू शिल्लक राहिले ?
-----------------------------------
(९१) एका पेटीत ३० आंबे व दुसऱ्या पेटीत ४० आंबे आहेत. तर एकूण किती आंबे आहेत ?
-----------------------------------
(९२) एका चादरीची किंमत १५० रुपये. दुसऱ्या चादरीची किंमत २०० रुपये. तर दोन्हींची एकूण किंमत किती रुपये ?
-----------------------------------
(९३)दोन बसमधून ९०  मुले सहलीला निघाली. एका बसमध्ये ४५ मुले बसली. तर दुसऱ्या बसमध्ये किती मुले बसली ?
-----------------------------------
(९४) मनिषाने ४० मण्यांपैकी ३० मणी सोनूला दिले, तर मनिषाजवळ किती मणी उरले ?
-----------------------------------
(९५) संकेतने ७० रुपयांपैकी १५ रुपये सुरेशला दिले, तर संकेजवळ किती रुपये राहिले ?
-----------------------------------
(९६) डॉलीजवळ गोष्टीची २४ पुस्तके होती. तिने राघवला १२ पुस्तके वाचायला दिली, तर तिच्याजवळ किती पुस्तके शिल्लक राहिली ?
-----------------------------------
(९७) प्रतिकजवळ १७ वह्या होत्या. त्यांपैकी १४ वह्या त्याने सोनीला दिल्या, तर त्याच्याजवळ किती वह्या उरल्या ?
-----------------------------------
(९८) एका पुस्तकाला १०० पाने आहेत तर अशा ५  पुस्तकांत एकूण किती पाने असतील?
-----------------------------------
(९९) अमेयच्या काकांजवळ मराठीची २२ व हिंदीची ३३ पुस्तके आहेत, तर त्यांच्याकडे एकूण किती पुस्तके आहेत ?
-----------------------------------
(१००) ५६ झाडांपैकी ४६ झाडांना फुले आली आहेत, तर किती झाडांना फुले आली नाहीत?
-----------------------------------
(१०१) चंदनाजवळ ९४ मणी होते, त्यांपैकी ८४ मणी माळेत ओवले तर किती शिल्लक राहिले ?
-----------------------------------
(१०२) प्रतिभाला आईने ५० रुपये दिले व मामांनी ४० रुपये दिले, तर प्रतिभाकडे किती रुपये जमा झाले ?
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Monday, 23 October 2023

भाषिक सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे
------------
(२) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे
------------
(३) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा
-----------------------------------
(४) ' पाडस ' कोणाच्या पिल्लाला म्हणतात ?
उत्तर -- हरण
-----------------------------------
(५) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- राई
-----------------------------------
(६)  मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे
-----------------------------------
(७)  बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू
-----------------------------------
(८) घोड्याच्या पिल्ला काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरू 
-----------------------------------
(९) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- बच्चा / बछडा
-----------------------------------
(१०) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- रेडकू
-----------------------------------
(११) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा
-----------------------------------
(१२) बैलांच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- हंबरणे
-----------------------------------
(१३) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- रेकणे
-----------------------------------
(१४) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- ताटवा
-----------------------------------
(१५) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गुच्छ 
-----------------------------------
(१६) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- बेट
-----------------------------------
(१७) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू
-----------------------------------
(१८) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- तबेला / पागा
-----------------------------------
(१९) कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- पिल्लू
-----------------------------------
(२०)  वाघाच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- डरकाळी 
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Sunday, 22 October 2023

आदिम लाल फडकी


फडकीतच जन्मून मी
झाली मोठी बघता - बघता 
तीचं महत्त्व जाणते मी
आदिम समाजात महानता 
   आजी गेली, आई गेली 
  फडकीचं पावित्र्य जपते जगता जगता
     लाल रंग आवडतो मज
     पांढरे ठिपक्यांचे मोल मोजता मोजता 
फडकी लाल वटवृक्ष
देई वात्सल्य सावली
आमच्या संस्कृती जीवनावर
उभी कणसरा माऊली 
       रूप सुंदर फडकीचे
       ती आहे ममता
       भेदभाव नाही मनी तिच्या
       ती आहे समता 
फडकीचं सुंदर रान
झिजते होऊन चंदन
फुले सुंगधित होऊन
झेली लाल तुफान 
       ऊब फडकीचं मिळता
       आठवते मला माय
       लाल राणी प्यारी
       मला वाटते साय 
सुखदुःखात आधार देते
जीवन फुलवणारी लाडकी
कितीही असू द्या ऊन - थंडी
क्षणात सारं हलकं करते फडकी
       कसे फेडावे ऋण फडकीचं
       आदिम संस्कृतीत लागला लळा 
       फडकीच्या उबेत शिरता 
       जुळून येतो जिव्हाळा 
फडकी आजीची ... फडकी आईची
फडकी अनोखी प्रेमळ खूप 
फडकी आमची ... संस्कृती जपते
फडकी असे हे संस्कृतीरूप 
      लाल लाल फडकी माझी
      उमटवून गेली ठसा
      फडकी आहे या जगी
      ऋण काय मोलू कसा 
फडकी म्हणजे जणू
संस्कृतीची तीन अक्षरे
फडकीचे ठिपके म्हणजे
वात्सल्याची तीन पाखरे
       फडकी म्हणजे जणू
       आदिम संस्कृतींचा अथांग सागर
       फडकी माय म्हणजे
       सर्व सुखाचे आगर
फडकी म्हणजे जणू
आदिम संस्कृतीची माऊली
फडकी माय म्हणजे
कृपेची सावली
        अशी माझी फडकी माय
        तीच बाप नि माऊली
       आदिम संस्काराचा ठेवा
        माझी कणसरी सावली 
---------------------------------
कवी / लेखक :- शंकर सिताराम चौरे
काकरपाडा ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Saturday, 21 October 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) वरून काटेरी व आत रसाळ, गोड गरे असलेले फळ कोणते ?
उत्तर -- फणस
------------------
(२) जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- केळी
-----------------
(३) नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- संत्री
-----------------------------------
(४) महाराष्ट्रात हळदीचे पीक कोणत्या जिल्ह्यात अधिक होते ?
उत्तर -- सांगली 
-----------------------------------
(५) महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला कोणता सागर आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र 
-----------------------------------
(६)  नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- द्राक्षे
-----------------------------------
(७) गोदावरी नदी कोठून उगम पावते ?
उत्तर -- त्र्यंबकेश्वर ( नाशिक)
-----------------------------------
(८) ' माथेरान ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
-----------------------------------
(९) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
-----------------------------------
(१०) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ
-----------------------------------
(११) महाराष्ट्रात नोटा कोठे छापल्या जातात ?
उत्तर -- नाशिक
-----------------------------------
(१२) कोणत्या फळाची बी फळाच्या बाहेर असते  ?
उत्तर -- काजू 
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Monday, 16 October 2023

माझं आदिम गाव ....


काननदी  तिरी 
माझं वसलेल गाव
कसं शोभुनी दिसतं 
त्याचं काकरपाडा नाव

साऱ्या गावाचं दैवत 
डोंग-यादेवाशी नातं 
डोंग-यादेवाच्या उत्सवाला 
जमा होती गणगोतं

दिसे रेशमी गड
निवळा डोंगरावर शिव
मनोमनी आठवावं
निसर्ग देवाचं वैभव

डोंग-यादेवाच्या पायी 
झाली पुण्यवाणं माती
तया जोडुनी कर
पिके नागली, भाताची शेती 

कौलारू घरं टुमदार
पहावं तिकडं झाडी - डोंगर 
असा माझा आदिम गाव
 तिथं माणुसकीला वाव 
==================
कवी :- शंकर चौरे 
काकरपाडा ता. साक्री जि.‌ धुळे

Sunday, 15 October 2023

मिसाईल मॅन ( विशेष सामान्यज्ञान )


(१) डाॅ. अब्दुल कलमांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर  -- अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
----------------------------
(२)डाॅ . ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म कधी व कोठे झाला  ?
उत्तर  --  १५  ऑक्टोबर १९३१, रामेश्वर
----------------------------
(३) डाॅ.  ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म ठिकाण कोणत्या राज्यात आहे  ?
उत्तर --  तामिळनाडू
----------------------------
(४) डाॅ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा मृत्यू वयाच्या ८३ व्या वर्षी कधी व कोठे झाला ?
उत्तर --  २७ जुलै २०१५ ,  शिलाॅग
--------------------------
(५) शिलाॅग कोणत्या राज्याची राजधानी आहे  ?
उत्तर --  मेघालय
--------------------------
(६) डाॅ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय  ?
उत्तर --  अग्निपंख
--------------------------
(७) डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कविता संग्रहाचे नाव काय  ?
उत्तर  --  माय जर्नी
--------------------------
(८) डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला  ?
उत्तर --  १९९७
-------------------------
(९) डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन महाराष्ट्र शासन काय म्हणून साजरा करते  ?
उत्तर --  वाचन प्रेरणा दिन
-------------------------
(१०) डाॅ. ए.पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे  कितवे राष्ट्रपती होते  ?
उत्तर --  ११ वे
-------------------------
(११) भारतातील कोणत्या राष्ट्रपतीचा उल्लेख मिसाईल मॅन म्हणून करतात  ?
उत्तर --  डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
-----------------------------
(१२) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे टोपण नाव काय आहे ?
उत्तर -- मिसाईल मॅन
========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र ‌- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६ 

Monday, 9 October 2023

म्हणी ( म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी )


(१) रात्र थोडी सोंगे फार.
(२) वासरात लंगडी गाय शहाणी.
(३) बळी तो कान पिळी.
(४) नाव मोठे, लक्षण खोटे.
(५) देव तारी त्याला कोण मारी.
(६) अडला हरी गाढवाचे पाय धरी.
(७) थेंबे थेंबे तळे साचे.
(८) गोगलगाय नि पोटात पाय.
(९) गर्वाचे घर खाली.
(१०) कामापुरता मामा.
(११) करावे तसे भरावे.
(१२) अंथरूण पाहून पाय पसरावे.
(१३) कर नाही त्याला डर कशाला ?
(१४) उचलली जीभ लावली टाळ्याला.
(१५) ऐकावे जनाचे, करावे मनाचे.
(१६) इकडे आड, तिकडे विहीर.
(१७) अती तेथे माती.
(१८) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
(१९)  ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
(२०) काखेत कळसा गावाला वळसा.
(२१) गरज सरो, वैद्य मरो.
(२२) गाढवाला गुळाची चव काय ?
(२३) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
(२४) डोंगर पोखरून उंदीर काढणे.
(२५) ताकापुरती आजी.
(२६) ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी.
(२७) तळे राखी, तो पाणी चाखी.
(२८) दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ.
(२९) दुरून डोंगर साजरे.
(३०) नाचता येईना (म्हणे) अंगण वाकडे.
(३१) पालथ्या घागरीवर (घड्यावर ) पाणी.
(३२) पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.
(३३) बैल गेला नि झोपा केला.
(३४) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
(३५) रोज मरे त्याला कोण रडे.
(३६) लहान तोंडी मोठा घास.
(३७) शितावरून भाताची परीक्षा.
(३८) हाजीर तो वजीर.
(३९) हत्ती गेला नि शेपूट राहिले.
(४०) पळसाला पाने तीनच.
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Friday, 6 October 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती कडे आहे ?
उत्तर -- शनि
----------------------
(२) भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली ?
उत्तर -- २६ जानेवारी १९५०
-----------------------
(३) 'कांगारूंच्या देश ' असे कोणत्या देशाला म्हणतात ?
उत्तर --  ऑस्ट्रेलिया
-----------------------------------
(४)  महानगरपालिकेच्या प्रमुखांना काय म्हणतात ?
उत्तर -- महापौर
-----------------------------------
(५) महाराष्ट्रातील सर्वांधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे ?
उत्तर -- अंबोली
-----------------------------------
(६) ' डेसिबल ' हे .... मोजण्याचे एकक आहे ?
उत्तर -- आवाजाची तीव्रता
-----------------------------------
(७) जगातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर -- सहारा 
-----------------------------------
(८) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू
-----------------------------------
(९) ' तिहार जेल ' कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- दिल्ली
-----------------------------------
(१०) महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो ?
उत्तर -- नाशिक
-----------------------------------
(११) महाराष्ट्रातील आकाराने सर्वांत लहान जिल्हा कोणता ?
उत्तर -- मुंबई
-----------------------------------
(१२) ' मसुरी ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तराखंड
-----------------------------------
(१३)  आंतरराष्ट्रीय योगदिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
उत्तर -- २१ जून
-----------------------------------
(१४) महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते ‌?
उत्तर -- कोल्हापूर
-----------------------------------
(१५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- नर्मदा
-----------------------------------
(१६) भारतातील कोणत्या शहराला ' पिंक सिटी ' म्हटले जाते?
उत्तर -- जयपूर
-----------------------------------
(१७) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद
-----------------------------------
(१८) सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह कोणता ?
उत्तर -- गुरू
-----------------------------------
(१९) सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा कोणता भाग दिसतो ?
उत्तर -- कडेचा 
-----------------------------------
(२०) शंभर रूपयांच्या नोटेवर कोणाची सही असते ?
उत्तर -- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Wednesday, 4 October 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) भारताच्या शेजारी किती राष्ट्रे आहेत ?
उत्तर -- सात
-------------------
(२) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?
उत्तर -- नील आर्म स्ट्रॉग
----------------------
(३) ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
उत्तर -- राज्य सरकार
-----------------------------------
(४) ' सावरपाडा एक्स्प्रेस ' म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?
उत्तर -- कविता राऊत 
-----------------------------------
(५) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?
उत्तर -- ३६
-----------------------------------
(६) ' महाबळेश्वर ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
उत्तर -- सातारा
-----------------------------------
(७) भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदीचा दर्जा दिला आहे ?
उत्तर -- गंगा
-----------------------------------
(८) ' सापुतारा '  हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते ?
उत्तर -- गुजरात
-----------------------------------
(९) ' जागतिक कामगार दिन ' केव्हा साजरा करतात ?
उत्तर -- १ मे
-----------------------------------
(१०) ' केळी ' फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर -- जळगाव
-----------------------------------
(११)  जगातील सर्वांत लांब नदी कोणती  ?
उत्तर -- नाईल
-----------------------------------
(१२) महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली ?
उत्तर -- मुंबई 
=====================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Monday, 2 October 2023

आठवण सोनीआईची (सोनीआई चौरे)


सोनी आई तुझे उपकार थोर
आम्हांस दिलेस आकार
छान तुझे संस्कार 
आई महती तुझी गात राहणार  

सोनी आई येते तुझी आठवण
मन नाही मानत तुझे हे नसलेपण
आदर्श आयुष्य असे घडविलेस
सोनी नाव सोनेरी केलेस 

सोनी आई तू विशाल वटवृक्ष
दिली वात्सल्य सावली
चौरे कुटुंबाच्या मार्गावर
उभी होती संस्काराची माऊली 

सोनी आई तू ममतेचं आभाळ
करित होतीस प्रेमाचं सिंचन
केली माया होऊन चंदन 
बहरे चौरे कुटुंबाचं अंगण 

सोनी आई खूप तुझे ऋण
जगी होती तू महान 
आई तू साक्षात परमेश्वर 
तुझ्या मायेचं काय मोल देणार 
=====================
लेखक / कवी :- शंकर चौरे
काकरपाडा ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६
(सोनीआई चौरे यांना समर्पित )