--- आकाशात पूर्ण चंद्र दिसतो, म्हणजेच चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो. त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात.
-----------------
(२) अमावास्या :
--- आकाशात चंद्र दिसत नाही, म्हणजेच चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही. त्या रात्रीला अमावास्या म्हणतात.
--------------------------------------
(३) चांद्रमास :
--- एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतच्या २८ ते ३० दिवसांच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात.
--------------------------------------
(४) तिथी :
---- अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात.
--------------------------------------
(५) लीप वर्ष :
--- ज्या वर्षात ३६६ दिवस असतात, म्हणजेच ज्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात.
--------------------------------------
(६) परिवलन :
--- ग्रह आपल्या आसाभोवती गोल फिरतात, या फिरण्याला परिवलन म्हणतात. उदा., पृथ्वी २४ तासांत परिवलन करते.
--------------------------------------
(७) परिभ्रमण :
--- ग्रहाच्या ताऱ्याभोवतीच्या फिरण्याला परिभ्रमण म्हणतात. उदा., पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती परिभ्रमण करते.
--------------------------------------
(८) कृष्णपक्ष :
--- पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होण्याच्या पंधरा दिवसांच्या कालावधीला कृष्णपक्ष म्हणतात.
--------------------------------------
(९) शुक्लपक्ष :
--- शुक्लपक्षात चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग मोठा मोठा होत जातो.
--- अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा पृथ्वीकडील भाग अधिकाधिक प्रकाशित होत जाण्याच्या पंधरा दिवसांच्या कालावधीला पौर्णिमा म्हणतात.
--------------------------------------
(१०) चंद्राच्या कला :
--- अमावास्या ते पौर्णिमा तसेच पौर्णिमा ते अमावास्या या कालावधीत चंद्राच्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या प्रकाशित भागाच्या विविध स्थितींना चंद्राच्या कला म्हणतात.
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment