उत्तर -- २६ जानेवारी
(२) भारतातील कोणत्या शहराला 'गुलाबी शहर ' म्हटले जाते ?
उत्तर -- जयपूर
(३)'कांगारूंचा देश ' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ?
उत्तर -- ऑस्ट्रेलिया
(४) जगातील पहिला अवकाशवीर कोण ?
उत्तर -- नील आर्मस्ट्राँग
(५) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर -- डॉ. राजेंद्र प्रसाद
(६) भारत - चीन या दोन देशांमध्ये कोणती सीमारेषा आहे ?
उत्तर -- मॅकमोहन
(७) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
उत्तर -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(८) ' माझे सत्याचे प्रयोग ' या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर -- महात्मा गांधी
(९) भारतातील सर्वात मोठी नदी कोणती ?
उत्तर -- गंगा
(१०) ' वाळवंटातील जहाज ' असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते ?
उत्तर -- उंट
(११) भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते ?
उत्तर -- गोवा
(१२) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर -- यकृत
(१३) डेसिबल हे ..... मापनाचे एकक आहे ?
उत्तर -- आवाज
(१४) भूकंपमापक यंत्राला काय म्हणतात ?
उत्तर -- सिस्मोग्राफ
(१५) भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
उत्तर -- राष्ट्रपती
(१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली ?
उत्तर -- नागपूर
(१७) मानवी शरीरातील हाडांची संख्या किती ?
उत्तर -- २०६
(१८) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नागपूर
(१९) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
उत्तर -- भारतरत्न
(२०) शिक्षक दिन कोणत्या दिवशी असतो ?
उत्तर -- ५ सप्टेंबर
(२१) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
(२२) ' ययाती ' कांदबरी कोणी लिहिली ?
उत्तर -- वि. स. खांडेकर
(२३) गंगा - यमुना नदीचा संगम कोठे झाला आहे ?
उत्तर -- इलाहाबाद
(२४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती ?
उत्तर -- राजगड
(२५) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे ?
उत्तर -- सातपुडा
(२६) सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- अमृतसर
(२७) गोदावरी नदी महाराष्ट्रात .... येथून उगम पावते ?
उत्तर -- त्र्यंबकेश्वर ( नाशिक )
(२८) चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?
उत्तर -- ५० मिनिटे
(२९) ' डिस्कवरी ऑफ इंडिया ' या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू
(३०) एकमेव खेळाडू ज्याला ' भारतरत्न ' भेटले ते कोण ?
उत्तर -- सचिन तेंडुलकर
(३१) महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ?
उत्तर -- पोरबंदर ( गुजरात )
(३२) भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ?
उत्तर -- महात्मा गांधी
(३३) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?
उत्तर -- चाचा
(३४) ' भारत छोडो चळवळ ' कोणत्या वर्षी सुरू झाली ?
उत्तर -- १९४२
(३५) भारताचा स्वातंत्र्यदिन कोणता ?
उत्तर -- १५ ऑगस्ट १९४७
(३६) वा-यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते ?
उत्तर -- गतिजन्य ऊर्जा
(३७) भारतात आद्य क्रांतिकारक कोणास म्हणतात ?
उत्तर -- वासुदेव बळवंत फडके
(३८) महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर -- ७२० किलोमीटर
(३९) भारतीय राज्यघटना अमलात केव्हा आली ?
उत्तर -- २६ जानेवारी १९५०
(४०) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- राकेश शर्मा
(४१) एकशिंगी गेंड्यांकरिता प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर -- काझीरंगा
(४२) ' मेरी कोम ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
(४३) ' दुधाची शुध्दता ' मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
उत्तर -- लॅक्टोमीटर
(४४) समुद्राची खोली ..... एककात मोजतात.
उत्तर -- फॅदोमीटर
(४५) सूर्यग्रहातील तांबडा ग्रह कोणता ?
उत्तर -- मंगळ
(४६) भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला ?
उत्तर -- महाड
(४८) वनस्पतींनाही भावना असतात हा शोध कोणी लावला ?
उत्तर -- जगदीशचंद्र बोस
(४९) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- दिल्ली
(५०) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले ?
उत्तर -- १९१९
(५१) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
उत्तर -- रासबिहारी बोस
(५२) गुरूत्वाकर्षणाचा सिध्दांत कोणी मांडला ?
उत्तर -- न्यूटन
(५३) निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
उत्तर -- ३७ अंश सेल्सिअस
(५४) बेशुद्ध माणसाला शुध्दीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात ?
उत्तर -- अमोनिया
(५५) जगात क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता ?
उत्तर -- रशिया
(५६) मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो ?
उत्तर -- देवनागरी
(५७) मानवी शरीरातील सर्वात लांब असे कोणते हाड आहे ?
उत्तर -- मांडीचे हाड
(५८) शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ?
उत्तर -- भारत
(५९) ' आंबोली ' हे पर्यटनस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
(६०) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
उत्तर -- गुरू
(६१) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
(६२) दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला ?
उत्तर -- महात्मा गांधी
(६३) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर -- दादासाहेब फाळके
(६४) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई
(६५) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
उत्तर -- सरदार वल्लभभाई पटेल
(६६) पंचशील करार कोणत्या देशांमध्ये झाला ?
उत्तर -- भारत - चीन
(६७) वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी
(६८) ताजमहाल कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तर प्रदेश
(६९) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते ?
उत्तर -- लुंबिनी
(७०) महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते ?
उत्तर -- सदरक्षणाय खलनिग्रहणाय
(७१) जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
उत्तर -- रविंद्रनाथ टागोर
(७२) महाराष्ट्रात हिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते ?
उत्तर -- छ. संभाजी नगर
(७३) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
(७४) छ. शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- बुलढाणा
(७५) माऊंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- थंड हवेचे ठिकाण
(७६) महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय ?
उत्तर -- राजघाट
(७७) कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात ?
उत्तर -- मुंबई
(७८) ' श्यामची आई ' कादंबरीचे लेखक कोण ?
उत्तर -- सानेगुरुजी
(७९) अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- छ. संभाजी नगर
(८०) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
(८१) महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे ?
उत्तर -- लावणी
(८२) ' जय जवान जय किसान ' हे घोषवाक्य कोणी दिले ?
उत्तर -- लालबहादूर शास्त्री
(८३) महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला कोणता सागर आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र
(८४) इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते ?
उत्तर -- कमला नेहरू
(८५) जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- गोदावरी
(८६) महाराष्ट्रातील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- सांगली
(८७) भारतातील भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते ?
उत्तर -- नागपूर
(८८) कोणार्क येथे ..... हे प्रसिद्ध मंदिर आहे ?
उत्तर -- सूर्य मंदिर
(८९) ' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- प्रवरा
(९०) महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी
(९१) लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- पुणे
(९२) चंदन वृक्षाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?
उत्तर -- कर्नाटक
(९३) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर -- दिल्ली
(९४) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?
उत्तर -- नील आर्मस्ट्राँग
(९५) महाराष्ट्रातील सर्वांत जास्त लांबीची नदी कोणती आहे ?
उत्तर -- गोदावरी
(९६) कोणत्या झाडास स्पर्श केला असता त्या झाडाची पाने मिटतात ?
उत्तर -- लाजाळू
(९७)बार्डोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
उत्तर -- सरदार पटेल
(९८) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपूर
(९९) भिल्लांचा उठाव ...... येथे झाला होता.
उत्तर -- खानदेश
(१००) ' सावरपाडा एक्स्प्रेस ' म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू )
==============================
संकलक / लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment