(२) अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
(३) असतील शिते तर जमतील भुते.
(४) अंथरूण पाहून पाय पसरावे.
(५) अडला हरी गाढवाचे पाय धरी.
(६) अति झाले अन् आसू आले.
(७) आयत्या बिळात नागोबा.
(८) आली भोगासी असावे सादर.
(९) आपल्यास पोळीवर तूप ओढणे.
(१०) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
(११) आधी पोटोबा मग विठोबा.
(१२) आपलेच दात आपलेच ओठ.
(१३) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?
(१४) अंगापेक्षा बोंगा मोठा.
(१५) अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज.
(१६)अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
(१७) आपला हात जगन्नाथ.
(१८) आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे.
(१९) इकडे आड तिकडे विहिर.
(२०) आंधळे दळते नि कुत्रे पिठं खाते.
(२१) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
(२२) उचलली जीभ लावली टाळ्याला.
(२३) उथळ पाण्याला खळखळाट फार.
(२४) उधारीची पोते, सव्वा हात रिते.
(२५) उंदराला मांजर साक्ष.
(२६) ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
(२७) एक ना धड भाराभर चिंध्या.
(२८) एका पिसाने मोर होत नाही.
(२९) एका हाताने टाळी वाजत नाही.
(३०) एका किंवा एकाच माळेचे मणी.
(३१) ऐकावे जनाचे करावे मनाचे.
(३२) करावे तसे भरावे.
(३३) कर नाही त्याला डर कशाला ?
(३४) कानामागून आली आणि तिखट झाली.
(३५) काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.
(३६) कावळा बसला अन् फांदी तुटली.
(३७) काखेत कळसा आणि गावाला वळसा.
(३८) कामापुरता मामा.
(३९) कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
(४०) कुन्हाडीचा दांडा गोतास काळ.
(४१) कोळसा उगाळावा तितका काळाच.
(४२) कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभटाची तट्टाणी.
(४३) कोल्हा काकडीला राजी.
(४४) कोंड्याचा मांडा करुन खाणे.
(४५) कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही.
(४६) खाई त्याला खवखवे.
(४७) खाण तशी माती.
(४८) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
(४९) खायला काळ भुईला भार.
(५०) खोट्याच्या कपाळी गोटा
(५१) गरज सरो वैद्य मरो.
(५२) गर्जेल तो पडेल काय ?
(५३) गर्वाचे घर खाली.
(५४) गाढवाला गुळाची चव काय ?
(५५) गाव करी ते राव ना करी.
(५६) गुरूची विद्या गुरूला.
(५७) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.
(५८)गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ.
(५९) गोगलगाय अन् पोटात पाय.
(६०) घरोघरी मातीच्या चुली.
(६१) घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात.
(६२) घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे.
(६३) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
(६४) चोराच्या मनात चांदणे.
(६५) चोराच्या उलट्या बोंबा.
(६६) चोर सोडून संन्याशाला सुळी देणे
(६७) जळात राहून माशाशी वैर.
(६८) जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
(६९) जे न देखे रवी, ते देखे कवी.
(७०) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
(७१) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.
(७२) ज्याच्या हाती ससा तो पारधी.
(७३) ज्याचे करावे बरे तो म्हणतो आपलेच खरे.
(७४) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
(७५) झाकली मूठ सव्वा लाखाची.
(७६) टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
(७७) डोळ्यात केर आणि कानात फुंकर.
(७८) तळे राखी तो पाणी चाखी
(७९) ताकापुरती आजी.
(८०) तेरड्याचा रंग तीन दिवस.
(८१) तेल गेले, तुप गेले, हाती धुपाटणे आले.
(८२) तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
(८३) थेंबे थेंबे तळे साचे.
(८४) दगडापेक्षा वीट मऊ .
(८५) दाम करी काम.
(८६) दात कोरून पोट भरत नाही.
(८७) दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.
(८८) दिव्याखाली अंधार .
(८९) दिवस बुडाला मजूर उडाला.
(९०) दुरून डोंगर साजरे .
(९१) दुष्काळात तेरावा महिना.
(९२) दुभत्या गाईच्या लाथा गोड.
(९३) देश तसा वेश.
(९४) देव तारी त्याला कोण मारी.
(९५) दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
(९६) दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
(९७) दैव देते आणि कर्म नेते.
(९८) दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला.
(९९) दृष्टी आड सृष्टी.
(१००) न कर्त्याचा वार शनिवार.
(१०१) नव्याचे नऊ दिवस.
(१०२) नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने
(१०३) नाचता येईना अंगण' वाकडे.
(१०४) नावडतीचे मीठ अळणी.
(१०५) नाव मोठे लक्षण खोटे.
(१०६) नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.
(१०७) नाक दाबले की तोंड उघडते.
(१०८) नाकापेक्षा मोती जड.
(१०९) नवी विटी नवे राज्य.
(११०) पदरी पडले पवित्र झाले.
(१११) पळसाला पाने तीनच.
(११२) पाचामुखी परमेश्वर.
(११३) पाचही बोटे सारखी नसतात.
(११४) पी हळद अन् हो गोरी.
(११५) पालथ्या घागरीवर पाणी.
(११६) पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
(११७) पेरावे तसे उगवते.
(११८) प्रयत्नांती परमेश्वर.
(११९) बडा घर पोकळ वासा.
(१२०) बळी तो कान पिळी.
(१२१) बाप तसा बेटा.
(१२२) बुडत्याचा पाय खोलात.
(१२३) बुडत्याला कडीचा आधार.
(१२४) बैल गेला नि झोपा केला.
(१२५) भरवशाच्या म्हशीला टोणगा.
(१२६) भित्या पाठी ब्रह्मराक्षस.
(१२७) भीक नको, पण कुत्रं आवरं.
(१२८) भुकेला कोंडा निजेला धोंडा
(१२९) मनी वसे ते स्वप्नी दिसे.
(१३०) मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी ?
(१३१) मनात मांडे पदरात धोंडे.
(१३२) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
(१३३) मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.
(१३४) यथा राजा तथा प्रजा.
(१३५) रात्र थोडी सोंगे फार.
(१३६) रोज मरे त्याला कोण रडे.
(१३७) लहान तोंडी मोठा घास.
(१३८) लेकी बोले सुने लागे.
(१३९) वराती मागून घोडे.
(१४०) वड्याचे तेल वांग्यावर.
(१४१) वासरांत लंगडी गाय शहाणी.
(१४२) शहाण्याला शब्दांचा मार.
(१४३) शेंडी तुटो की पारंबी तुटो.
(१४४) शेरास सव्वाशेर .
(१४५) शितावरून भाताची परीक्षा.
(१४६) सगळे मुसळ केरात.
(१४७) सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
(१४८) साखरेचे खाणार त्याला देव देणार.
(१४९) सारा गाव मामाचा एक नाही कामाचा.
(१५०) सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.
(१५१) सुंठीवाचून खोकला जाणे.
(१५२) हत्ती गेला शेपूट राहिले.
(१५३) हातच्या काकणाला आरसा कशाला.
(१५४) हाजीर तो वजीर.
(१५५) हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे.
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment