माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 1 March 2024

गणितीय सामान्यज्ञान


(1) सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे.
(2) सर्वांत मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही.
(3) लहानात लहान पूर्ण संख्या ' 0 ' आहे.
(4) मोठ्यात मोठी पर्ण संख्या सांगता येत नाही.
(5) लहानात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही.
(6) मोठ्यात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही.
(7) मोठ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या  -- 1 आहे.
(8) लहानात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे.
(9)  0 ही संख्या धनही नाही व ऋणही नाही.
(10) सम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो.
(11) दोन क्रमागत सम संख्यामध्ये दोनचा फरक असतो.
(12) दोन क्रमागत विषम संख्यांमध्ये 2 चा फरक असतो.
(13) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज 55 आहे.
(14) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज 30 आहे.
(15) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज 25 आहे.
(16) 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत.
(17) सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.
(18) सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे.
(19) 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत.
(20) 1 ही संख्या संयुक्तही नाही व मूळही नाही.
(21) सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे.
(22)  सम असणारी एकमेव मूळ संख्या 2 आहे.
(23) सम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो.
(24) सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.
(25) सर्वात लहान संयुक्त विषम संख्या 9 आहे.
(26) एक अंकी लहानात लहान संख्या 1 आहे.
(27) दोन अंकी लहानात लहान संख्या 10 आहे.
(28) तीन अंकी लहानात लहान 100 आहे.
(29) चार अंकी लहानात लहान संख्या 1,000 आहे.
(30) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 आहे.
(31) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे.
(32) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे.
(33) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या 9, 999 आहे.
(34) 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक एकूण 11 वेळा येतो.
(35) 1 ते 100 पर्यंत  1 हा अंक एकूण 21 वेळा येतो.
(36) मीटर हे लांबी मोजण्याचे मुख्य परिमाण आहे. 
(37) लीटर हे धारकता / पातळ पदार्थ मोजण्याचे मुख्य परिमाण आहे.
(38) ग्रॅम हे वजन मोजण्याचे मुख्य परिमाण आहे.
(39) काल मोजण्यासाठी तास, मिनिट, सेकंद, दिवस, महिना, वर्ष इत्यादी एकके वापरतात.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 /  7721941496

No comments:

Post a Comment