माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 14 October 2025

मिसाईल मॅन ( डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम )

देशाचे झाले तुम्ही मिसाईल मॅन 
नाही विसरणार आम्ही तुमचे बलिदान
रामेश्वरम गावातून जन्मलेले भारतरत्न 
सूर्य होऊन जळत राहिले तुमचे कठोर प्रयत्न

आकाशी उड्डाणाचा धरूनी तुम्ही ध्यास 
अग्नीबाणाच्या रूपाने बनले तुम्ही व्यास
अग्नीबाणाच्या निर्मितीने जग चकीत झाले 
तुमच्या कार्याचा डंका जगभर गेले

पृथ्वी,अग्नी,नाग अशी क्षेपणास्त्रे तुम्ही निर्मिली
 शक्तिशाली देशाची कीर्ती जगभर नेली
स्वप्न क्षेपणास्त्रे तयार करण्याचे पाहत होते 
देशाच्या भविष्यासाठी कधी तुम्ही थकले नव्हते

देशाला उंच शिखरावर नेण्यासाठी केली आण 
तन-मन अर्पण करूनी देशाची उंचावली मान
दूरदृष्टी अन् कार्य थोर, अलौकिक हे असे 
तुमच्या कार्याने आपला देश जगात उठून दिसे

धन्य कलाम चाचा देशप्रेमाची तुमची महती 
भारतासाठी आयुष्य वेचले, पावन झाली भरती
आपल्या विचाराने आम्ही देश घडविणार 
देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करणार

लेखक / कवी :- शंकर चौरे सर 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरताड ( गाव.)
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे 
9422736775  / 7721941496

No comments:

Post a Comment