माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 2 November 2021

पहेलियाँ सुलझाइए ( विषय :- हिंदी )



(१)दूध मिले तो मैं पी जाऊँ,
चूहे को भी चटकर जाऊँ।
मेरे रंगों के ये भेद (प्रकार) 
काली, कबरी और सफेद।

---- बिल्ली
-----------------------------
(२) हल्की-हल्की उसकी काया,
      चीं-चीं करके शोर मचाया।
     फुदक-फुदक मन ललचाए,
     मुन्नी उसको पकड़ न पाए।

-----  चिडिया 
----------------------------------
(३)खेल है नसीब का,
घर हूँ गरीब का।
एक-एक दिन गिनती हूँ
घास-फूस से बनती हूँ।

---- झोपडी
-------------------------------------
(४)गाँव-गाँव की प्यास बुझाती, 
कल-कल का संगीत सुनाती।
बहती रहना मेरा काम,
बतलाओ तो मेरा नाम |

----- ‌नदी
------------------------------------
(५) पर्वत एक निराला हूँ
भारत का रखवाला हूँ। 
काया मेरी लंबी-मोटी, 
एवरेस्ट है मेरी चोटी।

----- ‌ हिमालय
========================
संकलक :- शंकर चौरे (प्रा. शिक्षक)
           पिंपळनेर , ता. साक्री, जि. धुळे
           9422736775


Monday, 1 November 2021

जगातील सर्वात उंच , लांब, मोठे (सामान्यज्ञान )


(१) जगातील सर्वात ऊंच पर्वत कोणते ?

 उत्तर ---  हिमालय.

(२) जगातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर --- माऊंट एव्हरेस्ट.

(३) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता ?
 उत्तर --- जिराफ.

(४) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
 उत्तर --- नाईल ( आफ्रिका )

(५) जगातील सर्वात लांब कालवा कोणता ?
उत्तर --- सुवेझ कालवा.

(६) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?
उत्तर --- चीनची भिंत

(७) जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणते ?
 उत्तर --- गोरखपूर (भारत )

(८) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
उत्तर --- पॅसिफिक महासागर

(९) जगातील सर्वात मोठी नदी कोणती ?
उत्तर -- ॲमेझॉन( दक्षिण अमेरिका )‌ 

(१०) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर -- सहारा ( आफ्रिका )

(११) जगातील सर्वात मोठा देश कोणता ?
उत्तर -- रशिया

(१२) जगातील सर्वात मोठी बॅक कोणती ?
उत्तर -- वर्ल्ड बँक , वाॅशिग्टंन

(१३) जगातील सर्वात (वजनदार)  मोठा प्राणी कोणता?
उत्तर -- निळा देवमासा

(१४)जगातील सर्वात मोठा प्राणी (जमिनीवरील) कोणता ?
उत्तर -- हत्ती

(१५) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
              जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
            केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
            ९४२२७३६७७५

मी कोण ?



दिपक दिवा आहे.
प्रकाश उजेड आहे.
निशा रात्र आहे.
शशी चंद्र आहे.

ज्योत्स्ना चांदणे आहे.
आकाश गगन आहे.
वसुधा भूमी आहे.
वर्षा पाऊस आहे.

सरिता नदी आहे.
सागर समुद्र आहे.
जीवन पाणी आहे.
विपिन जंगल आहे.

पवन वारा आहे.
आनंद हर्ष आहे.
भास्कर सूर्य आहे.
नंदन मुलगा आहे.

मानव मनुष्य आहे.
पंकज कमळ आहे.
माता माय आहे.
वनिता महिला आहे.

तनुजा मुलगी आहे.
सीमा मर्यादा आहे.
पूजा सेवा आहे.
आस्था काळजी आहे.

एकता एकी आहे.
मंगल पवित्र आहे.
कांचन सोने आहे.
उषा पहाट आहे.

प्रगती समृद्धी आहे.
वनराज सिंह आहे.
पोपट राघू आहे.
मयूर मोर आहे.

प्रताप शौर्य आहे.
कीर्ती प्रसिद्धी आहे.
नयन नेत्र आहे.
स़ंग्राम संघर्ष आहे.

भूषण अलंकार आहे.
ईश्वर देव आहे.
नरेश राजा आहे.
आदेश हुकूम आहे.
---------------------------------------------------------
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
  📞 ९४२२७३६७७५